Monday, June 30, 2008

पावले चालती पंढरीची वाट

माऊली माऊली




माऊलीच्या रथाजवळ जावुन तिच्या पादुकांचे दर्शन घेण्यासाठी सर्वसामान्यांना किती धडपड करायला लागते. हे असे रथाजवळ जाणे महाप्रचंड गर्दीत दुरप्रायच असते.

डॆक्कनवर, लकडी पुलावर रात्री वारीचे फोटो काढता काढता अवचीत समोर माऊली येवुन उभी ठाकली, येवढे जवळुन विनासायास दर्शन ! सभोवताली रथाभोवती गर्दीस दुर ठेवणारे मानवी कडे व त्या कडयाच्या आत मी फोटो काढण्यात मशगुल असलेला भाग्यवंत.

वारी बरोबर निदान दोन चार पावले तरी चालायचीच ही अनेक वर्षाची इच्छा अचानक पुरी झाली.

Friday, June 27, 2008

आमची अशी इच्छा आहे की ......

आई-वडीलांनी मुलीला पाहीले असते, त्यांना ती आपल्याला सुन करुन घ्यायची असते किंवा मुलाला ती पसंद असते तिच्याशी लग्न करण्याची इच्छा तो पालकांना बोलुन दाखवतो, मग मागणी घातली जाते स्थळाला. मुलीला ही तो पसंद पडतो. लग्न जुळते.

पण.

आमचा हा एकुलता मुलगा, आमच्या घरातील हे पहिलेच शुभकार्य या अश्या अंगाने सुरु झालेली चर्चा मग हे लग्न मोठया थाटामाटात व्हावे असे आम्हाला वाटते , आमचा गोतावळा फार मोठा आहे, आता लग्न म्हटले की सर्वच झाडुन येणार , मग त्यांचे मानापमान, आमचे देणे घेणॆ इत्यादी इत्यादी, बोलणी चालुच रहातात.

आपल्या कडे अगदी मुबलक , बख्खळ पैसा असेल तर वरमायीनी, पित्यानी आपली हौस जरुर पुरवावी, शेवटी पैसा त्यांचा, त्याचा विनीयोग कसा करावा हे ज्याचे त्यानी ठरवावे.

पण

२१ व्या शतकात देखील वरपक्षाकडच्या लोकांना आपले सारे चोचले मुलीकडच्यांनी पुरवावेत असेच वाटत असते. सगंळा खर्च मुलीकडचा, आम्ही फक्त मंगलकार्यालयात लग्न लावायला येणार. अगदी प्रेमविवाह असेल तरी सुद्ध्या, वाईट असे वाटते की ही आधुनीक विचारसरणीची ही मुले देखील अगदी मातॄभक्त, माझ्या आईची इच्छा , आता मी तिला विरोध कसा करु किंवा मुलगी ही विचार करत नाही की आपल्या वडलांना केवळ दोन-चार तासा साठी त्यांच्या आयुष्यभरची पुंजी किंवा त्यांच्या म्हातारपणासाठी उपयोगी पडणारी रक्कम खर्चवावी लागणार आहे.

लग्नसमारंभात किती पैसा खर्चायचा व केवळ जेवणावळी घालण्यातील उधळपट्टी सर्वसामान्यांनी करायलाच हवी काय ? मोजकेच जवळचे नातेवाईक, मित्रमंडळी बोलवुन साधेपणानेही लग्न लावता येते की.

Thursday, June 26, 2008

शामे फ़िराक़


साहित्य संमेलानात मराठी ब्लॉग्जची दखल घ्यावी

आता "साहित्य संमेलनं दक्षिण ध्रुवावर भरवा" ही एकदम टोकाची भुमीका झाली. कोणताही बदल त्वरीत स्विकारण्याची आपली तशी मानसीकता नसते. एखादे वर्षे जर का परदेशी साहित्य संमेलन भरवल तर बिघडते कुठे ? आज जागतीककरणात भौगोलीक सीमारेषा फार धुसर होत चालल्या आहेत, मराठी समाज आज अनेकविध कारणॆ जगभर परसत चालला असुन बऱ्यापैकी परदेशात स्थिरावला आहे. आज वर ही मराठी माणसे साहित्य संमेलनापासुन वंचीत राहीली आहेत. परदेशी राहुनही आपल्या मायबोलीशी हे अजुनही ऋणानुबंध ठेवुन असतात, अनेक प्रकारे साहित्याच्या प्रांतात भर घालत असतात.

आता या परदेस्थ भारतीयांच्या हाती ब्लॉगरुपी नवे माध्यम लागले आहे ज्याद्वारे आपल्या कलाकृतींना ते ब्लॉगमधे प्रकाशीत करत असतात. या साहित्य संमेलनामधे या नव्या माध्यमाची दखल घेणे आवश्यक आहे, ही काळाची गरज आहे, काळ झपाट्याने बदलत चालला आहे. या विषयी अधिकपणे येथे चर्चा व्हायला हवी.
कॄपया वाचा
कसं काय
साहित्य संमेलानात मराठी ब्लॉग्जची दखल घ्यावी

संमेलन काय फक्त भारतातच भरवायला हवीत काय ? या माहीतीतंत्रज्ञानाच्या युगात बेबबेस प्रक्षेपणामुळे प्रवास करण्याची गरजही उरलेली नाही. या नव्या तंत्रज्ञानाचा वापर करुन साहीत्यिक, साहित्य संमेलनं अधिकाधिक जणांपर्यंत पोचु शकतात.

तेव्हा या नव्या युगाचे आपण आनंदाने, वादावादी टाळुन स्वागत करायला हवे. ( तसं बघायल गेल तर वाद आणि संमेलन यांचा अगदी जवळाचा संबंध आहे नाही का )

Tuesday, June 24, 2008

एक वेगळा मार्गावरुन वाटचाल करण्याकरीता

आज या बापाचे पिल्लु मोठ झालय, त्याच्या पंखात बळ येवु पहातय, एक नव्या विश्वात गगनभरारी मारण्यासाठी उडु पहातय.
वैद्यकीय, अभियांत्रीकी, तंत्रज्ञान आदी रुळलेळ्या वाटॆवरुन जायच सोडुन वेड कोकरू "पर्यवरण शास्त्र" घेवुन शिकायचय म्हणून राहलय. बापापासुन दुर जायचय त्याला शिक्षणासाठी.
शाळॆत् असल्यापासुनच हा येकच ध्यास घेवुन राहलेला तो, अनेकांनी त्याला या मार्गापासुन परावृत करण्याचा प्रयत्न केला. मुंबई विद्यापिठात तो S.S.C. ला असतानां एका CAREER FAIR ला त्याला घेवुन गेलो. नामवंत कॉलेजच्या प्राध्यापकांनी त्याला निक्षुन सांगीतले "पर्यावरणाला जावु नकोस , पाच वर्षे शिकत रहायला लागेल, " . दुसऱ्या प्राध्यापकांनी सांगीतले "येथे जाशील तर खाशील काय , या वयात मुले स्वप्नाळु असतात, बारावी होईपर्यंत तुझे विचार बदलतील "
पण नाही जमल त्यांना त्याचे विचार बदलण. तो आपल्या निश्चयाशी ठाम राहीला, यात त्याला साथ होती ती त्याच्या या आटा सटकलेल्या सणकी बापाची व त्याच्या आईची.
आपल्या मुलाच्या मार्गात त्याच्या पालकांनी नेहमीच ठामपणे मागे उभे राहीले पाहिजे नाही का ?

Friday, June 20, 2008

टाटा समुहाचे वेस्ट्साईड आणि धुम्रपान

टाटा समुहाचे नामांकीत वेस्टसाईड नामक तयार कपड्याच्या दुकानांची भारतभर साखळी आहे. एकदा त्यामधील कॅफेमधे मी व माझी लहान पुतणी बसलेलो असतांना शेजारील एक व्यक्ती सतत धुम्रपान करत होती. त्यांना या पासुन परावॄत करण्यासाठी मी तेथील कर्मचाऱ्यांना व अधिकाऱ्यांना विनंती केली पण त्यांनी असमर्थता दाखवली. सार्वजनिक ठिकाणी, उपहारगॄहात धुम्रपानाला बंदी आहे हे त्यांच्या निदर्शनास आणुन देखील त्यांनी आमच्याकडॆ "Smoking Allowed " आहे असे मला उत्तर दिले.



लगेचच त्यांनी मी email पाठवले , उत्तर देण्याचेही त्यांनी सौजन्य दाखवले नाही. टाटा सारख्या जबाबदार ,सामाजीक दायीत्व मानणाऱ्या समुहाकडुन हे अपेक्षीत नव्हते.
Dear Westside,
I am Westside customer from day one. On 19/03/08, while shopping at Westside, 39, N.S. Patkar Marg,Mumbai – 400 007, I noticed one gentleman was smoking continuously in the Cafe . I approached staff at the counter and mentioned about the smoking. I was told that " This is Cafe area and smoking is allowed ".
I then approached higher authority and requested him to restrain the smoker from smoking as the cafe was full of children, women and pregnant women in particular. I also mentioned that it is against the rule of the land to smoke in public places and our union health minister Shri Anbumani Ramadoss is very much against smoking. However he expressed his inability to do so as it is a policy to allow smoking in the Cafe.
I was really surprised and taken a back to know that such a reputed store like Westside which is meant for entire family allows smoking inside Cafe. May I request you to BAN smoking inside WESTSIDE and declare Westside all over the country as a "NON-SMOKING ZONE "
It is our right to a "TOBACCO FREE WORLD"
Regards,

Dear Westside,
Still I am waiting for your reply. I was under impression that socially responsible group like Tata would respond to my request immediately.
May I point out to you that it's unlawful to allow smoking in the Cafe.
Waiting for your reply.
Regards,



हुक्का-पानी बंदी

मुंबईच्या महापौर श्रीमती शुभा राउळ यांच्या अथक प्रयत्नाने अखेरीस राज्य सरकारने महाविद्यालय, शाळा यांच्या जवळ असलेल्या हुक्का पार्लस बर बंदी आणण्याचा कायदा आणला.
तरुण पिढी याच्या नादी लागुन आपल्या आरोग्याची, पैश्याची बरबादी करु लागली होती. या हुक्कामधे तंबाखू, आणि त्याच बरोबर मादक द्रव्ये यांचे मिश्रण असते.
महापौरांच्या या मोहीमेविरुद्ध मधे एका वर्तमानपत्रानी त्यांची खिल्ली उडवली होती. त्यावेळी मी माझ्या ब्लॉगवर सुजाण नागरीकांनी चांगल्या कार्यात त्यांना साथ द्यायला हवी असे लिहीले होते.

’सोनीया’चा दिवस आज गोंधळ पाहीन

सीएम हटाव महाराष्ट्र बचाव च्या घोषणेच्या गजरात हुल्ल्डबाजी काय असते याचे प्रात्याक्षिक काल मॅडमना दाखवण्याचे नाट्य त्यांच्याच कार्यकर्त्यांनी काल सादर केले.
या अश्यांना घेवुन निवडणुका जिंकायच्या आहेत.
All The Best.

हल्ला

आपल्या संपादकांच्या घरावर जवळजवळ महिनापुर्वी झालेल्या हल्लाचे प्रकरण लोकसत्ता अजुनही धरुन ठेवुन रोजच्या रोज खिंड लढवतोय.

दररोज या संबधीच्या बातम्यांनी, निषेधांनी, वाचकांच्या पत्रांनी वर्तमानपत्रात पाने भरभरुन छापुन येतयं.
अजुन किती दिवस तेच तेच आम्ही वाचकांनी वाचत रहाव म्हणतोय मी ?

दुसर एक हल्ला. देशावरचा.

आपल्या मागण्यांकरता समाजातील काही घटक आंदोलन करतात, चागलेच हिंसक. ४३ जणांचे प्राण घेणारे आणि अज्बावधी रुपयांच्या संपत्तीचे नुकसान करुन आपल्या मागण्या मान्य करण्याचे आश्वासन मिळवण्यासाठी. राज्यातील प्रमुख महामार्ग, रेल्वेमार्ग त्यांनी कित्येक दिवस रोखुन धरले. हिंसक चकमकी केल्या .

विरोधाभास असा की या हिंसक आंदोलनाचा निषेध करण्यापेक्षा संपादकांच्या घरावर मुठभर लोकांनी केलेल्या हल्लाला जास्त महत्व.

अर्थात दोन्ही घटना वाईटच. पण .....

Wednesday, June 18, 2008

विक्रम और वेताळ आणि वटपौर्णीमा

आजच्या एकाच दिवशी विक्रम सहसा वॄक्षावर चढुन वेताळाला खाली उतरवण्याच्या भानगडीत सहसा पडत नाही. उंच जागी, झाडाच्या सर्वात वरच्या फांदीवर भेदारलेला फांदीग्रस्तपिडीत वेताळ जावुन लटकत असतो. येवढ्या वर वॄक्षावर चढण्याचे कष्ट विक्रमाला करण्याचे जीवावर येते. आणि त्यात परत आपले घर रहाते की जाते या चिंतेने ग्रासलेला वेताळ बोलण्याचा, प्रश्न विचारण्याच्या मनस्थीतीत नसतो.
तेव्हा आज मीच वेताळाच्या ऐवजी प्रश्न विचारतो.


आजच्या दिवशीच वेताळाला झाडाच्या सर्वात वरच्या फांदीवर आपले बस्तान का बरं हलवायला लागते ?


माझ्या प्रश्न्नाचे उत्तर द्या ......

Monday, June 16, 2008

ब्लॉग-एक प्रभावी माध्यम

आज आपल्या हातात ब्लॉगरुपी एक प्रभावी माध्यम आहे, जगभर अनेक विषयांना या ब्लॉगच्या द्वारे वाचा फोडली जात आहे, पण मराठी बॉगविश्व अजुनही कथा, कविता, स्वानुभव, पाकशास्त्र याच्या पलीकडे फारसा गंभीरपणे विचार करायला मागत नाहीय.
ज्या वेळी मी एखाद्या गंभीर विषयावर लिहीतो, त्या वेळी माझी मनामधे अशी अपेक्षा असते की इतर ब्लॉगर्सही या विषय उचलतील, या विषयी त्यांच्या ब्लॉगचरुन एक चळवळ उभारतील, परंतु असे घडत नाहीय.
नुकतचं मी श्री.शंकर पापळकरांच्या कार्याबद्द्ल, त्यांच्या अपेक्षा बद्द्ल लिहीले होते. हा विषय केवळ एक ब्लॉग लिहीण्यापुरता राहु नये असे मला वाटते.
लोकसत्तेमधला हा लेख माननीय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री पासुंन विधानसभेतील, विधानपरीषदेतील अनेक आमदारांच्या वाचनात नक्कीच आला असणार. एखाद्यातरी आमदारानी पुढाकार घेवुन १८ वर्षावरील भिन्नमती, मूकबधीर, बहूविकलांग मुलांसाठी विधानसभेत, विधानपरीषदेत या विषयाचा अभ्यास करुन बिल मांडावे ही अपेक्षा.
या सारख्या असंख्य विषयांसाठी आपण ब्लॉगर्सनी संघटीत प्रयत्न करायला हवेत.

मर्यादा

ब्लॉगवर लिखाण करतांना काही मर्यादा पाळण्याची , संयम पाळण्याची गरज आहे, विचार स्वातंत्र, लिखाण स्वातंत्र असले तरी लिहीतांना तारतम्य, ताळतंत्र पाळण्याची लिहीणाऱ्यांना भान असायला हवे.
विषेशःता दुसऱ्या ब्लॉगर विषयी आपण लिहीत असतो तेव्हा तुम्ही विनोदाचे अंग जरुर अंगीकारु शकता, पण तो विनोद, ती टिंगळ टवाळी अस्वलाच्या गुदुगुल्यांप्रमाणे जीवघेणी, दुसऱ्याचा भावनांना ठेच लावणारी, त्यांना बोचकारे काढणारी नसावीत.

तलत आणि शकील

कधी कधी वाटतं तलत नी गायलेली गैरफिल्मी गाणी, गजल ही त्यानी गायलेल्या चित्रपटातील गाण्यांपेक्षा जास्त श्रवणीय आहेत. त्यात तलत नी गायलेली व शकिल ने लिहीलेल्या गजल असतील तर मग काय ! बहारच बहार.

दिल के बहलाने की तदबीर तो है
तु नही तो तेरी तसबीर तो है !
हमसफर छोड गये मुझको तो क्या
साथ मेरे मेरी तकदीर तो है ।
गम की दुनीया रहे आबाद "शकील"
मुझ नसींब मे कोई जागीर तो है ।
किंवा
मै "शकील" उनका होकर भी ना पा सका मै उनको
मेरी तरह दुनियामे कोई जीतकर भी न हारे !!

Sunday, June 15, 2008

श्री शंकर पापळकर



आज मी बेहद्द खुश आहे म्हणण्यापेक्षा जास्तच उत्तेजीत झालो आहे. आज मी श्री. शंकर पापळकरांशी दुरध्वनीवर संभाषण केले. श्री शंकर पापळकर यांची ओळख तशी संगीताच्या बॉगवर झालीच होती.

आजच्या फादर्स डे चे औचीत्य साधुन सुधीर जोगलॆकरांनी चतुरंग, लोकसत्ता मधे "सव्वाशे मुलांचे बाप" हा त्यांच्या महान कार्याची माहीती देणारा अप्रतिम लेख लिहिला आहे.


आपल्या समाजपुरुषाचा गाडा केवळ या अश्या थोर विभुतीच्या जोरावर चालला आहे असे म्हटले तर ते वावगे ठरु नये.



जन्मदात्यांनी ज्यांना लाथाडले, अव्हेरले अशा दुर्दैवी मुलांना जवळ करीत त्यांना मातेची ममता आणि पित्याचा पितृवत आधार देणारे दोन समाजपिता .. त्यांनी जपलेल्या आगळ्यावेगळ्या माणुसकीची ही कहाणी.



ही कहाणी वाचल्यावर मला असा प्रश्न पडला की या मुलांना दुर्दैवी का बरे म्हणावे, ज्यांच्या नशिबी श्री शंकर पापळकर यांच्या छत्रछायेखाली नुसतेच वाढणॆ नव्ह्ते तर त्यांचे योग्य ते पुनर्वसनही लिहीले होते ती मुले तर नशिबवानच म्हणायला पाहीजेत. जे सख्खे आईवडील त्यांना देवु शकत नाहीत, ज्या योग्य प्रकारे त्यांची काळजी घेवु शकत नव्हते ते त्यांचा केवळ श्री शंकर पापळकर यांच्या मुळे लाभले.



आईवडीलांनी टाकुन दिलेली भिन्नमती, मूकबधीर बहूविकलांग अशी ७३ मुले पापळकरांच्या संस्थेत रहात आहेत. या मुलांना श्री शंकर पापळकर नुसतेच घर देवुन थांबत नाहीत तर त्यांची लग्नं लावुन, त्यांना नोकरीढंदा देऊन आयुष्यात उभं करण्याचा प्रयत्न करतात.


श्री शंकर पापळकर यांना लाख लाख सलाम.


श्री शंकर पापळकर यांचे मागणे एकच आहे.


आज भारतात अनेक नामवंत संस्था आहेत ज्या नियमाच्या चौकडीत बांधल्या गेल्यामुळॆ १८ वर्षावरील

भिन्नमती, मूकबधीर बहूविकलांग मुलांसाठी काही करु शकत नाहीत. त्यांना १६ वर्षे पुर्ण झाली की बाहेर काढले जाते.


आज गरज आहे ती सरकारनं विधानसभेत पुढाकार घेवुन १८ वर्षावरील भिन्नमती, मूकबधीर बहूविकलांग मुलांसाठी त्यांचा पुनर्वसनासाठीचा कायदा करावा.


हे "लोककल्याणकारी" दावा मिरवणाऱ्या सरकारला सहज शक्य आहे. गरज आहे ती केवळ इच्छाशक्तीची. ज्यातुन राजकीय लाभ मिळवता येतील अश्या गोष्टींच्या पलीकडला विचार करायला शिकण्याची.


Saturday, June 14, 2008

श्री शंकर पापळकर




आज मी खुप उत्साहित आहे, नुकतेच एका महान बापाशी दुरध्वनी वरुन बोलण झाले. आधी त्याच्याशी ओळख संगीताच्या ब्लोग blogspot.com/2007/11/blog-post.html">blogspot.com/2007/11/blog-post.html">झाली होतीच

आज लोकसत्तामधे http://www.loksatta.com/daily/20080614/chchou.htm त्यांच्या महान कार्याबद्दल वाचायला मिळाले।


आपला समाज आज केवळ या अश्या थोरविभुतिंच्या कार्यामुळे


आजच्या फादर्स डे हे औचित्य साधुन सुधीरजोगाळेकरांनी चतुरंगमधे फार चांगला लिहिला आहे।


जन्मदात्यानी ज्यांना लाथादाले , अव्हेराले आशा दुर्दैवी मुलाना जवाला करीत त्याना मातेची ममता आणि पित्याचा पित्रुँव्त आधार देणारे समाजपिता ... त्यानी जपलेल्या आगल्यावेगाल्या मानुसकिची ही कहानी , विदर्भातील अमरावातिचे श्री शंकर पापळकर त्यानी उभारालेल्या "अपंगाची काशी" याम्ची माहिती करूँ घेताना थक्क व्व्यायाला होते। दिनादुबल्याम्साठी किती हे कास्ट करता असतात, विनामोबदाला। भिन्नामती मुकबधिर मुलामुलिंसाठी बालाग्रुहा सुरु करूँन त्यांचे पुढील आयुष्य सुरलित करूँ देवुन मार्गी लावायास हे येर्क्स्यागाबाल्याचे काम नव्हे। श्री शंकर पापळकर या मुलामुलिना घर देवुन त्यांची लग्न लावून, त्याना नोकरी दादा देवुन आयुष्यात उभाकरान्याका प्रयत्न अक्रतात।










श्री सुधीर जोगालेकरान्नी याम्स मागने एकक आहे।

Friday, June 13, 2008

आकाशवाणी - FM चॅनेल १००.७०.

आणी एक वर्तुळ पुर्ण झाले. आकाशवाणीने गमवलेला एक श्रोता परत मिळवलाय. रात्री १०.०५ ते ११.०० वाजेपर्यतचा वेळ आकाशवाणीच्या FM चॅनेल, 100.70 वर जुनी सुमधुर गाणी ऐकतांना कसा अलगद जातो कळतच नाही, मग झोप काय सुखद लागते.

गेल्या आठवड्यातल्या एका रात्रीचा विषय होता, हिंदी चित्रपटगीतामधील सतार वादन.

उस्ताद रईस खान व जयराम आचार्य यांनी साथीला वाजवलेल्या सतारवादनावर हा कार्यक्रम सादर करण्यात आला.

बहार आली.

आकाशवाणी - FM चॅनेल १००.७०.००

आणी एक वर्तुळ पुर्ण झाले. आकाशवाणीने गमवलेला एक श्रोता परत मिळवलाय. रात्री १०.०५ ते ११.०० वाजेपर्यतच्व

आकाशवाणी - FM चॅनेल १००.७०.००

आणी एक वर्तुळ पुर्ण झाले. आकाशवाणीने गमवलेला एक श्रोता परत मिळवलाय. रात्री १०.०५ ते ११.०० वाजेपर्यतचा

कै.प्रकाश इनामदार


कै. प्रकाश इनामदारांची आज अचानक आठवण झाली. मी त्यांना प्रत्यक्षात पाहीले ते मुंबई विद्यापिठाने दोन तिन वर्षापुर्वी आयोजलेल्या तमाशा वरील चर्चासत्रात. तीन दिवसाचा हा कार्यक्रम होता, चर्चा, प्रात्याक्षिके इ.


चर्चा सुरु झाली. भाग घेणाऱ्यांमधे अनेक नामावंत तमासगीरांबरोबर काही मान्यवर शास्त्रीय नॄत्यांगना देखील होत्या. त्यांच्या मधल्या एकीने चर्चेचा असलेला विषय सोडुन दुसरेच भलते विषय सुरु केला, संबंध नसलेले प्रश्न विचारुन कलावंतांना गोंधळात पाडायला सुरवात केली, मग त्या उत्तरे देतांना अडखळु लागल्या.


अश्या वेळी प्रेक्षकांत बसलेले कै. प्रकाश इनामदार चटकन उठुन स्टॆज वर गेले. त्यांनी मोजक्यात समर्पक, चपखल शब्दात नुसतेच शंकानिरसनच केले नाही त्याच बरोबर तर घसरलेली गाडी क्षणाधार्थ रुळावर आणली व पुढचे चर्चासत्र सुरळीत पार पडायला मदत केली.


त्या वेळी त्यांच्या समयसुचकतेने, त्यांच्या या कृतीने, त्यांच्या अभ्यासु वॄत्तीने मी खुपच भारावुन गेलो होतो.
इतक्या कालावधीनंतरही हा प्रसंग आठवतो.



वेळ सावरायची असेल तर अशीच.

Thursday, June 12, 2008

Virus

Something is wrong with my machine at home, afftected by Virus. Turns off automatically the movement I open blog or try to update it. I suspect there is a foreign hand behind this.

Friday, June 06, 2008

तीरे नीमकश


कोई मेरे दिल से पूछे तेरे तीरे नीमकश को

ये ख़लिश कहांसे होती जो जिगर के पार होता ।

गालीब

स्वैर अनुवाद

तिने भॄकॄटी ताणुन आपल्या नेत्रकटाक्षाने जो तीर मारला आहे तो तीर माझ्या काळजात अर्धवट शिरुन तेथेच रुतुन राहीला आहे.

तो जर आरपार निघुन गेला असता तर मग या ठुठुसणाऱ्या, हव्याहव्याश्या वाटणाऱ्या सुखद वेदना माझ्या मनाला कश्या बरे झाल्या असत्या ?

ये ना थी हमारी किस्मत की विसाले यार होता
अगर और जीते रहते यही इंतजार होता ।

कहू किससे की क्या है शबे गम बुरी बला है
मुझे क्या बुरा था मरना अगर एक बार होता ।

पधरो मारो देश

"पधारो मारो देश" हे ब्रिदवाक्य केवळ परदेशी पर्यटक व भारतीय श्रीमंतांसाठी असावेच काय ?

जेसलमेर. हवेलीतील दोन-तीन दुकानात आत शिरण्याचा प्रयत्न.

"अंधर मत आव " जणु काय "Dogs and Indian Not Allowed". च्या धर्तीवर.

हा भिकारी काय विकत घेणार ? त्या मुळे ही तुच्छतेची वागणुक.

उंटाचा फोटो काढला, "पैसा लाव फोटो निकालनेका"
ऊंटावर मुलगा बसला " टीप लाव "
"काहेका टीप"
"तुम साला बंबंईका भिकारी क्या पैसा देयेगा ? "

आणि मराठी माणसांना आदरातिथ्याबद्दल धडॆ देण्यात येतात.

दुनियाकी तमन्ना कौन करे !

आंखोमे समाये जब तुम हो और दिल मे बसाये जब तुम हो ।
आ के बता दे तुही जरा दुनिया की तमन्ना कौन करे ॥
बदनाम मुहब्बत कौन करे आपसे शिकवा कौन करे ।
नुरजहां बेभानपणे गात होती. ऐकणारे आम्ही विव्हळ होत होतो.
काल आकाशवाणीच्या F.M.११० चॅनल वर रात्री १०.३० वाजता खास सज्ज्द हुसेन वर खास कार्यक्रम सादर झाला. केवळ योगायोगाने तो ऐकायला मिळाला नाहीतर एका फार मोठ्या सौख्याला मी मुकलो असतो.
या कार्यक्रमामध्ये "सैय्या " चित्रपटातील लतानी गायलेली दोन गाणी ऐकवण्यात आली.
या गाण्यांबद्दल मध्यतरी मी लिहीले होते.
सज्जाद्च्या चाहत्यांना ही खास मेजवानीच होती.

Wednesday, June 04, 2008

चवीनं खाणार त्याला देव आंब देणार, अन्नदाता सुखी भव !


कधीतरी अचानक, अकस्मातपणॆ एखाद्या व्यक्तीची, कुटुंबाची ओळख व्हावी व जन्मभर अकॄत्रीम स्नेह, प्रेम, आपुलकी, जिव्हाळ्याच्या रेशमी धाग्याने ते बांधले जावेत.

सहासात वर्षापुर्वी मी, बायको, मुलगा वाट वाकडी करुन वरळी परिसरात भटकत असता, एका झाडाच्या पारावर एक लहानुसा मुलगा हौशेखातीर थोडेसेच आंबे विकतांना नजरेस पडला. तोच कारणीभुत ठरला जन्मोजन्मीचे संबंध जुळवायला, प्रसंगी स्वतःच्या तोंडचा आंबा काढुन आम्हाला खायला देणाऱ्या गिरकर कुटुंबीयांशी. बाजारु आंबा न खाणाऱ्या या वेडया माणासासाठी काय वाट्टेल ते करुन एखादी तरी पेटी आणण्याऱ्या देवमाणसांशी.

विजयदुर्गातील कातळावरच्या आंब्यांची चव न्यारीच .अस्सल , सुमधुर. येथले नैसर्गीकरित्या पिकलेले फळ जो कोणी एकदा चाखेल तो परत दुसऱ्या कोणत्याही आंब्याकडे ढुंकुनही पहाणार नाही.

दरवर्षी आम्हाला वेध लागतात ते अक्षयतृतीयेचे. या दिवशी ते गावाला जातात व न चुकता आमच्यासाठी आंबे घेवुन येतातच येतात. आम्ही अगदी आतुरतेने वाट बघत असतो या घडीची. याच्या चवीवर मग पुढल्या वर्षापर्यंत कळ कशीबशी सहन करत काळ कंठत असतो.

बाजारात आंब विकत घेवुन खाणे हे मग आमच्यासाठी महापाप असते. ज्याने अस्सल चीजेचा आस्वाद घेतला आहे तो चोखंदळ माणुस मग कशाला कॄत्रीमतेच्या नादी लागेल.

आम्हाला फक्त दोघे जण आंबे देतात. आम्ही विकत घेतो असे म्हणण्यापेक्षा ते आम्हाला आंबे देतात असे म्हणणे अधीक संयक्तीक ठरेल.

गिरगावात रहाणारे श्री. कवळे जे पालशेट वरुन आणलेले त्यांच्या घरचे आंबे देतात व गिरकर कुंटुंब.

आणाखीन एकाजणांकडच्या आंब्याची चव अजुनही मनात रेंगाळतेय. पेडांब्यांचे श्री. धनंजय बापट. ८-१० वर्षापुर्वी शेकडयाच्या भावाने (डझनाच्या नव्हे) घेतलेले आंबे. एकही आंबा खराब निघाला तर संपुर्ण पैसे परत देईन असे छातीठोक पणे, प्रामाणीक पणे सांगण्याऱ्या श्री. बापटांना आवर्जुन दुरध्वनी करुन त्यांचे आभार मानल्याचे संभाषण अजुनही आठवतयं.

गेल्या वर्षापासुन नाही म्हटले तरी आंबा महोत्सवात आलेल्या देवगडच्या सौ. कार्लेकर यांच्या कडेही अगदी दर्जेदार व चोख आंबा मिळतो, तो देखील मी अगदी हात, तोंड, कपडे बरबटत ओरपुन खातो. खोटं कशाला म्हणु.

Tuesday, June 03, 2008

पुण्यातील रिक्षावाले

पुण्यातील रिक्षावाले केवळ आपल्या मनोरंजनासाठी, हौसेखातीर रस्तांवरुन उगीचच इकडे तिकडे रिक्षा आपले फिरवीत असतात असा मला दाट संशय आहे. मग त्यातुन फुरसत मिळालीच तर, मर्जी असेल तर, पटलेच तर व जमलेच तर मग ग्राहकाला त्याला हवे त्या जागी घेवुन जात असावे असा दुसरा आराखडा.
दहाजणांकडुन नकार घंटा ऐकली की मग अकराव्या रिक्षात जबरदस्तीनी बसावे लागते. चांगलेच भांडण करुन.

डायट्ची ऐशी की तैशी - गणॆश भेळ -



डायट करतांना कधीतरी या आडवाटॆला जावे लागते. मग बंड करण्यासाठी वाट गणॆश भेळ, गणॆश नगर, नवसह्याद्री येथे जावुन मिळते.
कितीतरी वर्षानी काल रात्री भेळ खाल्ली ते ही नाईलाज झाल्याने. रात्री ९-९.३० च्या सुमारास अगदी रस्तावर सामसुम, तेव्हा भुकेल्या पोटी समोर असेल ते खावे हा विचार मोहामुळॆच.

फलाट- पुणे रेल्वे स्थानक

Sunday, June 01, 2008

निर्णय

पुण्यामधे नांदेड सिटी प्रकल्प उभा रहातोय, जून पासून bukiAN