Tuesday, February 01, 2011

मग अचानक मुलाचा चेहरा उजाळतो.

एका औषध कंपनीची जाहिरात

बाप परिक्षेचा निकाल घेवुन आलेल्या आपल्या लहान मुलाची त्यच्या वर्गातील दुसऱ्या हुशार मुलाबरोबर तुलना करतोयं.

या विषयात तुला किती गुण मिळाले ? त्याला किती गुण मिळाले ?
त्या  विषयात तुला किती गुण मिळाले ? त्याला किती गुण मिळाले ?
विषयात तुला किती गुण मिळाले ? त्याला किती गुण मिळाले ?

प्रत्येक वेळी मुलगा खाली मान घालुन उत्तर देतो.

 कमी गुण , कमी गुण कमी गुण, 

का ? का ? का ?

मग अचानक मुलाचा चेहरा उजाळतो.

मला एका विषयात जास्त मार्क मिळाले आहेत. 
कारण.

कारण तो परिक्षेला बसलाच नाही. त्याला कांजण्या आल्या होत्या.
मी लस घेतलीय ना, मग मला कांजण्या कश्या होतील ?

निदान लहान मुलांच्या भावविश्वाचा अश्या रितीने तरी गैरवापर  केला जावु नये.



1 comment:

sharayu said...

शाळा-कॉलेजात पहिला क्रमांक मिळविणारे नंतर कोठे गुप्त होतात?