काटॆसावर पेटु लागलीय.
हे प्रिये,
कामीजनांचे हदय विदिर्ण करण्यासाठी,
विकसित आम्रमंजिरांचा तीक्ष बाण
व भ्रमरमालेची मोहक प्रत्यंचा असलेले
धनुष्य घेवुन
हा
वसंतवीर आलेला आहे
वृक्षावर फुले उमलत आहेत
सरोवरात कमले उगवत आहेत
नारी कामोत्सुक होत आहेत.
पवन सुगंधित होत आहेत
संध्या सुखदायी होत आहेत
आणि दिवस रम्य असतात
अश्या या वसंतात
हे प्रिये सगळॆच कसे
होवुन जाते अति सुंदर !
वापीतले जल,
रत्नखचित मेखला
चंद्राचे चांदणे
कामी प्रमदा
मोहराने वाकलेला हा वसंत
सौभाग्यदायी होत आहे.
आम्ररस पिऊन मस्त झालेला
कोकीळ -
प्रेमाने प्रमुदित होवुन प्रेयसीचे चुंबन घेत आहे
कमलामधला गुंजारव करणारा
मधुकरसुद्धा
प्रियेला प्रिय अशी आर्जवे करीत आहे.
आम्रवृक्षाच्या शाखा
कोवळ्या लाल पानांमुळे वाकलेल्या आहेत,
मोहोर लागल्यामुळॆ सुरेख दिसत आहेत
व वहाणाऱ्या वाऱ्याबरोबर डोलत आहेत
असा हा आम्रवृक्ष
प्रज्वलीत करीत आहे
कामेच्छा कामिनीच्या काळजात
कांतेच्या वियोगाने दुःखी झालेले पांथस्त
बहरलेल्या आम्रवृक्षाला पाहुन
डोळे झाकुन घेतात
हाताने नाक दाबुन धरतात
रुदन करतात, शोक करतात
उच्चरवानें विलाप करतात.
- ऋतुराज - ज्ञानेश्वर कुलकर्णी - महाकवी कालिदासाच्या " ऋतुसंहार " या काव्याचे रुपांतर
2 comments:
wah!!
wah
Post a Comment