
माझी बायको खुप शहाणी आहे. अजिबात हट्ट करत नाही. काही म्हणजे काही मागत नाही. जरा सुद्दा नाही. नशिब माझे हा सोन्याचा ब्लाउज बघताना जवळ्पास मारीच नव्हता. मग माझी खैर नव्हती. ( मागितले तरी पाकीटात पैसे हवेत ना, लाड पुरवायला )
मायानगरीच ही. केव्हा केव्हा वाटते मयसभेत बावचळ्लेल्या दुर्योधनाला पाहुन द्रौपदी उगाचच हसली. आमचीसुद्धा दुर्योधन सारखी अवस्था झाली होती. जणु काही कोकणातुन बाल्या पहिल्यादा मुबईत बोटीतुन उतरला. आम्हीहि तसेच बावचळलो होतो.
No comments:
Post a Comment