Monday, October 18, 2010

भुलेश्वरचे लावण्य

दसरा आला. राजाभाऊंची बायको राजाभाऊंना म्हणाली,  "आज दसरा . किती लोळत पडाल ? उठा आता, चला फिरायला जावु, अजुन पर्यंत नव्या गाडीचा फील काही आलेला नाही. तो घेऊ, देवदर्शनही करु. "
गेले कित्येक दिवस राजाभाऊ याच क्षणाची वाट बघत होते. कधी एकदा आपली बायको हुकुम सोडते आणि आपण तडक सुटतो याची.

नाहीतरी भुलेश्वरचे देखणॆ, लावण्यमय शिल्प त्यांना साद घालतच होते.

मग काय, थेऊरच्या गणपतीचे दर्शन घेवुन गाठले थेट यवत जवळील भुलेश्वराचे अप्रतीम शिल्पकलेने नटलेले लोभसवाणं, तेराव्या शतकातील यादव काळात घडलेले मंदिर. यवतच्या अलिकडॆ उजवीकडॆ माळशिरसला जाणारा रस्ता. मस्त रस्ता. छोटासा मोहक घाट. पावसाळ्यानंतरचे आल्हाददायक वातावरण आणि सोबत ती.

मोहात पाडणारी.


या डोळ्यात भरभरुन साठवणाऱ्या शिल्पांचे अवलोकन करण्याआधी एक अनपेक्षित घटना घडली. थेऊर देवस्थानामधे त्यांनी भोजनाचा उत्तम प्रबंध केला आहे, त्याचा लाभ त्यांनी घेतला, ह्या अश्या रुचकर जेवणाची व्यवस्था देवस्थानानी केली आहे याची जरा देखिल कल्पना नव्हती.
भुलेश्वरला पोचेपोचेपर्यंत दुपारचे जवळजवळ बाराएक वाजले असावेत. चक्क थंडगार आल्हाददायक वारे सुटले होते. वाटलं नव्हते येवढे छान वातावरण असेल असे. आलेल्या रस्तानी परत जाण्याचा राजाभाऊंना कंटाळा, मग ते माळशिरस मार्गे जेजुरीला पोचले, मोरगावच्या मोरेश्वराचे दर्शन घ्यावया.

1 comment:

Unknown said...

Hello Kaka,

Genuine request from me: Dont publish such nice places. Ppl end up makeing them a picnic spot. I know this place from last 7-8 years..However never put any pics anywhere..Once nice place was ruined by ppl is "Ghorawadeshwar"..Hope you understand the sentiments..Dont want to see bhuleshwar as a picnic or lover's spot.