Saturday, October 02, 2010

एखाद्या दिवशी

हौसेने एखाद्या दिवशी सर्वांना घेवुन आपल्या आवडीच्या ठिकाणी जेवायला जावे आणि त्या दिवशी काहीतरी बिघडलेले असेल.

जेव्हा सर्वांना खुप खुप भुक लागली असते अश्याच वेळी नेमके जेवण समोर अगदी संथगतीने येत रहाते. ( की तसा भास होतो ? ) आणि मग आलेल्या जेवणाची चव पण मग बेसुरी लागायला लागते .

कॉपर चिमणी, ओबेरॉय मॉल, गोरेगाव.


राजाभाऊंची नवी खोज. कॉपर चिमणी, क्रिम सेंटर , राजधानी आणि मॅड ओव्हर डोनट्स.

आलु चटणीवाले आणि मकाई मलई शीग आणेपर्यंत कसे सर्व व्यवस्थित चालले होते.


पण मलई कोप्ता आणि काबुली नान आणेआणेपर्यंत मग जेवणाची इच्छाच कमी होत गेली.

इथले काबुली नान मस्त असतात.

परवाला जाणवले, येथल्या पेक्षा वरळीचेच मुळचे कॉपर चिमणी सरस आहे. आणि वरळीच्या आताच्या जागेत असलेल्यापेक्षा मुळाचे जे नॅब मधे होते तेथले जेवण तर अप्रतिम होते.

असाच काहीसा अनुभव फिनीक्स मिल मधे असलेल्या कॉपर चिमणीमधे आला. तेथले वातावरण बघुन मग जेवावेसे वाटले नाही. अश्यावेळी बाहेर निघुन येणे उत्तम. राजाभाऊंनी तेच केले.  ( अश्यावेळी मग त्यांचा मुलगा ज्याम वैतागतो ).

पण जेथे आपल्याला प्रसन्न वाटत नाही अश्या ठिकाणी न जेवलेले बरे.

1 comment:

♪♪♥ Prasik ♥♪♪.. ♪♪♥ प्रसिक ♪♪♥........ said...

उशीरा जेवण आलं म्हणून फोटू काढलेत?? BTW या लेट करंट खानावळीबद्दल पूर्वसूचना दिल्याबद्दल धनस