आपली अमुल्य कला सादर करणारे हे सारे कलावंत, मस्त धमाल. कित्येक न पाहिलेले कलाप्रकार. दुसरी गोष्ट म्हणजे कलाप्रदर्शने, फोटोग्राफीचे आणि नामांकात चित्रकारांची चित्रं.राजाभाऊंना दोन गोष्टीत जास्त स्वारस्थ.
पर्यटन आणि खाद्यपर्यटन. दोन्हींनी फार निराशा केली. खाद्यपदार्थाचे मोजकेच पाच सहा स्टॉल. वास्तविक पहाता या ग्लोबलपणात खाणे पण कसे कोकण ग्लोबल हवे होते, आणि त्यात मांसाहारच जास्त. शाकाहारात फक्त काळ्या वाटाण्याची उसळ आणि वडे, घावनं , काजुगराची उसळ आणि साखर भात, बस्स. सर्व आत जास्त निराशा झाली ती उकडीचे मोदक न मिळाल्याने आणि कोकणाची इतक्या विविधतेची, वैशिष्टपुर्ण खाद्यसंस्कृतीची जरासुद्धा ओळख झाल्याची.
पर्यटनातही तसे फारसे हाती लागले नाही.
कोकण लई महाग. नागावच्या एका गृहस्थानी तर माणशी अडीच हजार सांगितले, तिघांचे साडे सात हजार आणि ते पण नागाव मधे ? डॉ. आठवलेंच्या बंगल्यात माणशी पंचाहत्तर रुपये व श्री. महाजनांकडॆ ३०-३५ रु. जेवण जेवणाऱ्या राजाभाऊंना हे कसे रुचेल ? कोकणात अनेक ठिकाणी जे घरगुती पर्यटन आहे त्याची माहिती मिळेल असे वाटले होते. पण.
ता.क.
On second thought
आज बायको काल जे काही पर्यटनावरचे साहित्य गोळा करुन आणाले होते ते वाचत बसली आहे. खुष होवुन नव्या सहलीचे बेत आखत आहे. घरगुती रहाण्याची सोय.
No comments:
Post a Comment