Monday, February 28, 2011

अष्टविनायक यात्रेत जेवण - १

अष्टविनायक यात्रेत थेऊरला प्रसादाचे भोजन राजाभाऊंनी घेतेले आणि सिद्धटेकला देखील.

सिद्धटेकला त्यांच्यावर एक विचित्र प्रसंग ओढावला. जेवणाची कुपने घेवुन ते चौघेजण जेवण घ्यायला गेले, थोडावेळ त्यांना थांबायला लागले, ताटॆ धुवुन येत होते आणि त्यांचे नशिब एवढे चांगले की फक्त त्यांच्याच पुरते जेवण शिल्लक होते.

ताटे धुवुन आणली तेव्हढयात एक कुटुंब मधेच त्यांना बाजुला सारुन पुढे घुसले आणि वाढणाऱ्याच्या हातातुन तो "जेवण फक्त ह्यांच्या पुरते शिल्लक आहे, तुम्ही कुपने पण घेतलेली नाहीत"  सांगत असतांना देखिल ताटे घेतली.

आता काय करायचे ?

त्यांच्या हातातुन ताटे कशी मागुन घ्यायची ? किंवा त्यांच्या तोडांचा घास आपण कसा  काढायचा ? आणि आपण उपाशी देखिल कसे रहायचे ? दिवसभर गाडी चालवायची आहे.

मग त्या गृहस्थांना काय वाटले देव जाणे, त्यांनी ताटे परत केली . जरा वेळ थांबा, तुमच्या जेवणाची सोय करतो या सांगण्याकडे दुर्लक्ष करुन ते निघुन गेले.

No comments: