जास्त आनंद कशाचा झाला असेल ?
रामराया फळल्याचा (नशिब त्या दिवशी काही गडबड झाली नाही ) , मारुतीराया पावल्याचा आणि नविन गाडी चालवण्याचा ?
की
http://kaimhanta.blogspot.com/ च्या Ugich Konitari यानी खास या वर लिहिलेल्या या अप्रतिम कवितेचा ?
मुंबईच्या
खड्डे सुशोभित रस्त्यांवरून
विहारताना अनेकदा
त्यांना स्वप्न पडे
त्यांना उचकी लागे
कुणा एका हवेतून उडणाऱ्या गाडीची आठवण ......
हळूच आळस देउन सुरु होणारी
श्रीखंडात डाव फिरावल्यासारखे गियर्स टाकणारी
आणि
शिजलेल्या पुरणात डाव उभा राहतो तशी ब्रेक लावणारी
उलटी जातांना "सारे जहांसे अच्छा " आळवणारी ,
सुलटी जातांना सीडी वर गझल ऐकवणारी ......
आणि ते मारुतीरायाला शरण गेले .....
मग साक्षात भीमरुपी गदा उचलून म्हणाले,
"भक्ता, आम्ही तुझ्यावर खुश आहोत ,
ह्या वाढदिवशी तुला
सही ला पेन मिळेल
चालवायला लेन मिळेल
एस्तीलो ची झेन मिळेल...
तथास्तु !"
1 comment:
see This !
Post a Comment