Saturday, March 17, 2007

सुसाळे बेट, मुळशी तलाव

(फोटो मुळशीचा नाही)
मु.पो. सुसाळे. त्या पोर्णिमेच्या रात्री आमचा मुक्काम होता सुसाळे बेटावर, मुळशी तलावातील एका निसर्गरम्यजागी. आम्ही म्हणजे तीन शिलेदार, श्री सुरेश परांजपे, श्री परांजपे (आडनाव बंधु) आणि अस्मादिक.
दुपारची १२ च्या सुमारास लोणावळ्यावरुन सुटणारी भांबुर्डे गावाला जाणारी राज्य परिवाहनची बस आम्हाला पकडायची होती मग त्यासाठी सकाळीच लोणावळयाला पोहोचलो, तीन तास इथे कुठे घालवायचे ह्या विचारांनी कोरी गडच्या दिशेने चालायला सुरवात केली अर्थात वाटेत चिक्की घेण्यास थांबलो होतो ना. आय ऐन ऐस शिवाजी पार करत सहारा लेक सिटीच्या जवळ अलीकडे झालेल्या नविन सन सेट पॉइटवर थोडासा टाईमपास केला कोरी गड मोहवत होतो पण आता लक्ष होते सुसळे बेट. तेवद्यात मागुन बस आलीच. तेलबैल्याला लांबुनच सलाम करीत बस आपल्या मुक्कामी, भांबुर्डे गावाला पोहोचली. खाना खा लिया, पानी पी लिया अब चले सुसाळे की और.
एक अर्धाकच्चा वाहनांचा रस्ता येथुन पॊडच्या दिशेने जातो मग आमची त्यावरुन पदयात्रा सुरु जाहली अतिशय निसर्गरम्य अश्या रस्तावरुन. एका बाजुला मुळशी तलावाचे विहंगरम्य द्रुश्य, छानसे वाटेवरील घनदाट जंगल अवलोकीत, त्यात एका ओढ्यात तयार झालेले रांजण पाहात ३-४ तासाच्या पायपिटीनंतर मुख्य रस्ता सोडुन डावी क्डे वळलो, रस्तात गावकऱ्यानी सांगितलेली " एकाच झाड आहे तेथे वळा " ही खुण लक्षात ठेवली होती ह्या बेटाचे एक निमुळते टोक रस्ताला मिळत असल्यामुळे येथुन जाता येते. मजलदरमजल करीत आखिर पोहचलो सुसाळे बेटावर.
वरती छोटेसे गाव असुन आमची सोय त्यांनी छोट्याश्या देवळात केली. दुसऱ्या दिवशी पहाटे ऊठुन सर्वप्रथम बेटावरील उत्तुंग टोक गाठले ते देहभान हरपण्यासाठीच. नजर जाईल तेथपर्यत पाणीच पाणी, घनदाट जंगल, वर पसरलेले निळाइ आकाश. वा राजाबाबु बढीया है । बस्स मौ़त आनी है तो इसी व़क्त आये ॥
नास्तापाणी करुन आता परतीच्या वाटेवर लागायचे होते पण परत आलो ती वाट चोखाळायची नव्हती, गावकऱ्यांना विनंतिअर्ज केले , काहीही करा पण आमची नौका पार करा ही दो. ते तयार झाले आणि आम्ही सज्ज जाहलो नौकाविहारासी. डोंगर ऊतरुन तलावाकाठी आली आमची स्वारी. बरे झाले मगाशी म्हटले होते ते मौतबीत विषयी, पण ते खरेबीरे झाले नाही ते. आत्ताची अनुभुती शब्दाच्या पलिकडची होती. भलामोठा तो मुळशी तलाव त्यात आम्ही चिमुकले मत्समानव, निसर्गाने चहुअगांने उधळण केलेली न्याहळतांना , अचानक श्री सुरेश परांजपेना पराशर ऋषी आणि मत्सगंधा आठवले, नक्कीच ह्याच परीसरात पराशर ऋषी देहभान हरपले असणार. त्यात त्यांचा काय दोष ? ही सारी निसर्गाची किमया.
सर्व चागंल्या गोष्टीची केव्हातरी अखेर होत असते. नौकाविहाराची पण. पलिकडच्या किनाऱ्यावर पोहचलो आणि परत सुरु झाली वाटचाल घुसळखांबच्या दिशेने. प्रसन्नचित्ताने.
ह्या नंतरची भ्रमंती होती धन गड ते पाछ्यापुरच्या वाडी पर्यंत. परत केव्हातरी.

1 comment:

Priyabhashini said...

Looks to be an exciting place. I think if you add photographs to this article it would look much more interesting.


BTW, What about Parashar rishi and Matsyagandha? Is this place known for a legend of somekind?