Monday, February 28, 2011

अरे ओ रसलोभीया

सहसा राजाभाऊंच्या नगरेतुन या अश्या गोष्टी सुटत नाहे.

पण नाही त्यांच्या लक्षात आलं.

मग त्यांच्या बायकोनी त्यांना दाखवुन दिले.

टेसुल बन फुले.





स्थळ-  ओमेगाच्या दारी, धायरी, पुणे.

फक्त पळसाची फुले, फुले आणि फुले. पाने नावाला देखिल नाहीत. फक्त फुल फुल फुलणे आणि दुसऱ्याला वेडखुळं, नादावुन सोडणे.

उन्हाचा ताप वाढु लायला तसं

साफसफाई

हे धोबी जगभरल्या लोकांचे कपडे साफ करत असतात, पण त्यांना पण कोणीतरी दुसरा लागतो.



आपले कान साफ करायला.

सयाजी - पुणे

ह्या राजाभाऊंना लागलयं खुळ, एकतर एकच. एखादी गोष्ट त्यांना भावली की ती गोष्ट परत परत ते करत रहातात.

पुण्याला आपल्या घरी केव्हा एकदा पाहुणे मंडळी येतात आणि आपण त्यांना सयाजी मधे जेवायला घेवुन जातो .



ते असे खाण्याचे फोटो काढत रहातात मग त्यांची बायको , त्यांचा मुलगा त्यांच्यावर चांगलेच वैतागतात.

अजुन पर्यं त्यांना ह्याचा सवय कशी बरे झालेली नाही हा एकच प्रशन राजाभाऊंना सतवत रहातो

भक्ती तुझे कल्याण असो. "मारुतीराया आजीवली मधे."

माटुंगम

राजाभाऊंची बायको दुरध्वनीवर राजाभाऊंना म्हणाली " मला खुप आठवण येत आहे "

झालं. राजाभाऊ सुखावले.

"कितीतरी दिवस झाले कोकोनट शेवया खालेल्या नाहीत. 

राजाभाऊंचे विमान खाली आले.

मग त्यांनाही जाणवले आपण बऱ्याच दिवसात पोंगल अवीयल खालेल्ला नाही.  

मग ते पोचले त्यांच्या आवडीच्या ठिकाणी राम आश्रय मधे. सकाळी सकाळी साडॆसात वाजता.




जरा देखिल उसंत नाही, भुकेने खवळलेल्यांची तृप्ती जी करायची आहे



आली आली पार ..

तामिळनाडु, केरळ मधुन ट्रक भरभरुन भरभरुन भल्यापहाटे माटुंग्याचा मार्कॆट मधे ही केळी पोचतात, मग ती खाली उतरवण्याची लगबग चालु होते.




खाली मुंडी आणि रस्ते धुंडी

मायबाप सरकारने रेल्वे स्थानकाजवळ आकाशमार्गीका बांधल्या, कामावर माणसाने सरळ जावे, सरळ यावे, इकडेतिकडे बघु नये.

आता नुसते कच्चे हरभरे खाण्यापेक्षा हे असे भाजलेले चांगले लागतात त्यामुळे मग त्यासाठी खाली जमिनीवर उतरावे लागते.


कधी तरी

लग्नसमारंभात ते वातावरण मंगलदायी करणारया  सुरांकडे गडबडीत नेहमीच दुर्लक्ष होते. कधीतरी त्यांच्या जवळ बसुन ते नुसतेच ऐकत रहावे.

गुळी, गुळोबा उर्फ सुभाष

गुळीचे खरे नाव सुभाष आहे हे आता कोणाच्या लक्षातही नसेल.

"सावलीचं घड्याळ " हे अशोक कोतवालांचे पुस्तक वाचले, म्हटले आपल्या आजुबाजुला अशी कित्येक कष्टकरी माणसे असतात, ज्यांच्यामुळे आपल्या खांद्यावरचा भार कितीतरी पटीने कमी होत असते अश्यां बद्द्ल आपण आज कृतज्ञा व्यक्त करुया.



गुळोबा. 

 आयुष्यभर त्याला बघत आलोयं. जसा आहे तसा, काहीही फरक नाही. फरक एकच पडला, आधी गाड्या दुरुस्त करणाऱ्यांचा मदतनीस होता, पण ते कामंच बंद झाले, मग गाड्या धुणे. 

काय बिशाद आहे त्या धुळीची, डागाची एकदा सुभाषचा हात गाडीवरुन फिरल्यानंतर गाडीवर रहाण्याची. 

अगदी साधाभोळा. "वेळ नाही, वेळ नाही, वेळ नाही, मी करणार नाही ", किंवा खालुन" पैसे टाक, पैसे टाक" या ओरडण्याकडॆ जरा कानाडोळा करुन त्याच्याची बोलावे लागते.

 मग काय. गाडी हसु लागते.

या कामात असे किती पैसे मिळत असावेत ? पण केव्हाही बघावे गुळी गरीबीतही सदैव हसतमुख असतो.

गुळीच्या  हातुन गाडी धुतली जावी निदान यासाठी तरी नविन गाडी घ्यायला हरकत नाही. 

डुलकी

अष्टविनायक यात्रेत जेवण - २

महड चा गणपती.

येथेपण प्रसादाचे जेवण जेवायचेच असा निर्धार राजाभाऊंनी केला, दर्शन झाल्याझाल्या ते भोजनगृह शोधायला
निघाले.

या वेळे पुरते सर्वकाही ठिक होते.
पण ..



हाय राम.

अष्टविनायक यात्रेत जेवण - १

अष्टविनायक यात्रेत थेऊरला प्रसादाचे भोजन राजाभाऊंनी घेतेले आणि सिद्धटेकला देखील.

सिद्धटेकला त्यांच्यावर एक विचित्र प्रसंग ओढावला. जेवणाची कुपने घेवुन ते चौघेजण जेवण घ्यायला गेले, थोडावेळ त्यांना थांबायला लागले, ताटॆ धुवुन येत होते आणि त्यांचे नशिब एवढे चांगले की फक्त त्यांच्याच पुरते जेवण शिल्लक होते.

ताटे धुवुन आणली तेव्हढयात एक कुटुंब मधेच त्यांना बाजुला सारुन पुढे घुसले आणि वाढणाऱ्याच्या हातातुन तो "जेवण फक्त ह्यांच्या पुरते शिल्लक आहे, तुम्ही कुपने पण घेतलेली नाहीत"  सांगत असतांना देखिल ताटे घेतली.

आता काय करायचे ?

त्यांच्या हातातुन ताटे कशी मागुन घ्यायची ? किंवा त्यांच्या तोडांचा घास आपण कसा  काढायचा ? आणि आपण उपाशी देखिल कसे रहायचे ? दिवसभर गाडी चालवायची आहे.

मग त्या गृहस्थांना काय वाटले देव जाणे, त्यांनी ताटे परत केली . जरा वेळ थांबा, तुमच्या जेवणाची सोय करतो या सांगण्याकडे दुर्लक्ष करुन ते निघुन गेले.

धोबी घाट.

अहो राजाभाऊ, तुमच्या जाण्यायेण्याच्या वाटेवरला धोबीघाट. त्यावर दुसरे येवुन चित्रपट काढतात आणि तुम्ही उभ्या आयुष्यात एकदाही पहायला जाणॆ तर शोडा पण खाली नजर वळवुन पाहीले देखिल नाहीत हे धोबीघाट काय प्रकरण आहे ते ?

अहो राजाभाऊ, परदेशी पाहुणे मुंबईमधे येतात आणि नविन आकर्षणाचा बिंदु झालेल्या धोबीघाटला आवर्जुन भेट देतात पुलावर गर्दी करत ,  आणि तुम्ही उभ्या आयुष्यात एकदाही पहायला जाणॆ तर शोडा पण खाली नजर वळवुन पाहीले देखिल नाहीत हे धोबीघाट काय प्रकरण आहे ते ?


शेवटी आपल्या जवळ जे आहे त्याची आपल्याला किंमत नसते हे खरे आणि पिकते तेथे विकत नाही हे ही खरं.

असा हा वसंतसखा जगज्जेता अनंग तुमचे कल्याण करो ! मंगल करो !

पांगारा हळुच डोकावु लागला  आहे

 कैलाशपती आपल्या अस्तित्वाची जाणिव करुन देत आहे 

आणि काटेसावर,  ती तर साऱ्या रसायनी परिसरावर. मुंबई-पुणे महामार्गावर, खंडाळा घाटात चांगलीच फुलुन राहिली आहे.

Sunday, February 27, 2011

असा श्रुंगाराची मंत्र देणारा गुरु , मदन मित्र वसंत , तुमचे कल्पांतापर्यंत कल्याण करो



प्रदिप्त वह्हीसारख्या,
वाऱ्याने हलविलेल्या,
व पुष्पसंभाराने नत झालेल्या,
अश्या पलाशवृक्षानी व्यापलेली ही धरणी,
या वसंतकालात
लाल अंशुंक धारण केलेल्या
एखाद्या नवोढेप्रमाणॆं भासत आहे !

पोपटाच्या चोचीसारखा
लाल पलाशपुष्पांनी
हृदयें विदीर्ण होत नाहीत की काय ,
अथवा
ती कर्णिकार कुसुमांनी
ती दग्ध होत नाहीत की काय म्हणून
हा कोकीळ पुन्हा आपल्या मधुर कूजनाने,
सुमुखींनी आकृष्ट केलेल्या
तरुणांच्या अंतःकरणावर
 घाव घालीत आहे.

ऋतुसंहार - कालीदास
अनु, ज्ञानेश्वर कुलकर्णी.

Saturday, February 26, 2011

आज

आज राजाभाऊंनी एक काम आनंदाने केले.

काम , राजाभाऊ आणि ते पण आनंदाने ?

फुड टेस्टर राजाभाऊ.

हाण गणफुले हाण.

राजाभाऊंची बायको राजाभाऊंना म्हणाली, "चालु द्या तुमचे आपले चालु द्या."

आज राजाभाऊ लग्नाला गेले.



समारंभस्थळी पोचल्यावर त्यांनी आपल्या बायकोला स्पष्ट सांगीतले. ( काय पण धाडस )

मला तुझी परवानगी हवी. 
अगं, परवानगी गं.
ऐकुन तर घे मी काय 
अरे पण. 
ऐक ना ग.

आज मला दोन गोष्टीत सुट द्यायची. जरा देखिल अडवायचे नाही. 
पहिली म्हणजे जिलेबीवर आणि कटलेट वर जेव्हा मी आडवा हात मारीन तेव्हा मला अडवायचे नाही , आणि
सैरभैर ...

(अशी दुसरी कोणती गोष्ट राजाभाऊंना करायची होती ? )



वनिता समाज. 
पटवर्धनांचे जेवण. 
अळुचे फदफदे, मसालेभात तोंडली घातलेला, पंचभाज्यांची भाजी, वटाण्याची उसळ आणि जिलेब्या, कटलेटस.



टॉमेटो सुप आणि ब्रेड क्रम्स

नुसते ब्रेड क्रम्स घालुन टॉमेटो सुप पिण्याचे दिवस आता केव्हाच मागे सरले आहेत

नॉरचे थीक टॉमेटो सुप.

गाजर, फरसबी, फ्लॉवर आदी भाज्या उकडुन अगदी फाइन चॉप कराव्यात त्यात टाकण्यासाठी

मग चीज किसुन त्यात टाकावे, थोडा पास्ता देखील हवा.

ब्रेड क्रम्स तर असणारच.

वरती क्रीमनी काढलेली नक्षी आणि भुरभुरलेले ऑरीगॉनो.

आस्वाद घ्यावा चमच्या चमच्याने

Friday, February 25, 2011

कसं व्हायचं

एका वेळी दोन भिन्न टोकाची पुस्तके वाचायला घेतली की कसं व्हायचं ?

आयला , काय लिहलयं हे  ? बिंदासपणा बिंधास्तपणा म्हणजे किती ? " आदिमायेचे ... ! " लेखक राही अनिल बर्वे.

हा मात्र जरा जास्तीचाच डोस.


"सावलीचं घड्‍याळ " अशोक कोतवाल , अवतीभोवती वावरणाऱ्या व्यक्‍तींबद्दल. शांत आणि सौम्य लेख.

Thursday, February 24, 2011

बदमाश

बदमाश.

राजाभाऊ आपल्या बायकोला "बदमाश " का बरं म्हणाले असतील ? आणि ते ही संतापाने म्हणाले असतील का प्रेमापोटी कौतुकाने ?

आपल्या उदरी एकही काजु पडु नये , ओल्या काजुगरातील उसळीतला ?(खरोखरचे ओले काजुगर होते का ?)



 आता ओल्या काजुगरांची उसळ तिला परमप्रिय म्हणुन काय झाले ? आपल्या प्रिय माणसासाठी किमान , निदान चाखण्यापुरती तरी ठेवयला हवी होती की नाही ?

ग्लोबल कोकण - झगमगाटच जास्त की काय ? ?

सर्वात तीन गोष्टी अप्रतिम.

आपली अमुल्य कला सादर करणारे हे सारे कलावंत, मस्त धमाल. कित्येक न पाहिलेले कलाप्रकार. दुसरी गोष्ट म्हणजे कलाप्रदर्शने, फोटोग्राफीचे आणि नामांकात चित्रकारांची चित्रं.

राजाभाऊंना दोन गोष्टीत जास्त स्वारस्थ.

पर्यटन आणि खाद्यपर्यटन. दोन्हींनी फार निराशा केली. खाद्यपदार्थाचे मोजकेच पाच सहा स्टॉल. वास्तविक पहाता या ग्लोबलपणात खाणे पण कसे कोकण ग्लोबल हवे होते, आणि त्यात मांसाहारच जास्त. शाकाहारात फक्‍त काळ्या वाटाण्याची उसळ आणि वडे, घावनं , काजुगराची उसळ आणि साखर भात, बस्स. सर्व आत जास्त निराशा झाली ती उकडीचे मोदक न मिळाल्याने आणि कोकणाची इतक्या विविधतेची, वैशिष्टपुर्ण खाद्यसंस्कृतीची जरासुद्धा ओळख झाल्याची.

पर्यटनातही तसे फारसे हाती लागले नाही.
कोकण लई महाग. नागावच्या एका गृहस्थानी तर माणशी अडीच हजार सांगितले, तिघांचे साडे सात हजार आणि ते पण नागाव मधे ? डॉ. आठवलेंच्या बंगल्यात माणशी पंचाहत्तर रुपये व श्री. महाजनांकडॆ ३०-३५ रु. जेवण जेवणाऱ्या राजाभाऊंना हे कसे रुचेल ? कोकणात अनेक ठिकाणी जे घरगुती पर्यटन आहे त्याची माहिती मिळेल असे वाटले होते. पण.

ता.क.
On second thought

आज बायको काल जे काही पर्यटनावरचे साहित्य गोळा करुन आणाले होते ते वाचत बसली आहे.  खुष होवुन नव्या सहलीचे बेत आखत आहे. घरगुती रहाण्याची सोय. 

Sunday, February 20, 2011

सब मिल गावो बसंत की मुबारक


काटॆसावर पेटु लागलीय.




हे प्रिये,
कामीजनांचे  हदय विदिर्ण करण्यासाठी,
विकसित आम्रमंजिरांचा तीक्ष बाण
व भ्रमरमालेची मोहक प्रत्यंचा असलेले
धनुष्य घेवुन
हा
वसंतवीर आलेला आहे

वृक्षावर फुले उमलत आहेत
सरोवरात कमले उगवत आहेत
नारी कामोत्सुक होत आहेत.
पवन सुगंधित होत आहेत
संध्या सुखदायी होत आहेत
आणि दिवस रम्य असतात
अश्या या वसंतात
हे प्रिये सगळॆच कसे
होवुन जाते अति सुंदर !

वापीतले जल,
रत्नखचित मेखला
चंद्राचे चांदणे
कामी प्रमदा
मोहराने वाकलेला हा वसंत
सौभाग्यदायी होत आहे.

आम्ररस पिऊन मस्त झालेला
कोकीळ -
प्रेमाने प्रमुदित होवुन प्रेयसीचे चुंबन घेत आहे
कमलामधला गुंजारव करणारा
मधुकरसुद्धा
प्रियेला प्रिय अशी आर्जवे करीत आहे.

आम्रवृक्षाच्या शाखा
कोवळ्या लाल पानांमुळे वाकलेल्या आहेत,
मोहोर लागल्यामुळॆ सुरेख दिसत आहेत
व वहाणाऱ्या वाऱ्याबरोबर डोलत आहेत
असा हा आम्रवृक्ष
प्रज्वलीत करीत आहे
कामेच्छा कामिनीच्या काळजात

कांतेच्या वियोगाने दुःखी झालेले पांथस्त
बहरलेल्या आम्रवृक्षाला पाहुन
डोळे झाकुन घेतात
हाताने नाक दाबुन धरतात
रुदन करतात, शोक करतात
उच्चरवानें विलाप करतात.

- ऋतुराज - ज्ञानेश्वर कुलकर्णी -  महाकवी कालिदासाच्या " ऋतुसंहार " या काव्याचे रुपांतर

तुंग तिकोना

म्हटंल , शिवजयंतीला निदान पायथ्याकडुन का होईना एखाद्या किल्लाचे दर्शन घेवु.


शिवज्योत निघाली

सिंहगड ते बहुदा कोथरूड.

केव्हा लागायचा आता गळाला मासा ?

एकच प्याला

नाही, एकच प्याला पुरते पिणे मर्यादित राहिले नाही, दुसरा प्याला पण रिचवावा लागला.

उसाच्या रसाचा,

भैरवनाथ रसवंतीगृहात.

मुलगी शिकली प्रगती झाली


केव्हा होणार "नवनिर्माण"

केव्हा होणार "नवनिर्माण"

वाटलं होत आता या खेपेस या महापुराकडे दुर्लक्ष करायचे. पाहुन न पाहिल्या सारखे करुन सर्वांप्रमाणे पुढे निघुन जायचे. 






आपल्या पक्षाचे नगरसेवक, आमदार, खासदार निवडुन आल्यावर त्यांना घेवुन एकविरा देवीच्या दर्शनाला मिरवणुकींनी येणाऱ्यांच्या नजरेत संपुर्ण कार्ला गडाला पडलेला हा प्लास्टीकचा विळखा कार्यकर्त्यांच्या , नेत्यांच्या भीड मधे कुठुन पडायला आलाय ?

ठाकरे घराण्याची कुलदेवता असलेल्या या एकविरादेवीच्या स्थानाची अनावस्थेमुळे झालेली अवस्था खुप वाईट आहे.



परत येथे नुसतेच देऊळच नाही तर येथली लेणीही एकवेमद्वितीय आहेत. 

गरज आहे ती या साऱ्या परिसरात प्लास्टीकच्या पिशव्यांना बंदी घालण्याची, पातळ पिशव्यात ओटीचे सामन भरुन देण्याऱ्यांना व घेवुन त्या पिशव्या तशाच वाऱ्यावर सोडुन देणाऱ्यांना जबरी दंड करण्याची.

गरज आहे ती दोन्ही भावंडांनी निदान या देवीच्या कामापुरते तरी एकत्र येवुन आपल्या सैंनीकांना आदेश देवुन या साऱ्या परिसरातील प्लास्टीक नी प्लास्टीक वेचुन तो साफ करुन घेण्याची.     

ट्रेकर्स डायरी. श्री. रोहन चौधरी. पुणे टाईम्स. दर शनिवार.

ट्रेकर्स डायरी. श्री. रोहन चौधरी. पुणे टाईम्स. दर शनिवार. 

पुन्हा जुन्या सुखद , आनंदमयी आठवणी जाग्या करुन राहिल्यात. 

जी.ए. म्हणतात तसे , फक्त भुते आणि आठवणींना उलटे पाय असतात.

रोहन, समस्त ब्लॉगधारकांचे लाडके, भन्नाट  व्यक्‍तीमत्व. आता तर त्यानी म.टा. द्वारे साऱ्यांचे मन काबीज केले  , ट्रेकर्स डायरी मधुन.

किल्ले रायगड. किल्लांचा किल्ला. बुलंद गड.  शिवप्रेमी मराठी माणसांचे सर्वात मोठे पवित्र तिर्थक्षेत्र. रायगड, ज्याच्या नुसत्या नामोच्चरानी मान आदराने खाली झुकते, लवते ती मनोमनी त्या रायगडाला, स्वराज्याच्या राजधानीला आणि शिवरायांना प्रणाम कराया, मानाचा मुजरा करायला. 

"प्रदक्षिणा किल्ले रायगडची " वाचतांना मन दुसऱ्याच क्षणी वाऱ्यावर मांड ठोकत, स्वार होवुन महागतीने रायगडावर जावुन पोचले, त्वरीत कळ दाबुन भुतकाळात गेले, आणि मग ती चिंचोळी वाट दिसु लागली, वाघोली खिंडीत झालेली दमछाक आठवु लागली. पण त्या श्रमात ना मन दमले होते ना थकले होते शरीर. पवित्र स्थानी नेहमीच प्रसन्न वाटत रहाते व या प्रसन्नावस्थेत कधी , केव्हा शीण जाणवतो काय ? 


वर्ष १९७६-७७. श्री. सोमनाथ समेळ, तुकाराम जाधव आदी शिवप्रेमींनी राज्याभिषेकाला ३०० वर्षे झाल्या निमीत्ते महाराष्ट्राला एक नवी जाणिव करुन दिली की आपल्या श्रद्धास्थानाला आपण प्रदक्षिणा घालु शकतो याची. आणि वरती प्रदक्षिणा देखील लागलीच आयोजीय केली.

 राज्यातुन त्याला प्रचंड प्रमाणात साथ मिळाली, शिवप्रेमींचे पावले या पंढंरी कडे आपसुक वळली, हे काहीतरी नविन घडत होते, या उपक्रमास फार भरभरुन साद , प्रतिसाद मिळाला. मग दरवर्षी ही वारी सुरु झाली.

वर्ष १९७८. भारवलेले कोवळे राजाभाऊ निघाले आपल्या तिर्थक्षेत्री, रायगडाच्या प्रदक्षिणेला. सोमनाथ समेळांनी, तुकाराम जाधवांनी आयोजीलेल्या. 

पहेला नशा, पहेला खुमार, पहिली सह्याद्रीची अंतरंगातुन जवळुन ओळख., पहिले गिरीभ्रमण, पहिलावहिला ट्रेक. इतकी वर्षे लोटली अजुनही मनात आठवणी ताज्यातवान्या, टवटवीत आहेत, त्या प्रदक्षिणेच्या, किलेश्वर रायगडाच्या. ती त्रिपुरी पोर्णीमेची रात्र. रातच्याला टिपुर चांदण्यांनी, पुर्ण चंद्राप्रकाशाने न्ह्याहुन निघालेला ,चन्द्रकिरणांनी उजळुन निघालेला रायगड. सकाळी केलेले प्रदक्षिणा, आणि मग चांदण्या रात्री सर केलेला मातब्बगार किल्ले राजगड. सकाळचे कष्ट, रात्रीचा किल्ला चढणे, पण खुमखुमी काही गेलेली नव्हती, मन सांगत होते, मागत होते, आणखीन, आणखी हवे, मन काही त्रुप्त होता होत नव्हते, पाठपिशवी टाकली आणि मग चारपाच मुसाफीर निघाली रात्रीचे रायगडाचे रुप न्हयाळायला. मग केव्हातेरी पहाटे दमलेले, भागलेले, वारकरी जावुन महाराजांच्या समाधीपाशी निवांत बसले, गप्पा काही  संपत नव्हत्या, मग मधेच एखादी डुलकी. छोटीसीच डुलकी, परत लवकर ऊठुन रायगड पहायचा होताना. झोपुन कसे चालेल ?


येथेच त्यांची ओळख झाली आणि मग दोन छान मैत्रीणी मिळाल्या. मग त्या ज्या गिर्यारोहण संस्थेंच्या सभासद होत्या त्या संस्थेमधुन भ्रमंतीस जाणे सुरु झाले.  


Thursday, February 17, 2011

सुकेळी

कोणीतरी राजाभाऊंना  सुकेळी खायला घाला रे.
चव फार आठवुन राहिलीय.

त्या दिवशी घाईघाई मधे घेण्याचा कंटाळा केला.