Thursday, February 10, 2011

साद नीर डोश्याची आणि संत व्हॅलेंटाईन दिवसाची

जेव्हा हिंदु कॉलनीमधे असलेल्या डॉंक्टरांची राजाभाऊंनी भेटीची वेळ ठरवली तेव्हा त्यांच्या डोक्यात पहिला विचार कोणता आला असेल ? 

आपल्या रोगाचे निदान आता डॉक्टर काय करतील व केव्हा एकदाची आपली या जवळजवळ वर्षभर अंगावर काढलेल्या त्रासातुन सुटका होईल याचा की हिंदु कॉलनीतुन सरळसोट पुढे गेल्या नंतर माटुंगा लागते याचा ?    

गेले दहा एक दिवस राजाभाऊंनी आपल्या मनावर व पोटावर ताबा ठेवलेला. नाही म्हणजे नाही , बाहेर उपहारगृहात जायचे नाही , काहीएक बाहेर खायचे नाही (सन्माननीय अपवाद फक्त बी.तांबे यांचा व त्यांच्या कडे मिळणाऱ्या साध्या भोजनाचा ) 

किती दिवस झाले , कोण जाणॆ आपण "राम आश्रय" मधे गेलेलो नाही. राजाभाऊंच्या डोक्यात घंटा वाजु लागल्या. नीर डोसा खायला काय हरकत आहे ? त्यांनी स्वःताला विचारले. तुका म्हणे त्यातल्या त्यात.   


नीर डोसा. सोबत नारळाची चोय. ती लाल चटणी, वातावरण निर्मीतीसाठी नमना आधी जरासे "रसम " आणि मग काफी. ती तर हवीच.




राजाभाऊ राम आश्रय मधुन बाहेर तृप्त होवुन बाहेर पडले आणि मग त्यांना जवळ येत चाललेल्या व्हॅलेंटाईन  दिवसाची आठवण झाली. 

घेऊ का ?

 अग


घेतो ना.
 थांब जरा.



अग 

शेवटी राजाभाऊंच मन तिच्याच्याने मोडवेना.


खुष झालेल्या राजाभाऊंनी मग घरी जाण्यासाठी एक लांबलच्चक गाडी ठरवली, लिमोझीनपेक्षा लांब, ऑल एक्सक्लुजीव. 

फक्त ते आणि ती. 



दुरची ही संपु नये संपु नये अशी वाटणारी सफर केवळ ८० रुपयात.     

1 comment:

Anonymous said...

राजाभाऊ
काळजी घ्या. मी पण सुरु केले आहेच थोडीफार काळजी घेणे. कृपया ऋजुता दिवेकरांचे पुस्तक जरूर वाचा. न मिळाल्यास सांगा, मी देईन तुम्हाला.