आज आपल्या हातात ब्लॉगरुपी एक प्रभावी माध्यम आहे, जगभर अनेक विषयांना या ब्लॉगच्या द्वारे वाचा फोडली जात आहे, पण मराठी बॉगविश्व अजुनही कथा, कविता, स्वानुभव, पाकशास्त्र याच्या पलीकडे फारसा गंभीरपणे विचार करायला मागत नाहीय.
ज्या वेळी मी एखाद्या गंभीर विषयावर लिहीतो, त्या वेळी माझी मनामधे अशी अपेक्षा असते की इतर ब्लॉगर्सही या विषय उचलतील, या विषयी त्यांच्या ब्लॉगचरुन एक चळवळ उभारतील, परंतु असे घडत नाहीय.
नुकतचं मी श्री.शंकर पापळकरांच्या कार्याबद्द्ल, त्यांच्या अपेक्षा बद्द्ल लिहीले होते. हा विषय केवळ एक ब्लॉग लिहीण्यापुरता राहु नये असे मला वाटते.
लोकसत्तेमधला हा लेख माननीय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री पासुंन विधानसभेतील, विधानपरीषदेतील अनेक आमदारांच्या वाचनात नक्कीच आला असणार. एखाद्यातरी आमदारानी पुढाकार घेवुन १८ वर्षावरील भिन्नमती, मूकबधीर, बहूविकलांग मुलांसाठी विधानसभेत, विधानपरीषदेत या विषयाचा अभ्यास करुन बिल मांडावे ही अपेक्षा.
या सारख्या असंख्य विषयांसाठी आपण ब्लॉगर्सनी संघटीत प्रयत्न करायला हवेत.
5 comments:
What is बॉग? It should be ब्लॉग.
तुमचा मानस चांगला आहे॰ पण किती जण हे गंभीरपणे घेतील हा देखील मोठा प्रश्न आहे॰
पण थोडया जणांनी सुद्धा सुरुवात केली तरी हरकत नाही॰
बाकी, ब्लॉगचे नाव Capital Letters मध्ये न ठेवता Small Letters मध्ये टाकले तर वाचायला सोपे पडेल असं वाटतंय॰ :)
आपली कल्पना फार छान आहे. मात्रं मराठी ब्लॉगर्सकडून कितपत प्रतिसाद मिळेल, हे सांगता येत नाही. एकतर माझ्यासारखे बरेच परदेशी आहेत. सामाजिक आशयावर लिहीणारे फारच कमी आहेत.
तरी ही तुम्हाला प्रतिसाद मिळो अशी सदिच्छा.
tumchi kalpana khupac chan ahe......
tumhi khalil blog vachava....
http://gau4u.blogspot.com/
Dear Anonymous/ Aadi / Sangeeta & Himanshu,
Great journey's always starts with small step, I am glad that you like the idea.
Sorry for the erroe. I will correct it asap. Having problem with marathi fonts.
Post a Comment