Saturday, March 31, 2007

भांबुर्डे ते पाच्छापुरची वाडी

घाटमाथ्यावरुन, लोणावला परिसरातुन खाली कोकणात ऊतरणाऱ्या अनेक वाटा आहेत. विषेशताः तैलबैला कडुन. भांबुर्डे गावातुन सुसाळे बेटावर जाताना ह्यातल्या दोन वाटा श्री. सुरेश पराजंपेनी पुढच्या वेळेसाठी राखुन ठेवल्या होत्या, त्यातली एक अंधारबनातुन खाली ऊतरणारी. येथल्या घनदाट जंगलात दिवसापण काळोख असतो म्हणुन त्याचे नाव अंधारवन. येथे मात्र मला जाण्याचा योग आला नाही. दुसरी वाट धनगडाला वळसा घालुन, केवणीच्या पठारावरुन, सुधागड उजवी कडे ठेवत खाली पाच्छापुरच्या वाडी वर उतरणारी.
नेहमी प्रमाणे दुपारची १२ च्या सुमारास लोणावळ्यावरुन सुटणारी भांबुर्डे गावाला जाणारी राज्य परिवाहनची बस पकडुन भांबुर्डेला पोहोचला श्री व सौ सुरेशजी, श्री. तवसाळकर व मी असा चार जणांचा कंपु. देवळात भोजन उरकुन पायपिटीस सुरु केले. रमत गमत, पठारा वरुन मजेत चालत रहाण्यासारखे दुसरे सुख नसावे, वाटेत रानमेवा ,करवंदे आमची वाटच पहात होते दोनहस्ते नव्हे मुक्‍तहस्ते वेचत, करवंदांच्या काटेरी जाळीत घुसत, जखमी होत करवंदे खाण्यात मजा काही और होती.
घोडेजीन वर उतण्यापुर्वी क्षणभर विश्रांती घेवुन ती पार कराताना बहार आली. पठारावरुन मजलदरमजल करीत सांजेला पोहोचलो किणवी गावात, गवळीपाडयात. राम राम करीत दयाळु गावकऱ्याकडे त्यांचा अंगणात पथारी पसरण्याची परण्याची परवानगी घेतली.
शेणाने स्वच्छ सारवलेल्या अंगणात मुक्काम, जवळच छोटिशी देवरायी, त्यात परत पौर्णिमेची रात्र, तिप्पुर चांदण्यात धरती नाहुन निघालेली, पुर्ण चंद्रमा गगन बिराजे, ( चांदनी रात मुहब्बतमे हसी थी फाकीर ), गप्पागोष्टी करत रात्र केव्हा सरली कळलेच नाही.
सकाळी दयावंत होत आमच्या यजमानानी धारोष्ण दुधाची करंडी न्याहारी करताना आणुन दिली. आनंदाची हि तर परिसीमा. परत ह्या गावातुन दोन तीन वाटा खाली उतरतात. आमच्या नेताजींनी सोपी अशी (खास माझ्यासाठी ) नळीची (म्हणजे दोन डोंगराच्या खाचे मधली) वाट निवडली.
तैलबैलाच्या दिसण्याऱ्या अजस्त्र भिंति आता मागे पडत चालल्या होत्या येथुन पुढे चालताना दिसु लागला तो सुधागड आणि खालच्या पसरलेल्या दऱ्यांचे विहगंम द्रुश्य. पठारावरुन खाली दरीत उतरताना व परत वर चढताना जाणवु लागला चैत्रातला ऊन्ह्याचा तडाखा. धरती, आजुबाजुचे खडक मस्तपैकी स्वताः तर तापले होतेच पण आम्हालाही दाह देत होते.
त्यात माझ्या नविन बुटानेही चाव चाव चावायला सुरवात केली. पाण्याचा मारा करीत, लिम्बु सरबतावर ताव मारित रडत रखडत कसेबसे, दगा दिलेल्या पायानी आणि शारीरिक दमवणुकिने बेजार होत पाच्छापुरच्या वाडी पर्यंत मी अखेरीस पोहोचलो पुन्हा परत कधीही पदभ्रमणाला न जाण्याचा निश्च्यय करीत.
येतुन मग गणपती पालीला जाण्यासाठि S.T.Bus मिळाली, पालीला पोहोचलो , जीवात जीव आला.

वैशाख वणवा

वैशख वणव्यापासुन बचाव करायचा झालातर वडाच्या आश्रयाला जावे.

सहली एक दिवसाच्या आसपास मुंबईच्या


फिरस्त्याचे पाय फुलासारखे असतात. जो बसुन रहतो त्याचे दैवही बसकण मारते. जो उभा रहातो त्याचे दैवही खडे रहाते जो झोपुन रहातो त्याच दैवही झोपी जाते. जो चालु लागतो, त्याच दैव चालत राहते म्हणुन चालत रहा भटकत रहा. फिरत्याला मध, व औदुंबराच मधुर फळ मिळत. त्याला सुर्याचे सौन्दर्य पहायला मिळत. फिरण्याचा उबग येत नाही म्हणुन भटकत रहा, भटकत रहा.
रोज घरात आज मी जेवायला काय करु असा प्रश्न नेहमीच गृहीणींना पडत असतो, ह्याच प्रकारचे प्रश्न प्रवासप्रेमींस, भटकंतीची आवड असलेल्याना , निसर्गात जाण्याची ओढ लागलेल्याना, सुट्टी आल्यावर आज आपण सहलीस, भटकंतीस कोठे जावे असे पडत असतात. खंडाला लोणावळा, माथेरान, महाबळेश्वर यांची तर अती परिचये अवज्ञा झाली आहे. १-२ दिवसाच्या सहलीस, भटकंतीस तर जायचे आहे, दऱ्याखोऱ्यातुन डोगंररागातुन, पठारावर, मस्त अवखळ वारा खात,ऊन, पाऊस , झेलत, मनोसक्त, निसर्गाची समरस तर व्हायचे आहे. पण कोठे जायचे ?, कसे जायचे ? ह्या सारखे अनेक सवाल मनात ऊभे रहातात, अश्या वेळी मनाला जास्त संभ्रमावस्थेत न ठेवता श्री. सुरेश परांजपे लिखित " सहली एक दिवसाच्या आसपास मुंबईच्या " ह्या पुस्तकाचा आसरा घ्यावा. पुस्तक उघडावे आणि त्यात नमुद केलेल्या एकुण २५० स्थळांपैकी कोणतेही स्थळ अगदी डोळे झाकुन निवडावे आणि ऊबंर गडाच ओलांडावा. तुमची सुट्टी अगदी हमखास अगदी मजेत जाणार.
हे पुस्तक म्हणजे भटकंतीप्रेमीस मेजवानीच. आता पर्यत मुंबईच्या जवळपासच्या स्थळांची मोजकी आणि समर्पक माहिती देणारी पुस्तकांची वानवा होती, ती उणीव ह्या पुस्तकानी भरुन काढली आहे.
श्री सुरेश परांजपेनी २५० स्थळाची विभागणी पश्चिम रेल्वे, ठाणे -जव्हार, कल्याण, इगतपुरी, मुरबाड, माळशेज , कर्जत, पुणे कोकण किनारा, रायगड, व दुरची स्थळे अश्या एकुण आठ विभागात केली आहे. त्यात परत त्यानी रैल्वे, राज्य परिवाहन मंडळाच्या बस गाडयाच्या वेळा दिल्या आहेत, कोठेही खोळंबा व्हायला नको. स्वताचे वहान असल्यास ऊतम.
भटकंतीप्रेमीत काहींना किल्ले पहाण्यात रस असतो तर काहींना देवस्थाने, काहींना धबधबे साद घालत असतात तर काहींना धरणे, तलाव मोहवत असातात. समुद्राकिनारे तर सर्वांनाच लोभवतात. सर्वांची आवड निवड लक्षात घेता श्री सुरेश परांजपेनी विविध प्रकारच्या स्थळांचा समावेश ह्या पुस्तकात केला आहे. मुबंईच्या आजच्या धकाधकीच्या, धावपळीच्या जीवनात सहलींसाठी निवांत ३- ४ दिवसाची सवड काढणे तसे कठीण. ही अडचण लक्षात घेता ह्या पुस्तकात मुबंई जवळपासच्या १-२ दिवसात पाहुन होतील अश्याचा समावेश केला आहे.
पण मला असे वाटते की नावात जरी " सहली एक दिवसाच्या आसपास मुंबईच्या " म्हटले असले तरी त्या एका दिवसापुरत्या मर्यादित न ठेवता चांगल्या दोन दिवसाच्या आखाव्यात. रमतगमत सावकाशीने निसर्गाचा आस्वाद घेत, पाखरांचे संगीत ऐकत झऱ्याचे पाणी पीत , नदीत , तलावात डुबंत रानात रानमेवा खात, वनभोजन करत रात्री गावातील देवालयात, खळ्यात, लेण्यात पोर्णिमेच्या रात्री माळरानावर टिपुर चांदणे पीत, सुखदुःखाच्या गप्पागोष्टी करत,मुक्काम करावा व सोमवारी नव्या जोमाने नव्या उत्त्साहाने पुढच्या सफारीचे बेत आखत कामावर रुजु व्हावे.
लेखकाविषयी सांगायचे तर गिर्यारोहण व आकाशनिरीक्षण हे श्री सुरेश परांजपे ह्याच्या आवडीचे विषय व त्यासाठी त्यांनी आपले आयुष्य वाहुन घेतलेले. हे ह्या क्षेत्रातली एक अधिकारी वक्ती. ज्या काळात गिरिभ्रमण हा शब्द लोकांच्या पचनी पडला नव्हता तेव्हापासुन त्यांचे भ्रमण चालु आहे. सोबत मिळाली तर उत्तम नाही तर एकला चलोरे. ह्या पुस्तकातील प्रत्येक स्थळाला त्यांनी भेट दिली आहे. ह्या मधे कुंभकर्ण आहे बोंबल्या विठोबा आहे, कुणे आणि पुणे सुद्धा आहे.
अनेक राज्ये श्री सुरेश परांजपेनी भ्रमंती कारणे पादांक्रात केली आणि त्यांच्या ह्या अनुभवाच्या मंथानातुन निघालेले सार " सहली एक दिवसाच्या आसपास मुंबईच्या ". हे पुस्तक आपल्या संग्रही नसले तर मात्र येत्य शनिवार-रविवार कोठे फिरायला जायचे हा प्रश्न निष्कारण आपल्याला छ्ळत रहाणार, छ्ळतच रहाणार.

Friday, March 30, 2007

धोंडोपंत उवाच: सप्रेम नमस्कार

धोंडोपंत उवाच: सप्रेम नमस्कार

सौदर्य स्थळे

रोजच्या धकाधकीच्या, धावपळीच्या आयुष्यात ही सौदर्य स्थळे न्याहाळण्यासाठी फुरसतच नसते.
कदाचित अतिपरिचये अवज्ञा.
जमशेटजी टाटांचा हा पुतळा .
Posted by Picasa

हे काय भलतेच ?



हे काय भलतेच ?
आता पर्यंत आपण स्त्रीयांनी व फारफार तर पुरुषांनी नाटक, चित्रपटात, स्र्त्री वेष परिधान केलेले पहात आलो आहोत्त. येथे तर चक्क इमारतीनेच झगा परीधान केला आहे. हा जगा मधिल सर्वात लांब व मोठा वेष असावा. त्याची लांबी आहे ७० फुट , पायाशी घेर ४० फुट पण गंमत म्हणजे ज्या मिस बेहेव साठी हा वेष बनवला आहे तीची कंबर आहे फक्त १८ फुट.
छान पैकी त्याला रंगीबेरंगी फुलपाखरांनी सजवले आहे.

Thursday, March 29, 2007

हे असे का ?

माझ्या माहितीतील बऱ्याच जणांना मी blog वर लेखाण करतो हे आवर्जुन सांगतो पण त्याच्या पैकी एकही मी काय लिहितो हे जाणुन घेण्याचाही प्रयास करीत नाही, वाचणे तर दुरच. हे असे का ? (त्यात अगदी जवळची पण माणसे आली )
कौतुकाचे दोनच शब्द पण ते पण केवढे महाग ?

झांजरोली धरण आणि तारुखांड

पावसाळा सरता सरता एके दिवशी मोरुचा बाप मोरुला म्हणाला " मोरु ऊठ आज आपला दसरा, मोहिमेवर जाण्यास तयार हो. मोरु (दोन्ही मीच) ऊठला, शमी व्रुक्षावर ठेवलेली आयुधे (हंटर शुज व पाठपिशवी ) खाली उतरवली आणि कुच केले झांजरोली धरण आणि तारुखांडचा दिशेने, श्री सुरेश परांजपेच्या सोबत. भल्या पहाटेची विरार लोकल व विरार वरुन शटल पकडून केळवे रोड रैल्वे स्थानकावर उतरलो व पुर्वेच्या दिशेने कच्चा मातीच्या रस्तावरुन पदभ्रमंतीस सुरवात केली. अचानक वाटेत अकस्मात पावसाने बेसावध असताना गाठले आणि झोडपायला सुरवात केली.
बाहेर पाऊस व मनात नुरजहान थैमान घालु लागले. आपल्या दर्दभऱ्या आवाजात, काळीज पिळवुन टाकत नुरजहान गाऊ लागली " आ घटा काली घटा अबके बरस ना बरस, मेरे प्रितम है परदेश " ( माझी प्रिया परदेश कसली चागंली घरात आरामात होती, आणि मी येथे पावसाचा मार खात तिच्या आठवणीत मला छ्ळत. )
पावसाचा मारा असह्य झाला व मी धावलो भल्यामोठया पाणाच्या टाकीच्या आश्रयास. आला तसा हा श्रावणातला घन निळा बरसुन गेला वातावरणात प्रसन्नता जाणवयाला लागली. मधेच टाकी वर चढुन आसमांत न्याहळण्याची आलेली हुक्कीपण शमवुन घेतली. थोडेसे अंतर चालुन गेल्यावर आले ते झांजरोली धरण. निसर्ग जणु चहुहस्ते आसमांतात आपल्या खजिन्याची ऊधळण करीत तो रिता करु पाहण्याचा असफल प्रयास करु पहात होता. तासाभराचेच हे रैल्वे स्थानकापासुनचे अतंर कसे कापले कळलेच नाही. तलावाकाठी स्रुष्टीचे कौतुक करत काही काळ सुखात बितवला, मग वेळ आली डोंगरावर चढण्याची. धरणभितींच्या वरील पाण्याचा सांडवा ओलांडून पलिकडे गेल्यावर प्रथम तलावाच्या काठाकाठाने जाणारी एक पाऊलवाट नंतर डोंगरावर चढु लागते ती चक्क सुपधरा नामक धबधब्याकडे. त्याच्या कडेने पाऊलवाट वरच्या जंगलात शिरुन शेवटी तारुखांड डोंगराच्या धारमाथ्यावर जाते. ती धरुन आरामात माथ्यावर पोहोचलो. ओ, हो, अरेच्या, हे काय ? पलिकडे दिसत होते सुर्या आणि वैतरणा नद्याच्या संगमाचे लोभिवणारे द्रुश्य. येथे जंगल खुप सुरेख आणि घनदाट आहे. वनभोजन करुन परतीच्या वाटेला लागलो. केव्हातरी मागील वाट चुकली एका आडव्या जाण्याऱ्या चागंल्या पाऊलवाटेने नुसतेच आडवे चालत राहिलो, वाट खाली ऊतरण्याचे नावच घेत नव्हती. मग ओढ्यात ऊतरुन पाण्याबरोबर खाली सरकण्याचे बरेच असफल प्रयास करुन झाले. शेवटी आमच्या नेत्यांनी त्याच पाऊलवाटॆने चालात रहाण्याचा योग्य निर्णय घेतला. तासाभरात गुरांचे गोठे, शेती वगरे दिसायला लागले, जीव भांडयात पडला.
एकदाचे खालच्या तलावाकाठच्या गावी जावुन धडकलो. हि एक अस्मरणिय सफर होती.
केळवे रोड रैल्वे स्थानकावर बहुतेक लोक उतरतात ते केळवेमाहिम येथे असण्याऱ्या सम्रुद्र किनारी जाण्यासाठी.
मदत : श्री सुरेश परांजपे लिखित " सहली एक दिवसाच्या आसपास मुबंईच्या.

Wednesday, March 28, 2007

Veer Kotwal Smarak, Siddhagad

The Sahyadri’s in monsoon is simply heaven. I was tired of returning to the same Malshej Ghat and Khandala, Lonavala during the monsoon to enjoy the clouds and the fog and the mist and the waterfalls and the greenery, and the jungle and the rain of course and jostling with the same half naked and full drunk, unbearable crowd, (for them only enjoyment is booze and to break glass bottles in the waterfall after losing all senses, The only punishment to play around with the mother nature is pack them and send to Sahara Dessert), year after year till I discovered a place where the only sound is silence and then of the roaring waterfall.

Two years back, I went there with one of my friend for the first time only to return with my colleagues, year after that. This year I will be taking my wife and son along.

The little unknown place ( I do not know whether I should give away the name of the place ) is Veer Kotwal Smarak at the base of Siddhagad. Freedom Fighter, Veer Kotwal, Martyr, was shot dead by British Police officer at this spot during the freedom struggle.

If you have vehicle of your own then it’s well and good, otherwise one has to reach Kalyan first and then to Mhasa via Murbad either by S.T.Bus or by local Tempo / Jeep service available. From Mhasa, shared auto rickshaw will take you to the village at the base. A 1 ½ hours gentle walk thru deep forest takes you to the Veer Kotwal Smarak and to the safe Waterfall. The vehicle can reach their directly but not advisable. If you do not stroll in the jungle, what’s the point going there. Well it’s a matter of choice.

On the way there is a medium size dam and lake. The surrounding beauty will simply mesmerize you. My Guraantee.

The road further leads to Siddhagad on the top and further to Bhimashankar.

Mahila Annapurna Kendra





આજે નાસ્તામા સુ છે ? ઠોકલા અને ખાંડવી, ઘુઘરા, અને સમોસા, હલવા, કચોરી સાથે મેથીંના થેપલા પન.
આબધુ તમ્ને ક્યા મળસે ? તાજાઅ અને ચોક્ક્સ ?
મહિલા અન્નપુર્ના કેન્દ્ર, રાજા રામમોહોન રોય રોડ, પ્રાર્થાના સમાજ, મુંબઈ
What's there in breakfat today. Well, its Dhokala, Khandvi, Ghughara, Samosa and Methi Thepala, all fresh, available at Mahila Annapurna Kendra, Raja Rammohon Roy Marg, Prathana Samaj, Mumbai.
Posted by Picasa

Tuesday, March 27, 2007

Ram Navami

राम नवमी

"राम जन्मला ग सखे राम जन्मला" , "स्वयें श्रीरामप्रभु ऐकती" , "कौसल्रेचा राम ग बाई" आदी गाणी आकाशवाणी वर सकाळी लागली की समजावे आज राम नवमी.
ठाकुरद्वार, मुंबई, येथे दोन राम मंदीरे आहेत. काळा राम व गोरा राम. आजच्या दिवशी तेथे उत्सव असतो. ह्या मंगल प्रसंगी वातावरण प्रसन्न करण्यासाठी शहनाई हवीच.


Posted by Picasa

Sunday, March 25, 2007

PAINTINGS


Another painting by my father
Posted by Picasa

ताम्हिणी घाट, भीरा पॉवर हाऊस आणि मी

पहाटेची इंटरसीटी पकडायची आणि पुण्याला पळायचे हा नेहमीचा शिरस्ता.
गेल्या पावसाळ्यात, ऐकदा समोरुन ट्रेन निघुन गेली, थांबण्याचा कंटाळा आला होता, वेगळी वाट चोखळायची ठरवले, श्री सुरेश परांजपे बरोबर झालेले बोलणे आठवले आणि पनवेलला जाणारी लोकल पकडली. पनवेलला उतरलो नी पाठुन येणारी दिवा- सावंतवाडी ट्रेन पकडली आणि नागोठण्याला उतरलो. रिक्शा पकडुन पालीला श्री गणरायांचे दर्शन घेतले. (नागोठणे -पाली उत्तम रिक्शा सेवा उपलब्ध आहे.) न्याहारी करण्यासाठी वेळ न गमवता भीरा पॉवर हाऊसला जाणारी राज्य परिवाहन मंडळाची बस पकडली. हुशः माझ्या झालेल्या धावपळीसारखाचे हे लिहिणे झाले आहे.
हा रस्ता खुप सुरेख आहे, त्यात वरती पावसाळी वातावरण, सुष्टिने सुखदायक, आल्हादायक हिरव्या रंगाच शालु परिधान केल्यामुळे मनास होण्याऱ्या संतोष. प्रवास अगदी मजेत चालला होता. पण बस मधे मिळालेल्या उलटसुलट माहिती मुळे जरासा माझा गोंधळ उडला आणि मी रवाळजे गावात उतरलो. हे गाव छान आहे आणि येथेही धरण व पॉवर हाऊस आहे पण ते पहाण्यासाठी वेळ नव्हता. उगाचच येथे टाइमपास झाला. बऱ्याच वेळाने आलेली रिक्शा पकडुन मी भीरा पॉवर हाऊसच्या दिशेने निघालो. वाटेत विळा नामक गावात उतरलो. एकाने मला मोटरसायकलवरुन भीरा पॉवर हाऊसला सोडले.
अचानक भीरा पॉवर हाऊसचा परिसर पाहुन मी खुळावलो. नादावलो. हा सारा परिसर अतिशय निसर्गरम्य आहे अगदी मुळशी तलाव, पौड पर्यत. रांगडया सह्याद्रिचे हे रुप पहाता पहाता देहभान हरपायला होते. अंगावर येणारा रिमझिम पाऊस, खट्याळ वारा झेलीत, भीरा पॉवर हाऊसला असणारे धरण, पाण्याचा तो अमाप साठा पाहात मस्त पैकी ह्या परिसरात मी हिडलो. येथे टाटाचे पॉवर हाऊस आहे वैशिष्ट म्हणजे येथे महाराष्टात सर्वात जास्त पाऊस पडतो.

आता वेध लागले होते ताम्हिणी घाटाचे. परत फाट्यावर आलो आणि जणुकाहि वीजच कोसळली. दरड कोसळल्याने घाटतली वाहतुक दोन दिवस झाले बंद होती. अरे रामा. परतीचे दोर तर कापले होते. आता आर या पार. मागे परतणे नाही. आशा होती काहीतरी वहान मिळेल त्या दिवशी माझे नशिब चागंले ही होते आणि वाइट पण. वर जाणार एक टेंपो जणु काही माझ्यासाठीच धाडल्याप्रमाणे आला अस्मादिकांची सोय झाली.

ह्या साऱ्या रस्तावर अमाप, अगणित प्रपात, धबधबे आहेत. सह्याद्रिच्या माथ्यावरुन कोसळण्याचे साहस केवळ पाणीच करु शकते व वर चढण्याचे वाराच. प्रचंड महाप्रचंड, अबब केवढे हे प्रपात आणि हे धुके म्हणजे काय म्हणावे त्याला, दोन पावलावरचेही दिसु नये. हि धुक्यात हरवलेली वाट ब त्यावर मार्गक्रमण करित असलेलो फक्त आम्हीच. आता ह्या हिरव्या रंगात लाल मातीचा लाल रंग मिसळ्लेला. पाणीच पाणी चहुकडे. किती कौतुक ह्या निसर्गाचे व त्याच्या ह्या रौद्र रुपाचे करावे ? मग आला क्षण कोसळलेली दरड ओलांडण्याचा. रस्ता दुरुस्तीचे काम चालुच होते. चालकाने घाबरत घाबरत त्या मातीच्या ढिगाऱ्याबरुन, घसरत, घसरत कसेबसे वाहान काढले. आणि मी परत निसर्गाचे अज़ीब रुप न्याह्याळण्यास मोकळा झालो.
वाइट अशासाठी की ते वहान तसे नादुरुस्त होते. १०-१५ कि.मी. च्याच वेगाने हा प्रवास करत होते. एक प्रकारे बरेच झाले म्हणा सावकाशीने सर्वकाही चवीचवीने न्याहळता आले. मनात साठविता आले.

ताम्हिणीतील त्या वैशिष्टपुर्ण दऱ्या धुक्यात हरवुन गेल्या होत्या. विझांई देवीचे दर्शन घेण्यास वेळच उरला नव्हता. परत जाण्यासाठी वहान मिळेलच ह्याचा ही भरवसा नव्हता. डोंगरवाडी ओलाडली मग आला महाकाय मुळशी तलाव. हा परिसर माझा अतिशय आवडीचा. किती पाहु आणि काय काय पाहु. खरच आपण मानव ह्या निसर्गापुढे किती ............ (शब्दच सुचत नाही. )

चांगल्या गोष्टिची पण अखेर असते. पौड आले आणि संपली माझी समाधी अवस्था. परत मी स्वर्गातुन खाली धरतीवर येण्यास सुरवात झाली

Shri Pawar has cancelled a Yacht Party

So the Great Indian Cricket Team is almost out of World Cup tournament.

Bad, very bad and you know who are most upset. Not you and I. The 30 member BCCI Team is very, very upset. You know why? Shri Sharadchandra Pawar, BCCI President has cancelled a Yacht Party that he had planned to give the Great Indian Cricket (Comedy) Team on April 3 in anticipation of their entry into the Super 8 stage. (What a high hope!). Biggest mistake in fixing date (not match fixing. its D.A.T.E.). He should have arranged it on April 1. (Being April Fool Day)

India’s 69 run defeat to Sri Lanka has led to the Cancellation of the 30 member BCCI team’s trip to the West Indies to watch Super 8 matches and to cheer the Indians. The team was to leave on April 10 and stay in West Indies for 12 days. “What’s the point? Our boys (Boys are Boys) will not be there,” BCCI Secretary Niranjan Shah told press.

Now you know why the BCCI Team is upset. I hope they have not kept their fingers crossed and hoping for some kind of miracle. (Frankly speaking we do not deserve such miracles. Depending on team like Bermuda’s victory over Bangladesh to somehow sneak in through back door)

Bad Very Bad.

Saturday, March 24, 2007

पुढच्या वेळी

पुण्यात " पुढच्या वेळी याल तर जेवायलाच या " असे आग्रहाचे आमंत्रण असते. ( पुढच्या वेळी परत तेच आग्रहाचे आमंत्रण )

भारतीय क्रिकेट संघाला पण " पुढच्या वेळी जाल तेव्हा जिंकुनच या "

Interesting Link

नुकताच ऐकण्यात आलेला विनोद:तुम्ही जर सारखे-सारखे डायरी लिहीत सुटलात तर तुम्हाला 'डायरीया' झालेला आहे.:)ह्या डायरीयात विचारांची गळती होत असावी.मग ईंग्रजीत ज्याला Writer's block म्हणतात त्याला पर्यायी मराठी शब्द काय बरे?-लेखन-बद्धकोष्ठता!
from :
http://gulakand.blogspot.com/

Friday, March 23, 2007

Badshah Falooda


If it's Falooda’s it must be Badshah.

If after day tiring, tedious shopping at Crawford Market and Musafirkhana, if one does not entertain and pamper himself with Falooda at Badshah , the one and only one, you can consider the person as the most hopeless case.

Since 1905, well I was not born at that time for certain, Badshah has been constantly satisfying the inner thrust of their patrons by serving world class Falooda’s.

The main ingredients of high class Falooda’s are Chilled Milk, Syrups, Sevia, Sabja seeds, and top up with Ice-cream and most interestingly it’s served in long glass.

Badshah have so many varieties of Falooda’s to offer, the cheapest is Royal Falooda (Rs.31 ). Kesar, Shiraz, Mango, Strawberry, Butter Scotch, Kulfi, and new addition of Chocolate, Coffee, Black Current.

Apart from some outstanding faloodas, they also serve vast varieties of Milk Shakes, Kulfi, and Ice creams, Fresh Juices, Desserts and Syrups in milk or water.

A visit is more than recommended

Wednesday, March 21, 2007

PHOTO UPLOAD

I have discovered the best and fastest way to manage the photos and to upload on the Blog.

Find, organise and share your photos.
Picasa is a free software download from Google that helps you
Locate and organise all the photos on your computer.
Edit and add effects to your photos with a few simple clicks.
Share your photos with others through email, prints and it’s fast, easy and free.
Take your photos further with Picasa from Google.

Monday, March 19, 2007

गुढीपाडवा




गुढीपाडव्यानिमित्त सर्वांना नवे वर्ष सुखसमृद्धी व भरभराटीचे जावो. बसंताचे आगमन झालेले आहे, कोकीळ आपल्या सुरेल सुरात पंचमात साद घालू लागली आहे, निसर्ग चैत्रपालवी फुलवू लागला आहे, निंबाची कोवळी पाने, काटेसावर, पलश लुभवण्यास सज्ज होत आहेत. मदन आपला फुलसा कोमल बाणांचा शुल बनवुन तैयार है.
कुमारजी ह्या क्रुतुचे वर्णन अनेक सुंदर, मनोवेधक, रचना करीत गाऊ लागतात

राग चैतीभुप

निमोरी का मौरा है रे, गमक़ीला है मन बौरा रे ॥ बौरा चैता बौराय़ेरे हो , ये उतपतियापे मन बौरारे ॥


राग गौरीबसंत,

आज पेरीले गोरी रंग बंसतीचीरा, आय रितुराज, कोयलरिया कूके ॥ रंगादे रंगादे अरे रंगरेजरा,
आय रितुराज, कोयलरिया कूके ॥

राग बसंत,

रंग केसरिया सिर पागा बंधले, वनवेलरिया रंग लै खिल आयोरे ॥
पैरि हुं तो रे सैंया, रंग कुसुंभि चिरो, घघरो चुनरिरे ॥

REQUEST TO ORGINIZRS =3

हे असे रंग लाउन, भरजरी पोशाख करुन, एकाच स्थितीत भर ऊन्हात ऊभे रहाणे, सतत मुलांकडुन मानवी मनोरे बांधुन घेणे. मला वाटते पुढल्या वर्षी नसावे.



Posted by Picasa

Request to organizers -2

गिरगावात आज गुडि पाडव्यानिमित्ते शोभायात्रा सकाळी १० च्या सुमारास निघाली.
ऊन्हाचा तडाखा फार भासत होता. आपली हौस पुरवली जाते पण लहान मुलांची फरफट होते.
आयोजकांना विनंती, शोभायात्रा संध्याकाळी काढल्या जाव्यात जेणे करुन त्यावेळि वातावरण सुस्सह असल्यामुळे लहान मुलांना त्रास जाणवणार नाही.



Posted by Picasa

Request to Organizers - 1

मला ह्या बिचाऱ्या लहान मुलाची खुप दया आली. दिवसभर तळपत्या ऊन्हात त्यांची चांगलीच वाट लागली असणार. चित्ररथावर कसे त्यांचे प्रदर्शन माडंले होते हे फोटोत पाहिले ना. मी वर्तमानपत्रात ह्या विषयी पत्र लिहिले आहे. फास गळ्यात अडकवलेली दोन / तीन मुले पाहुन मला सतत भिती वाटत होती, अकस्मात वहान थांबले तर ?
This is another fine example of Child Exploitation, what else ?



Posted by Picasa

Gudhi Padwa Shobha Yatra

Guess
Posted by Picasa

GUDHI PADWA SHOBHA YATRA




Posted by Picasa

GUDHI PADWA SHOBHA YATRA




Posted by Picasa

GUDHI PADWA SHOBHA YATRA




Posted by Picasa

GUDHI PADWA SHOBHA YATRA




Posted by Picasa