Friday, June 27, 2008

आमची अशी इच्छा आहे की ......

आई-वडीलांनी मुलीला पाहीले असते, त्यांना ती आपल्याला सुन करुन घ्यायची असते किंवा मुलाला ती पसंद असते तिच्याशी लग्न करण्याची इच्छा तो पालकांना बोलुन दाखवतो, मग मागणी घातली जाते स्थळाला. मुलीला ही तो पसंद पडतो. लग्न जुळते.

पण.

आमचा हा एकुलता मुलगा, आमच्या घरातील हे पहिलेच शुभकार्य या अश्या अंगाने सुरु झालेली चर्चा मग हे लग्न मोठया थाटामाटात व्हावे असे आम्हाला वाटते , आमचा गोतावळा फार मोठा आहे, आता लग्न म्हटले की सर्वच झाडुन येणार , मग त्यांचे मानापमान, आमचे देणे घेणॆ इत्यादी इत्यादी, बोलणी चालुच रहातात.

आपल्या कडे अगदी मुबलक , बख्खळ पैसा असेल तर वरमायीनी, पित्यानी आपली हौस जरुर पुरवावी, शेवटी पैसा त्यांचा, त्याचा विनीयोग कसा करावा हे ज्याचे त्यानी ठरवावे.

पण

२१ व्या शतकात देखील वरपक्षाकडच्या लोकांना आपले सारे चोचले मुलीकडच्यांनी पुरवावेत असेच वाटत असते. सगंळा खर्च मुलीकडचा, आम्ही फक्त मंगलकार्यालयात लग्न लावायला येणार. अगदी प्रेमविवाह असेल तरी सुद्ध्या, वाईट असे वाटते की ही आधुनीक विचारसरणीची ही मुले देखील अगदी मातॄभक्त, माझ्या आईची इच्छा , आता मी तिला विरोध कसा करु किंवा मुलगी ही विचार करत नाही की आपल्या वडलांना केवळ दोन-चार तासा साठी त्यांच्या आयुष्यभरची पुंजी किंवा त्यांच्या म्हातारपणासाठी उपयोगी पडणारी रक्कम खर्चवावी लागणार आहे.

लग्नसमारंभात किती पैसा खर्चायचा व केवळ जेवणावळी घालण्यातील उधळपट्टी सर्वसामान्यांनी करायलाच हवी काय ? मोजकेच जवळचे नातेवाईक, मित्रमंडळी बोलवुन साधेपणानेही लग्न लावता येते की.

1 comment:

Anonymous said...

Jyanchya kade paise ahet tyanna karu dya ki kharcha