Thursday, March 29, 2007

झांजरोली धरण आणि तारुखांड

पावसाळा सरता सरता एके दिवशी मोरुचा बाप मोरुला म्हणाला " मोरु ऊठ आज आपला दसरा, मोहिमेवर जाण्यास तयार हो. मोरु (दोन्ही मीच) ऊठला, शमी व्रुक्षावर ठेवलेली आयुधे (हंटर शुज व पाठपिशवी ) खाली उतरवली आणि कुच केले झांजरोली धरण आणि तारुखांडचा दिशेने, श्री सुरेश परांजपेच्या सोबत. भल्या पहाटेची विरार लोकल व विरार वरुन शटल पकडून केळवे रोड रैल्वे स्थानकावर उतरलो व पुर्वेच्या दिशेने कच्चा मातीच्या रस्तावरुन पदभ्रमंतीस सुरवात केली. अचानक वाटेत अकस्मात पावसाने बेसावध असताना गाठले आणि झोडपायला सुरवात केली.
बाहेर पाऊस व मनात नुरजहान थैमान घालु लागले. आपल्या दर्दभऱ्या आवाजात, काळीज पिळवुन टाकत नुरजहान गाऊ लागली " आ घटा काली घटा अबके बरस ना बरस, मेरे प्रितम है परदेश " ( माझी प्रिया परदेश कसली चागंली घरात आरामात होती, आणि मी येथे पावसाचा मार खात तिच्या आठवणीत मला छ्ळत. )
पावसाचा मारा असह्य झाला व मी धावलो भल्यामोठया पाणाच्या टाकीच्या आश्रयास. आला तसा हा श्रावणातला घन निळा बरसुन गेला वातावरणात प्रसन्नता जाणवयाला लागली. मधेच टाकी वर चढुन आसमांत न्याहळण्याची आलेली हुक्कीपण शमवुन घेतली. थोडेसे अंतर चालुन गेल्यावर आले ते झांजरोली धरण. निसर्ग जणु चहुहस्ते आसमांतात आपल्या खजिन्याची ऊधळण करीत तो रिता करु पाहण्याचा असफल प्रयास करु पहात होता. तासाभराचेच हे रैल्वे स्थानकापासुनचे अतंर कसे कापले कळलेच नाही. तलावाकाठी स्रुष्टीचे कौतुक करत काही काळ सुखात बितवला, मग वेळ आली डोंगरावर चढण्याची. धरणभितींच्या वरील पाण्याचा सांडवा ओलांडून पलिकडे गेल्यावर प्रथम तलावाच्या काठाकाठाने जाणारी एक पाऊलवाट नंतर डोंगरावर चढु लागते ती चक्क सुपधरा नामक धबधब्याकडे. त्याच्या कडेने पाऊलवाट वरच्या जंगलात शिरुन शेवटी तारुखांड डोंगराच्या धारमाथ्यावर जाते. ती धरुन आरामात माथ्यावर पोहोचलो. ओ, हो, अरेच्या, हे काय ? पलिकडे दिसत होते सुर्या आणि वैतरणा नद्याच्या संगमाचे लोभिवणारे द्रुश्य. येथे जंगल खुप सुरेख आणि घनदाट आहे. वनभोजन करुन परतीच्या वाटेला लागलो. केव्हातरी मागील वाट चुकली एका आडव्या जाण्याऱ्या चागंल्या पाऊलवाटेने नुसतेच आडवे चालत राहिलो, वाट खाली ऊतरण्याचे नावच घेत नव्हती. मग ओढ्यात ऊतरुन पाण्याबरोबर खाली सरकण्याचे बरेच असफल प्रयास करुन झाले. शेवटी आमच्या नेत्यांनी त्याच पाऊलवाटॆने चालात रहाण्याचा योग्य निर्णय घेतला. तासाभरात गुरांचे गोठे, शेती वगरे दिसायला लागले, जीव भांडयात पडला.
एकदाचे खालच्या तलावाकाठच्या गावी जावुन धडकलो. हि एक अस्मरणिय सफर होती.
केळवे रोड रैल्वे स्थानकावर बहुतेक लोक उतरतात ते केळवेमाहिम येथे असण्याऱ्या सम्रुद्र किनारी जाण्यासाठी.
मदत : श्री सुरेश परांजपे लिखित " सहली एक दिवसाच्या आसपास मुबंईच्या.

2 comments:

Shielesh Damle said...

Dear Harekrishnaji,

Thanks for informing us a wonderful signt, Whenever I will visit Mumbai I have decided to visit this place too

HAREKRISHNAJI said...

It's so close to Mumbai, I am sure you will enjoy. The best season is after monsoon is over.