Sunday, October 31, 2010

टिक मारा

1 ) राजीनामा स्विकारण्याचा ज्याला अधिकार असतो( उ.दा. राज्यपाल ) त्याच्याकडॆ तो दिला जातो का ?

- हो

- नाही

पहिला

डोक्यावरील पिकलेला पहिला केस, नव्या गाडीला पडलेला पहिला ओरखडा.

जास्त काय त्रास देते ?

थोडक्यात उत्तर द्या

असे का ?

जो सापडला तो चोर आणि बळी फक्त एकट्याचाच का दिला जातो व बाकीचे बचावतात कसे आणि का बचावले जातात ?

एका वाक्यात उत्तर द्या

भुखंड प्रकरणी गाजगाज गाजलेले पण काहीही वाकडॆ न झालेले, प्रत्येक प्रकरणातुन निसटुन गेलेले नेते कोण ?

संबंध जुळवा

भुखंड - इमारत - प्रभात रोड -पुणॆ-  जावई - मुख्यमंत्री - राजीनामा आणि  राजीनामा - मुख्यंमंत्री - सासु - कुलाबा - गृहनिर्माण - आदर्श - भुखंड.

Saturday, October 30, 2010

माणसाला लागते तरी किती ?

माणसाला अखेर लागते तरी किती जागा ? फक्‍त सहा फुट.

आणि त्या दरम्यान लागणारे अन्न ?

हिंदुस्थान की तलाश मे वास्को डी गामा

एकीकडॆ

एकीकडॆ जीवन उमलते, दुसरीकडॆ


ही वेळ

ही अशी वेळ लहान मुलांवर केव्हाही न यावी


ही अशी वेळ लहान मुलांवर केव्हाही न यावी.
एकीकडॆ मांडवीतुन नौकाविहार करत कॅसीनो मधे चालणारा जुगार आणि दुसरीकडॆ ज्यांचे सारे आयुष्यच एक जुगार बनुन राहीले आहे ते.

जावु तेथे खावु

जे ना लाभे सौख्य महाली ते लाभे ..यापुर्वी पणजी मधे हे उपहारगृह कसे काय सापडले नव्हते याचे राहुन राहुन आश्चर्य वाटुन राहिलयं.

राजाभाऊ चहापान , हो फक्‍त चहापान ( आणि ते पण पणजीमधे ,  अहो काय म्हणता काय ? ) करण्यासाठी कॅफे रियल मधे शिरले. आत शिरले तेव्हा त्यांना कुठे ठावुन होते की एक समाधान देणारी, तृप्त करणारी, आणि साधी, सरळ बटाटा भाजी आपली वाट बघत आहे. 

आजुबाजुच्या टॆबलांवरती बहुतेक सर्वच ही भाजी व सोबत गोव्याचे खास पाव खातांना पाहुन राजाभाऊंच्याने राहवेना, धीर धरवेना.

चव केवळ अप्रतिम, उपहारगृह अत्यंत स्वच्छ, वाढवी चांगल्या  प्रसन्नावस्थेतले.

काश पोटात आणखी जराशी जागा असती, मिरचीची भजी (बहुदा ) पण रिचवली गेली असती.

Wednesday, October 27, 2010

काका , काका मला वाचवा

काका काका मला वाचवा करत टाहो फोडणारे नारायणराव आता इतिहासजमा झाले.

काळ बदलला.

दिवाळी आधीच फटाके फुटु लागले, ऐन दिवाळीतच शिमग्याची बोंब कानी ऐकु यायला लागली.

अंधारबन

अंधारबन. मधल्या टप्पावर असलेले अंधारबन.सुसाळे बेटावर जातांना श्री. सुरेश परांजपे यांनी या बद्द्ल सांगितले होते, सोबत राजाभाऊंना ते घेवुन जाणार होते.

पण नाही जमले,

एक अंधारबन. असे अंधारबन ज्यात प्रवेश केला की म्हणे आपण चक्क मध्ययुगात पोचल्याचे वाटायला लागते. जबरदस्त जंगल आणि त्यामधुन जाणारी चक्क बैलगाडी वाट , सुख सुख म्हणजे किती सुख !

पण सुख नशिबात असायला लागतं.

सुसाळे बेट

ते पलीकडॆ दिसते आहे ते सुसाळे बेट. एक अप्रतिम लोकेशन, मुळशी तलावामधले सुसाळॆ बेट. वरती माथ्यावर एक छोटेसे देऊळ, रात्री वस्तीला. सोबत भवताली दाट काळोख आणि वरती चांदण्यांनी गच्च, भरगच्च भरलेले आकाश.बेटावर दोनचार घरं.

जाताना चालत. परततांना गाववाल्यांनी होडीतुन पलीकडॆ सोडलेले,
घुसळखांब- पौड रस्तावरील एका गावात.

नौकाविहार, एक असा नौकाविहार. असाच नौकाविहार, अश्याच निसर्गरम्य जागी, अश्याच स्वर्गात नक्कीच पराशर मुनींनी मत्सगंधा सोबत केला असणार.

तरीच.........

दुर्दैव आपले, आपण पराशर नव्हे आणि सोबत नसे मत्सगंधा.

गुड डे नी केला बॅड डॆ.

सकाळी उठल्याउठल्या कयानीची श्रुजबेरी बिस्किटे खाण्याची तीव्र इच्छा झाली.
परवालाच एक अख्खे बॉक्स भरुन आणली होती.

"संपली. "

बायकोनी जाहीर केले.
आयला, घरात ही माणसं आहेत का बकासुरं ?

श्रुजबेरीच्या ऐवजी ब्रिटानिया गुड डॆ , पिस्ताबदाम वाली ?

स्वप्नात विद्या बालन ऐवजी अगडबमफेमवाली यावी ??
"सखी मन लागेना" ऐकायला जावं आणि "मुन्नी बदनाम हुवी " कानावर पडावे.
मिलींद बोकीलांचे पुस्तक आणायला जावे आणि हाती भालचंद्र नेमाड्‍यांची कादंबरी पडावी ?सारा दिवस आता कंटाळवाणा जाणार.

Tuesday, October 26, 2010

केदारेश्वर ते सिद्धेश्वर

केदारेश्वर - वरळी - स्थापना सन- १८३२. एवढे प्राचीन देवस्थान मुंबईमधे असावे , आपल्या जाण्यायेण्याच्या मार्गावर असावे आणि आपली आत जावुन ती वास्तु पहाण्याची इच्छा होवु नये ?आणि हा सिद्धेश्वरापुढचा नंदी आणि पुढचा देखणा तलाव, कमळांनी भरलेला.
पालीला गेल्यावर मुद्दामुन हे पेशवेकालीन देऊळ पहायला जावे,


हल्लीच्या काळात

रानावनात , डोंगरदऱ्यात भटकंती करतांना, वाट काढत आपल्या इच्छीत स्थळी पोचतांना केव्हा केव्हा गोंधळायला होते, फुटणाऱ्या असंख्य पायवाटॆतुन, गुरांच्या वाटॆतुन नक्की कोणती वाट पकडायची ?

पण आता गाववाल्यांनी हे रस्ते शोधणे सोप्पे केले आहे.

या साऱ्या वाटांवर अनेक ठिकाणी खुणेला सापडतात ती गुटक्याची, पानमसाल्याची वेष्ट्ने. त्यांचा माग काढत जायचे.

बरोब्बर पाड्यावर पोचाल.

Monday, October 25, 2010

पुणे ते मुंबई - प्रवास करायला लागला वेळ फक्‍त १४ तास ४५ मिनिटे.हाती गाडी असावी, साथीला श्री. सुरेश परांजपे यांची सोबत असावी,  साऱ्या मावळप्रांतात भटकंती करण्याची तीव्र इच्छा असावी.

द्रुतगती महामार्ग , प्रवास नुसता एक सुरी. कंटाळा आणणारा.
मुंबईवरुन पुण्याला जायला तसे अनेक मार्ग आहेत, यशवंतराव चव्हाण द्रुतगती महामार्ग, राष्ट्रीय महामार्ग क्र. ४ हे तर रोजचेच झाले.
 सारे आयुष्य याच मार्गी प्रवास करायचे ?

पाली, रवाळजे, भिरा, ताम्हीणी, मुळशी अश्या मार्गे प्रवास करतांना मधे उजवी कडॆ फुटणारे रस्ते खुणवत होते. घुसळखांबला बाहेर पडणारा, भांबुर्ड्याला बाहेर पडणारा, पवनाकाठाने जात जात  लोहगडच्या कुशीतुन लोणावळ्याला बाहेर पडणारा, असे एक ना अनेक रस्ते.

कधीतरी या रस्तातुन सह्याद्रीचे रुप न्हाहाळत जायचे होते.
 भीरा पॉवर हाऊस डोंगरमाथ्यावरुन पहायचे होते, वरुन मुळशी तलावाचे सौंदर्यांची मजा लुटायची होती.

प्लस व्हॅली, ( काय जबरदस्त लोकेशन आहे ) नीवे-वांद्रे रस्ता, पिंपरी ,माले गाव येथील धरण, परांते वाडी,  मुळशी , ताम्हीणी ,काळुबाईची देवराई. रवाळजे येथील धरण, पालीचा बलाळॆश्वर, पालीजवळ पेशवेकालीन मंदिरात असणारा सिद्धेश्वर , आणि मुख्य म्हणजे बरेच वर्षे न खाल्लेला वडखळ नाक्यावरचा बटाटावडा.

ना डोळे थकले ना सतत गाडी चालवुन शरीर व मन.

" क्षणभर विश्रांती "

"क्षणभर विश्रांती " नको रे बाबा.

या उपहारगृहाची संपुर्ण रयाच गेली आहे, अगदी अवकळा आलेली आहे.

याचे सोनेरी दिवस मागे सरलेले आहेत  की काय.

त्या समोरच्या रांगेत आहे ते अंधारबनबहिणीला भाऊ मिळेल

"तुमच्या चेहराच सांगतोय " नी झालेली  सुरवात. भावाला बहिण मिळेल, बहिणीला भाऊ मिळेल, अस्से होईल , तस्से होईल . तुमच्या नशिबी भरपुर पैसा आहे, पण , ऐकणारे मनोमनी खुष झाले पाहिजेत.


पुरे आता.

राजाभाऊंच्या बायकोने सज्जाड दम भरला.


"पुरे आता, तुझे थोडक्यात समाधान नसते ना ! "


आणि मग खरोखरीच राजाभाऊंनी हात आवरता घेतला.

ज्या साठी केला होता सारा अट्टाहास.

आता खानदेशी पुरणाचे मांडे खाण्यासाठी वर्षभर  भीमथडी जत्रेची वाट बघायला नको.
हा महिला बचत गट आपल्या घरी येवुन आपल्याला मनोसोक्त मांडॆ खायला घालु शकतात आणि ते देखिल केवळ माणसी शंभर रुपयात.  भिमथडीचा दणका ?

सरस पुढे सरक.
आता पुरती वाट लागली, ही इथे थांबते की काय .
हुश्श.


हुश्श.  लहान सहान खरेदी , वांदा नाय.


बैल पण निवांत आणि मालक देखील.

बैल पण निवांत आणि मालक देखील.


छुपा चांद जाकर को मेरा कहा है

वही चांदनी है वही आसमां है बहारे वही है वही गुलसीता है

मगर जिससे रोशन ये दिल का जहां है छुपा चांद जाकर को मेरा कहा है ||

काही दिवस उजाडतात ते त्या दिवसाच्या मुडला साजेसे असे एकादे गाणे आठवत, ते गाणे आपल्या आवाजात ( जो फक्‍त आपल्यालाच ऐकवतो तो )गुणगुणत रहाण्यासाठी ( आणि किती काळ गुणगुणत रहावे मी म्हणते माणसानी )

तलतचे हे गाणे मस्तं आहे.

पैसे कमवण्याची उत्तम संधी

Thursday, October 21, 2010

येथे ..

येथे खरेदी करण्याबरोबर नुसते भटकत रेंगाळत रहाण्यात ही मौज असते. 
नारायणगाव. आठवड्याचा बाजार.
सारी लगबग केवळ दसऱ्याचा मुहुर्त गाठण्यासाठी

नही ! यह मै नही देख सकता ।

नको नको. खरच नको.
जरा  मनावर आणि जीभेवर ताबा ठेवा, राजाभाऊ.आज फक्‍त देवीचे विलोभनीयरुप डोळे भरभरुन न्याहाळायचे व त्यानेच पोट भरायचे.
रामकृष्ण म्हणतातं तसे " आमाय मा, हे आई , आम्हाला तुझ्या प्रेमाने , तुझ्यावरील भक्तीने पागल कर "

Wednesday, October 20, 2010

नशिब माझं

नशिब माझं.

माझे खापरपणजोबा नोकरी करत होते.

नशिब माझं

माझे पणजोबा नोकरी करत होते

नशिब माझं.

माझे आजोबा नोकरी करत होते

नशिब माझं

माझे वडील पण नोकरीच करत होते ( आणि ते राजकारणात नव्हते )

राजाभाऊ नोकरी करतात पण

पण,  त्यांचा मुलगा नोकरीच करेल का ते मात्र सांगणे कठिण.

कोठेतरी  ही साखळी तुटायला हवी.

तरी तर्कु तोची फरशु । नीतीभेदु अंकुशु । वेदान्तु तो महारसु । मोदकु मिरवे ॥


भुलेश्वराच्या गाभाऱ्याबाहेरील भिंतीवर वरच्या बाजुला हे गणॆशरुप आढळले.

तसं याकडॆ लक्ष जाणॆ थोडे कठिण.
समोरासमोरील दोन भिंत, परत त्यातले अंतर कमी .
हा फोटो काढण्यासाठी जरा कसरतच करायला लागली.
राजाभाऊंनी एका सदगृहस्थांना वर अवघड जागी चढुन हे फोटो काढण्याची विनंती केली.

कल्याणमस्तु

राम राम पाव्हणं

काय कसं काय ? यंदाला पाऊसपाण्याची काय हालहवालं ?

आहे मनोहर तरी .....

बागडायला भलेमोठाले कुरण, त्यावर पसरलेले हिरवे लुसलुशीत , कोवळे गवत. मनोयोग्य त्यावर ताव मारावा, हवे तेवढे , हवे तसे त्यावर धावावे, लोळावे, बागडावे , काय वाट्टॆल ते करावे.पण.

पण, या मनोहरी दृश्यात एकचं अडचण मनोभंग करणारी.
निर्भेळ सुख ???????

बागडायला भलेमोठाले कुरण, त्यावर पसरलेले हिरवे लुसलुशीत , कोवळे गवत. मनोयोग्य त्यावर ताव मारावा,  हवेतेवढे त्यावर धावावे, लोळावे, बागडावे , काय वाट्टॆल ते करावे.


पण.

पण या मनोहरी दृश्यात एकचं अडचण मनोभंग करणारी.

क्यों मियां ?

२१ व्या शतकाकडुन १३ व्या शतकाकडॆ
एखाद्या सौदर्याचे विद्रुपिकरण कसे करावे हे आपल्याकडुन जगाने शिकावे. सुंदर देखण्या प्राचीन दगडी वास्तुंना बटबटीत ऑईल पेंट फासावा, त्याच्या ठिगळॆ लावल्यागत त्याला लागुन एखादे बांधकाम करावे.

१३ व्या शतकातले अप्रतिम भुलेश्वरची कलाकुसरीनी नटलेली वास्तु. त्यालाच खेटुन उभा केला गेला दळणवळण मनोरा, डोळ्यात खुपणारा, जेजुरीपासुन ते भुलेश्वरापर्यंत पसरलेल्या डोंगररागेंत आपल्या सरकारला केवळ हीच जागा सापडावी ?