आंखोमे समाये जब तुम हो और दिल मे बसाये जब तुम हो ।
आ के बता दे तुही जरा दुनिया की तमन्ना कौन करे ॥
बदनाम मुहब्बत कौन करे आपसे शिकवा कौन करे ।
नुरजहां बेभानपणे गात होती. ऐकणारे आम्ही विव्हळ होत होतो.
काल आकाशवाणीच्या F.M.११० चॅनल वर रात्री १०.३० वाजता खास सज्ज्द हुसेन वर खास कार्यक्रम सादर झाला. केवळ योगायोगाने तो ऐकायला मिळाला नाहीतर एका फार मोठ्या सौख्याला मी मुकलो असतो.
या कार्यक्रमामध्ये "सैय्या " चित्रपटातील लतानी गायलेली दोन गाणी ऐकवण्यात आली.
या गाण्यांबद्दल मध्यतरी मी लिहीले होते.
सज्जाद्च्या चाहत्यांना ही खास मेजवानीच होती.
2 comments:
अरेरे, असे कार्यक्रम होऊन जातात आणि आपल्याला कळतही नाही. दूरदर्शनवरील फडतूस कार्यक्रमांचीही उबग येईस्तोवर जाहिरात होते पण हल्ली रेडियोवरील कार्यक्रमांचा पत्ताच लागत नाही. सज्जाद या महान संगीतकाराचे तर आजकाल रेडियोवर नावही कानी पडत नाही. अशा वेळी असा कार्यक्रम झाला व मी तो ऐकला नाही ही रुखरुख राहील. एखाद्या रसिकाने तो रेकॊर्ड केला असेल व कधीतरी नेटवर उपलोड करेल या आशेवर राहीन आता... :(
सज्जाद बद्द्लची आपली ओढ वाजुन आनंद झाला, मुळात आता लोकांना सज्जाद हा कोण हेच ठावुक नाही.
Post a Comment