Saturday, March 31, 2007

सहली एक दिवसाच्या आसपास मुंबईच्या


फिरस्त्याचे पाय फुलासारखे असतात. जो बसुन रहतो त्याचे दैवही बसकण मारते. जो उभा रहातो त्याचे दैवही खडे रहाते जो झोपुन रहातो त्याच दैवही झोपी जाते. जो चालु लागतो, त्याच दैव चालत राहते म्हणुन चालत रहा भटकत रहा. फिरत्याला मध, व औदुंबराच मधुर फळ मिळत. त्याला सुर्याचे सौन्दर्य पहायला मिळत. फिरण्याचा उबग येत नाही म्हणुन भटकत रहा, भटकत रहा.
रोज घरात आज मी जेवायला काय करु असा प्रश्न नेहमीच गृहीणींना पडत असतो, ह्याच प्रकारचे प्रश्न प्रवासप्रेमींस, भटकंतीची आवड असलेल्याना , निसर्गात जाण्याची ओढ लागलेल्याना, सुट्टी आल्यावर आज आपण सहलीस, भटकंतीस कोठे जावे असे पडत असतात. खंडाला लोणावळा, माथेरान, महाबळेश्वर यांची तर अती परिचये अवज्ञा झाली आहे. १-२ दिवसाच्या सहलीस, भटकंतीस तर जायचे आहे, दऱ्याखोऱ्यातुन डोगंररागातुन, पठारावर, मस्त अवखळ वारा खात,ऊन, पाऊस , झेलत, मनोसक्त, निसर्गाची समरस तर व्हायचे आहे. पण कोठे जायचे ?, कसे जायचे ? ह्या सारखे अनेक सवाल मनात ऊभे रहातात, अश्या वेळी मनाला जास्त संभ्रमावस्थेत न ठेवता श्री. सुरेश परांजपे लिखित " सहली एक दिवसाच्या आसपास मुंबईच्या " ह्या पुस्तकाचा आसरा घ्यावा. पुस्तक उघडावे आणि त्यात नमुद केलेल्या एकुण २५० स्थळांपैकी कोणतेही स्थळ अगदी डोळे झाकुन निवडावे आणि ऊबंर गडाच ओलांडावा. तुमची सुट्टी अगदी हमखास अगदी मजेत जाणार.
हे पुस्तक म्हणजे भटकंतीप्रेमीस मेजवानीच. आता पर्यत मुंबईच्या जवळपासच्या स्थळांची मोजकी आणि समर्पक माहिती देणारी पुस्तकांची वानवा होती, ती उणीव ह्या पुस्तकानी भरुन काढली आहे.
श्री सुरेश परांजपेनी २५० स्थळाची विभागणी पश्चिम रेल्वे, ठाणे -जव्हार, कल्याण, इगतपुरी, मुरबाड, माळशेज , कर्जत, पुणे कोकण किनारा, रायगड, व दुरची स्थळे अश्या एकुण आठ विभागात केली आहे. त्यात परत त्यानी रैल्वे, राज्य परिवाहन मंडळाच्या बस गाडयाच्या वेळा दिल्या आहेत, कोठेही खोळंबा व्हायला नको. स्वताचे वहान असल्यास ऊतम.
भटकंतीप्रेमीत काहींना किल्ले पहाण्यात रस असतो तर काहींना देवस्थाने, काहींना धबधबे साद घालत असतात तर काहींना धरणे, तलाव मोहवत असातात. समुद्राकिनारे तर सर्वांनाच लोभवतात. सर्वांची आवड निवड लक्षात घेता श्री सुरेश परांजपेनी विविध प्रकारच्या स्थळांचा समावेश ह्या पुस्तकात केला आहे. मुबंईच्या आजच्या धकाधकीच्या, धावपळीच्या जीवनात सहलींसाठी निवांत ३- ४ दिवसाची सवड काढणे तसे कठीण. ही अडचण लक्षात घेता ह्या पुस्तकात मुबंई जवळपासच्या १-२ दिवसात पाहुन होतील अश्याचा समावेश केला आहे.
पण मला असे वाटते की नावात जरी " सहली एक दिवसाच्या आसपास मुंबईच्या " म्हटले असले तरी त्या एका दिवसापुरत्या मर्यादित न ठेवता चांगल्या दोन दिवसाच्या आखाव्यात. रमतगमत सावकाशीने निसर्गाचा आस्वाद घेत, पाखरांचे संगीत ऐकत झऱ्याचे पाणी पीत , नदीत , तलावात डुबंत रानात रानमेवा खात, वनभोजन करत रात्री गावातील देवालयात, खळ्यात, लेण्यात पोर्णिमेच्या रात्री माळरानावर टिपुर चांदणे पीत, सुखदुःखाच्या गप्पागोष्टी करत,मुक्काम करावा व सोमवारी नव्या जोमाने नव्या उत्त्साहाने पुढच्या सफारीचे बेत आखत कामावर रुजु व्हावे.
लेखकाविषयी सांगायचे तर गिर्यारोहण व आकाशनिरीक्षण हे श्री सुरेश परांजपे ह्याच्या आवडीचे विषय व त्यासाठी त्यांनी आपले आयुष्य वाहुन घेतलेले. हे ह्या क्षेत्रातली एक अधिकारी वक्ती. ज्या काळात गिरिभ्रमण हा शब्द लोकांच्या पचनी पडला नव्हता तेव्हापासुन त्यांचे भ्रमण चालु आहे. सोबत मिळाली तर उत्तम नाही तर एकला चलोरे. ह्या पुस्तकातील प्रत्येक स्थळाला त्यांनी भेट दिली आहे. ह्या मधे कुंभकर्ण आहे बोंबल्या विठोबा आहे, कुणे आणि पुणे सुद्धा आहे.
अनेक राज्ये श्री सुरेश परांजपेनी भ्रमंती कारणे पादांक्रात केली आणि त्यांच्या ह्या अनुभवाच्या मंथानातुन निघालेले सार " सहली एक दिवसाच्या आसपास मुंबईच्या ". हे पुस्तक आपल्या संग्रही नसले तर मात्र येत्य शनिवार-रविवार कोठे फिरायला जायचे हा प्रश्न निष्कारण आपल्याला छ्ळत रहाणार, छ्ळतच रहाणार.

5 comments:

TNL said...

HKJi,

Thanks for the comment on my post...and nope, I haven't seen Rohit...you can forward me a pic, if you have one!!!

:)

trupti

Priyabhashini said...

सहली एक दिवसाच्या आसपास मुंबईच्या ". हे पुस्तक आपल्या संग्रही नसले तर मात्र येत्य शनिवार-रविवार कोठे फिरायला जायचे हा प्रश्न निष्कारण आपल्याला छ्ळत रहाणार, छ्ळतच रहाणार.

I often remember good old days in Mumbai and places like Arnala, Gorai, Lonawala, Malshej. I miss beauty of oceans, mountains and waterfalls here.

This books looks to be very useful traveller's guide. If you use it and visit these places all over again -- do write in your future posts.

Priyabhashini said...
This comment has been removed by the author.
HAREKRISHNAJI said...

प्रियभाषिनी,

आभार. माझ्या भटकंतीवर आपण सांगितल्यावर लिहायला सुरवात केली आहे.

Shielesh Damle said...

Dear Harikrishnaji,

I am pure mumbaite(mumbaikar). For past 16 years I do not in Mumbai and frankly I do miss my mumbai. After reading your various articles on books and food. I am pleased at least by reading I can remember mumbai. Please do write such book reviews again. There are many such books in market now.