Wednesday, October 27, 2010

सुसाळे बेट

ते पलीकडॆ दिसते आहे ते सुसाळे बेट. एक अप्रतिम लोकेशन, मुळशी तलावामधले सुसाळॆ बेट. वरती माथ्यावर एक छोटेसे देऊळ, रात्री वस्तीला. सोबत भवताली दाट काळोख आणि वरती चांदण्यांनी गच्च, भरगच्च भरलेले आकाश.



बेटावर दोनचार घरं.

जाताना चालत. परततांना गाववाल्यांनी होडीतुन पलीकडॆ सोडलेले,
घुसळखांब- पौड रस्तावरील एका गावात.

नौकाविहार, एक असा नौकाविहार. असाच नौकाविहार, अश्याच निसर्गरम्य जागी, अश्याच स्वर्गात नक्कीच पराशर मुनींनी मत्सगंधा सोबत केला असणार.

तरीच.........

दुर्दैव आपले, आपण पराशर नव्हे आणि सोबत नसे मत्सगंधा.

No comments: