Sunday, March 25, 2007

ताम्हिणी घाट, भीरा पॉवर हाऊस आणि मी

पहाटेची इंटरसीटी पकडायची आणि पुण्याला पळायचे हा नेहमीचा शिरस्ता.
गेल्या पावसाळ्यात, ऐकदा समोरुन ट्रेन निघुन गेली, थांबण्याचा कंटाळा आला होता, वेगळी वाट चोखळायची ठरवले, श्री सुरेश परांजपे बरोबर झालेले बोलणे आठवले आणि पनवेलला जाणारी लोकल पकडली. पनवेलला उतरलो नी पाठुन येणारी दिवा- सावंतवाडी ट्रेन पकडली आणि नागोठण्याला उतरलो. रिक्शा पकडुन पालीला श्री गणरायांचे दर्शन घेतले. (नागोठणे -पाली उत्तम रिक्शा सेवा उपलब्ध आहे.) न्याहारी करण्यासाठी वेळ न गमवता भीरा पॉवर हाऊसला जाणारी राज्य परिवाहन मंडळाची बस पकडली. हुशः माझ्या झालेल्या धावपळीसारखाचे हे लिहिणे झाले आहे.
हा रस्ता खुप सुरेख आहे, त्यात वरती पावसाळी वातावरण, सुष्टिने सुखदायक, आल्हादायक हिरव्या रंगाच शालु परिधान केल्यामुळे मनास होण्याऱ्या संतोष. प्रवास अगदी मजेत चालला होता. पण बस मधे मिळालेल्या उलटसुलट माहिती मुळे जरासा माझा गोंधळ उडला आणि मी रवाळजे गावात उतरलो. हे गाव छान आहे आणि येथेही धरण व पॉवर हाऊस आहे पण ते पहाण्यासाठी वेळ नव्हता. उगाचच येथे टाइमपास झाला. बऱ्याच वेळाने आलेली रिक्शा पकडुन मी भीरा पॉवर हाऊसच्या दिशेने निघालो. वाटेत विळा नामक गावात उतरलो. एकाने मला मोटरसायकलवरुन भीरा पॉवर हाऊसला सोडले.
अचानक भीरा पॉवर हाऊसचा परिसर पाहुन मी खुळावलो. नादावलो. हा सारा परिसर अतिशय निसर्गरम्य आहे अगदी मुळशी तलाव, पौड पर्यत. रांगडया सह्याद्रिचे हे रुप पहाता पहाता देहभान हरपायला होते. अंगावर येणारा रिमझिम पाऊस, खट्याळ वारा झेलीत, भीरा पॉवर हाऊसला असणारे धरण, पाण्याचा तो अमाप साठा पाहात मस्त पैकी ह्या परिसरात मी हिडलो. येथे टाटाचे पॉवर हाऊस आहे वैशिष्ट म्हणजे येथे महाराष्टात सर्वात जास्त पाऊस पडतो.

आता वेध लागले होते ताम्हिणी घाटाचे. परत फाट्यावर आलो आणि जणुकाहि वीजच कोसळली. दरड कोसळल्याने घाटतली वाहतुक दोन दिवस झाले बंद होती. अरे रामा. परतीचे दोर तर कापले होते. आता आर या पार. मागे परतणे नाही. आशा होती काहीतरी वहान मिळेल त्या दिवशी माझे नशिब चागंले ही होते आणि वाइट पण. वर जाणार एक टेंपो जणु काही माझ्यासाठीच धाडल्याप्रमाणे आला अस्मादिकांची सोय झाली.

ह्या साऱ्या रस्तावर अमाप, अगणित प्रपात, धबधबे आहेत. सह्याद्रिच्या माथ्यावरुन कोसळण्याचे साहस केवळ पाणीच करु शकते व वर चढण्याचे वाराच. प्रचंड महाप्रचंड, अबब केवढे हे प्रपात आणि हे धुके म्हणजे काय म्हणावे त्याला, दोन पावलावरचेही दिसु नये. हि धुक्यात हरवलेली वाट ब त्यावर मार्गक्रमण करित असलेलो फक्त आम्हीच. आता ह्या हिरव्या रंगात लाल मातीचा लाल रंग मिसळ्लेला. पाणीच पाणी चहुकडे. किती कौतुक ह्या निसर्गाचे व त्याच्या ह्या रौद्र रुपाचे करावे ? मग आला क्षण कोसळलेली दरड ओलांडण्याचा. रस्ता दुरुस्तीचे काम चालुच होते. चालकाने घाबरत घाबरत त्या मातीच्या ढिगाऱ्याबरुन, घसरत, घसरत कसेबसे वाहान काढले. आणि मी परत निसर्गाचे अज़ीब रुप न्याह्याळण्यास मोकळा झालो.
वाइट अशासाठी की ते वहान तसे नादुरुस्त होते. १०-१५ कि.मी. च्याच वेगाने हा प्रवास करत होते. एक प्रकारे बरेच झाले म्हणा सावकाशीने सर्वकाही चवीचवीने न्याहळता आले. मनात साठविता आले.

ताम्हिणीतील त्या वैशिष्टपुर्ण दऱ्या धुक्यात हरवुन गेल्या होत्या. विझांई देवीचे दर्शन घेण्यास वेळच उरला नव्हता. परत जाण्यासाठी वहान मिळेलच ह्याचा ही भरवसा नव्हता. डोंगरवाडी ओलाडली मग आला महाकाय मुळशी तलाव. हा परिसर माझा अतिशय आवडीचा. किती पाहु आणि काय काय पाहु. खरच आपण मानव ह्या निसर्गापुढे किती ............ (शब्दच सुचत नाही. )

चांगल्या गोष्टिची पण अखेर असते. पौड आले आणि संपली माझी समाधी अवस्था. परत मी स्वर्गातुन खाली धरतीवर येण्यास सुरवात झाली

4 comments:

Priyabhashini said...

सह्याद्रिच्या माथ्यावरुन कोसळण्याचे साहस केवळ पाणीच करु शकते व वर चढण्याचे वाराच.

सुरेख वर्णन.. हे वाक्य फारच आवडले पण फोटो कोठे आहेत???

सध्या खूप बिझी आहे पुढचे किती दिवस लिखाण होणार नाही सांगता येत नाही. :)

HAREKRISHNAJI said...

प्रियाभाषिनी,

आपल्या प्रतिक्रियेची मी आतुरतेने वाट पहात होतो.
दुर्दैवाने त्यावेळी माझ्याकडे camera नव्हता. पण ह्या वर्षी परत पावसाळ्यात मी ह्या परिसरात जाणार आहे तेव्हा नक्की फोटो काढीन.
आता वाट पहात आहे आपल्या लिखाणाची

Shielesh Damle said...

Dear Harekrishnaji,

I am NRI and unfortunate to miss Sahaydri in monsson. When I read your articles, the description and photos are like virtual tour. Please write more such articles and upload more photos.

Thank you

HAREKRISHNAJI said...

Yes Shielesh, you are really missing Sahadries in monsoon. Unfortunately that time I was not having Digital Camera. But I will retrive the photos I am having and try to upload on blog.