अब भी एक उम्र पे जीने का न अंदाज आया । ज़िंदगी छोड दे पीछा मेरा, मै बाज़ आया ।।
Showing posts with label kal ke kalakar. Show all posts
Showing posts with label kal ke kalakar. Show all posts
Wednesday, May 30, 2007
धनश्री नांदुरकर-कुलकर्णी - राग मधुकंस - कल के कलाकार संमेलन
आपल्या पुण्याच्या धनश्री नांदुरकर-कुलकर्णी यांनी सादर केला राग मधुकंस. झकास. मजा आली.
Monday, May 28, 2007
कल के कलाकार - सुखद शेवट
आधीच बागेश्री राग अस्मादीकांना घायाळ करणारा, "सखी मन लागेना, ना जानु बालमवा मिलन कब होगा, प्रीत लगाके पछता रही सखी मन लागे ना". कल के कलाकार संमेलनाने आपल्या देश्याच्या भौगोलीक सीमा यंदाला ओलांडल्या, शुक्रवारी चक्क इटालीचे रिकार्डो बटाग्लीया यांचे, मुंबईच्या राजदीप बारोट समवेत सरोद वादन होते. त्यात त्यांनी बागेश्री राग सादर केला. दिल खुश हुवा. लखनौ वरुन आलेल्या मोहंमद रईस खान यांनी सारंगीवर वाजवलेला राग यमन ही लोभावुन गेला.
गुरुवारी मुंबईच्या श्री. विनायक प्रभु यांचे गायन सर्वात उत्तम झाले असे ऐकले, नेहमी प्रमाणे मी ते ऐकायला नव्हतो.
या दिवशीचे प्रमुख आकर्षण होते ते पखावाज कचेरीचे, यात बहार आणली श्री. वरुण कुमार झा ,संगीत कुमार पाठक, अनिरुद्ध शिर्के, विवेकानंद कुरांगळे व प्रताप पाटील यांनी. पाच पखावाज एकत्रपणे वाजताना ऐकणे हा एक सुखद अनुभव असतो. दुसरे आकर्षण होते ते श्री सतीश क्रूष्णमुर्ती यांचे म्रूदुंगम वादन. त्या आधी श्री. हिमांशु नंदानी आपल्या बासुरी वादनानी लोकांना नादावले होते. तबल्यावर त्यांना साथीला होते ते दोन दिवसापुर्वी बेला बहार वाजवलेले श्री. नवीन गंधर्व.
आयुष्यात प्रत्येक घटनेला शेवट असतोच, त्या प्रमाणे कल के कलाकार संमेलन काल रविवारी २७/०५/०७ रोजी तबला कचेरीच्या शेवटच्या कार्यक्रमाने समाप्त झाले.
या चांगल्या गोष्टी संपताना हुरहुर लावुन जातात. काल माझ्या मुलास मी मारुनमुटकुन शेवटच्या सत्रास घेवुन गेलो व जबरदस्तीने, रडतरखडत त्याला शेवट पर्यंत बसवले. त्याला ही तरुण पिढीचे गुण कळले पाहीजे. तो गिटार शिकत आहे. मग मला वाटते त्याला ही कुठेतरी मनात हे जाणवले असावे.

Friday, May 25, 2007
श्री. धनंजय जोशी - गायन- कल के कलाकार
व्यवसायाने नांदेडला अभियांत्रिकी महाविद्यालयात्त प्राध्यापक असलेल्या श्री. धनंजय जोशी यांनी आजच्या सत्राची सुरवात राग बिहाग ने केली आणि आपल्या गाण्यांनी सर्वांची मने जिंकली, परत यांचे गाणे ऐकणे नशीबी केव्हा असावे ?
कल के कलाकार संमेलन दिवस ७ वा.
२ रा कार्यक्र्म होता कोलकोत्या वरुन आलेल्या श्री. रितोम सरकार यांच्या गिटार वादनाचा. त्यांच्यानंतर पुण्याच्या धनश्री नांदुरकर-कुलकर्णी यांच्या गायनाचा. धनश्रींनी मधुवंती रागातील बंदीश गायली, मजा आली.
श्री. नवीन गंधर्व -बेला बहार = कल के कलाकार
आयुष्यात प्रत्येक गोष्टीला प्रथमवेला असते, आजच्या रात्री बहार आणली ती श्री. नवीन गंधर्व याच्या बेला बहार या वाद्याच्या वादनानी. मुळचे तबला वादक असलेल्या नवीननी आज प्रथमच रंगमंचावर बेला बहार सुरेल वाजवले आणि सर्वांना मंत्रमुग्ध केले. काय झिंझोटी रंगला होता म्हणुन सांगु, रात्र कधीही संपु नये, नवीनचे वाजवणे कधीही थांबु नये, अश्या अवस्थेत, परीक्षकांनी वेळ संपल्याची खुण केली, नवीनला आपले वादन आवरते घ्यावे लागले आणि रसिकांचा हिरमोड झाला. काळ, वेळ गोठवुन ठेवता आले असते तर किती बरे झाले असते. निदान घडयाळेतरी बंद पडायला हवी होती. माझीही हे वाद्य ऐकण्याची प्रथम वेळ होती, का पण का, आयुष्यात चांगल्या गोष्टी फार लौकर का संपतात ते केवळ देवच जाणे. लोकांसमोर बेला बहार प्रथमच वाजवण्याची वेळ असल्यामुळे नवीन तसे धास्तावले होते, ही तर केवळ सुरवात आहे, ह्या गुणी कलावंताचे, नवीनचे भवितव्य उज्जल आहे. त्याचे जेवढे कौतुक करावे तेवढे ते थोडेच आहे ,मस्त मजा आली, आत्मापर्यंत पोहोचणारे संगीत, आजची ही तरुण पिढी भरभरुन आपल्याला देत आहे.
कधीतरी भारावल्या अवस्थेत जाणवते "आता बस्स , हाच क्षण खरा, आता ह्याच्या पुढे काहीही नको, मन तॄप्त जाहले आहे." परमेश्वर कॄपेने असे क्षण आयुष्यात बार बार येवोत, नवीन ने असेच लोभीवणारे संगीत ऐकवावे आणि मी ते ऐकत रहावे.

आमेन.
आजचा सुर सिंगार संसद आयोजीत कल के कलाकार संमेलनाचा ७ वा दिवस. केवळ सुर सिंगार मुळेच या देशभरच्या तरूणांचे, गुणीजनांचे न्रुत्य, गायन, वादन पहाण्याची, ऐकण्याची सुवर्णसंधी मिळते, ऐरवी हे कसे शक्य होते ?
आजचा सुर सिंगार संसद आयोजीत कल के कलाकार संमेलनाचा ७ वा दिवस. केवळ सुर सिंगार मुळेच या देशभरच्या तरूणांचे, गुणीजनांचे न्रुत्य, गायन, वादन पहाण्याची, ऐकण्याची सुवर्णसंधी मिळते, ऐरवी हे कसे शक्य होते ?
ps -Bela Bahar is little known rather unknown instrument. It's a life mission of Naveen to introduce the instrument to the world. If any one wants to know more on BelaBahar, please feel free to contact Shree Naveen Gandharva. His mobile no. is 9820207827.
I wish him, best of luck in his mission.
Wednesday, May 23, 2007
Tuesday, May 22, 2007
कल के कलाकार संमेलन - ५ वा दिवस
या अभागी माणसाने आयुष्यातले ५ दिवस वाया घालावले, आपल्या नाकर्माने दुसरे काय ? वर्षभर ज्या कार्यक्रमाची वाट बघायची तो सुरु झाल्यावर थातुरमातुर सांसारीक कारणे सांगत त्याला जाण्याचे टाळावे ! लानत है तुझपर. आजपण जेमतेम तीनच कलाकारांनी सादर केलेले कार्यक्रम बघीतले व घरच्यांच्या सेवस हजर झालो. कस व्हायचे अस्मादीकांचे ?
Friday, May 18, 2007
कल के कलाकार संमेलन - एक अस्मरणिय अनुभव न चुकवण्यासारखा

वर्षभर ज्याची वाट पहात होतो ते " कल के कलाकार" संमेलन आज पासुन मुंबईत सुरु झाले. उदयन्मुख, तरुण, प्रतिभाशाली, गुणी कलावंताचा ओघ , आसेतुहिमाचल, संपुर्ण देशातुन, आज पासुन पुढील सबंध आठवडाभर मुंबईत सुरु झालेला आहे, या कल के कलाकारांना पहाण्याची, ऐकण्याची, सुवर्णसंधी आपल्याला केवळ सुर सिंगार संसद याच्या मुळेच मिळते. गेली कित्येक दशके देशाच्या कानाकोपऱ्यातुन उत्तमोत्तम तरुण कलावंताचा शोध घेत, त्यांना प्रोत्साहन देत , पुढे येण्याची संधी मिळवुन देण्यासाठी, त्यांना आपली कला रसीकांपुढे सादर करण्यासाठी योग्य ते व्यासपीठ मिळावे या चांगल्या हेतुने ही संस्था हे संमेलन आयोजीत करत आले आहे. आजच्या अनेक महान कलाकारांनी आपल्या सुरवातीच्या काळात या संमेलनात आपली कला पेश केली होती, हे विशेष.
आता पर्यंत आपण कालच्या कलावंतांना खुप पाहात आलोय, ऐकत आलो आहोत, केव्हा केव्हा वेळ प्रसंगी सहनही करत आलो आहोत (माफी असावी). आज काळाची गरज आहे ती आपण या "कल के" उद्याच्या कलाकारांना, प्रोत्साहन देण्याची, आपली दाद देण्याची, शाबासकी देण्याची. परत वरती हा कार्यक्रम विनामुल्य असतो. कदाचीत याला हजेरी लावणे हे स्टेटस सिंबॉल नसावे, या संमेलनाचे महागडे टिकीट नसावे म्हणुन दुर्देवाने या एका सुंदर कार्यक्रमाला लोकांची फार कमी प्रतीसाद मिळतो, त्यांची उपस्थिती तुरळक असते. याचा मात्र बराचसा दोष आयोजकांकडे जातो असे मला वाटते. या संमेलनाची पुरेशी माहीती लोकांपुढे पोहोचतच नाही, वर्तमानपत्रात तर याची जाहीरातच दिली जात नाही, प्रेस रिलीज ही दिले जात नसावे. लोकांना कळणार कसे ? कदाचीत ही संस्था आर्थिक अडचणीतुन जात असावी, हॉलचे वाढीव भाडे न परवडल्याकारणे यंदाचे संमेलन रद्द होणार होते. विद्यापीठाने कमी पुर्वीच्याच दरात हॉल उपलब्ध करुन दिल्यामुळे आज हे संमेलन होत आहे. ही बाब आपल्या सर्व रसीकांसाठी, कलाप्रेमींसाठी लांछनास्पद आहे. ज्या समाजात कलेची जोपासना करणाऱ्या एका संस्थेवर ही वेळ येवु शकते त्याला काय म्हणावे ?
दरवर्षी मे महिन्यात हे संमेलन विद्यापिठ विद्यार्थी भवन , बी रोड, चर्चगेट, येथे आयोजिले जाते. आजच्या कार्यक्रमाची सुरवात रोरकेला येथुन आलेल्या श्री देबाशीश पटनाईक यानी ओडीसी नॄत्याने केली. दि. १८ ते २२ पर्यंत ओडीसी, भरतनाट्यम, कथ्थक, मोहीनी अट्ट्म, आदी नॄत्यप्रकार सादर केले जाणार आहेत, २३ मे ते २६ मे रोजी शास्त्रीय संगीत ( गायन व वादना) चे कार्यक्रम होतील. वेळ संध्याकाळी सहा वाजता. रोज ८/९ कलाकार असतात.
२५ मे रोजी शेवटी पखावज कचेरी व २६ व २७ मे रोजी तबला कचेरी चा कार्यक्रम तर चुकवुन चालणार नाही, ५ पखावज १ मॄदुंगम तसेच १० तबला एकदम वाजताना ऐकणे वेगळीच अनुभुती असते. २८ मे रोजी भजन संमेलन, २६ मे रोजॊ श़बे गज़ल, ३० मे रोजी जयदेव हिदी चित्रपट संगीत संमेलन ही आहे. चार पाच महीन्यापुर्वी स्वामी हरीदास संमेलनही झाले, केव्हा झाले कळलेच नाही.
आज मात्र माझ्या नशीबात आजचे कार्यक्रम बघणे लिहीले नव्हते, घरगुती अडचणी मुळे, लगेचच उठुन यायला लागले. अभी रात बाकी है , बचेंगे तो और भी देखेंगे.
Subscribe to:
Posts (Atom)