Wednesday, April 29, 2009

जेव्हा

जेव्हा फोनचा रिसीव्हर उचलुन कानाला लावता व नंबर डायल न करता, अजुन हा समोरचा माणुस फोन उचलुन बोलत का नाही याचा विचार करु लागतात तेव्हा ...........

जेव्हा

जेव्हा रात्री, एखाद्या Excel File चा प्रिंट आउट घेवुन , तीच File समोर स्क्रीनवर उघडी ठेवुन, त्याच्यावरचे व कागदावरचे आकडे चेक करत त्यावर टिक मारत जातात तेव्हा ............

जेव्हा

जेव्हा रात्री घरी पोचल्यावर दारावरच्या बेल समोर ती वाजवायची सोडुन तुम्ही तुमच्या कार्यालयातील Access Card नाचवायला लागतात आणि अजुन हा दरवाजा उघडत कसा नाही याचा विचार करु लागतात तेव्हा ............

Sunday, April 26, 2009

क्रेझी पुणॆकर्स


दुसऱ्या मजल्यावरुन सुरु झालेली रांग रस्तावर आली आहे. दुर्वांकुर डायनींग हॉलमधे जेवणासाठी काय हा आटापिटा.

( रांगे्च्या सुरवातीला मी असल्यामुळे आता पोट ्भरल्यावर म्हणु शकतो "पुणॆकर्स आर क्रेझी. ’ )

बुलबुल

ब्लॉगल्स, सिझलर्स, बायको आणि आमरस.




उलटतपासणी सुरु झाली.
 
"ही तुझी दुसरी वेळ." 
 
"नाही. पहिलीच." 
 
डोळ्याला डोळा न भिडवता तोंडातल्या तोडात पुटपुटत उत्तर. 
 
"खोटे बोलु नकोस. ही तुझी दुसरीच वेळ आहे, पहिल्यांदा फोर्टमधे आणि आता हिरानंदानी मधे. ("आम्हाला घेवुन न जाता " हे न बोललेले वाक्य सर्वात महत्वाचे )   
  
'गुन्हा कबुल आहे."
 
त्याचे असं झाले.
  
काही महिन्यापुर्वी काही ब्लॉगर्स , आपली ओळख केवळ ब्लॉगपुरती सिमीत राहु नये या विचाराने एकत्र आले होते, अंधेरीच्या एका हॉटॆलात गप्पागोष्टी करत जेवायला गेले. आता पुढच्या महिन्यात परत भेटायचे हा वायदा करत. (पुढचा महिना उजाडायला मधे तीन महिने जावे लागले. ) 
 
काही दिवसापुर्वी सिझलर्सचा एक फोटॊ माझ्या ब्लॉगवर मी टाकला होता. मग त्या वरुन " आपण या वेळी योकोत सिझलर्स खायला जायचे का ? " या चर्चेला जी सुरवात झाली त्याचा शेवट अखेरीस काल झाला. आम्ही पाच जण हिरानंदानी मधे योकोत सिझलर्स खाण्यासाठी जमलो. म्हणजे खाणे हे तसे निमीत्यपात्र. एकत्र जमुन खुप गप्पा मारायच्या हे मुख्य उद्दिष्ट  ( मी आणि गप्पा ? काहीतरीच काय . सांगु द्या तिला आपल्या नवऱ्यानी कधी तिच्याशी मनमोकळेपणे गप्पागोष्टी केल्या आहेत ते आपला विक्षिप्त,चक्रम  नवरा माणुसघाणा आहे ते ठाम मत )   


तर तिला टाकुन आपल्या नवऱ्याने एकट्याने जावुन दोनदा योकोमधे सिझलर्स हाडादले याचा तिला भयंकर सात्वीक संताप आला. 
 
दिवस दुसरा. 
 
"तुला माहिती आहे काय गं,  या दिवसात दुर्वांकुर मधे थाळीत अमर्यादित आमरस असतो, चल जावुया आज "
 
नशिब रे, बायको थोडक्यावर पटली म्हणायचे. 
 
मग काय, दुर्वांकुर आणि तुटुन पडणॆ आमरसाच्या वाटीवर. वाटीमागुन वाटी रित्या होत गेल्या, नाही वाढणारा कंटाळला, नाही त्यानी हात आखडता घेतला, नाही हाणणाऱ्यानी.    
 
तॄप्त मनाने घरी परतलो.
 
पण.
 
शेवटचा, अखेरचा  शब्द तिचा होता. ( आणि नवऱ्यांना वाटते आपणच हुशार )
 
"तुझ्या सदविवेक बुद्धीस स्मरुन  सांग मला. सिझलर्सचे परिमार्जन दुर्वांकुरने होत नाही. लक्षात ठेव, पुढच्या आठवड्यात आपल्या लग्नाचा वाढदिवस आहे विसरु नकोस .’  

दार उघड बये दार उघड, दार उघद बये दार उघड

"मी महाराष्ट्र बोलतोय "  हा आजच्या दै. सकाळ मधला लेख. लेखातील काही उतारे  

"राज्यातील जवळपास प्रत्येक विभागात व प्रत्येक जिल्य्हात पाण्याची टंचाई, बंद पडत चाललेले उद्योगधंदे आणि वाडती बेरोजगारी, या समस्यांनी अक्षरशः उग्र रूप धारण केलयं."

"वीजटंचाई आणि पाणीटंछाई यापेक्षाही महाराष्ट्राला आज भेडसावणारी मोठी समस्या म्हणाजे बेरोजगारीची "

"तर अवघ्या पाच-सात रुपयांसाठी साठ साठ किलो माणसांना वाहून नेणारे सायकल रिक्षावाले नागपूरमधे दिसले. सूर्य डोक्यावर आग ओकत असताना या महिला, हे शेतकरी काम करूच कसं शकतात, हा प्रश्न आम्हाला अजूनही सुटलेला नाही. पण सारं काही पोटासाठी "

" मग कोणतीच कर्जमाफी त्याला सावरु शकत नाही आणि आत्महत्येचा आकडा फुगत जातो "   

"नवऱ्यानी आत्महत्या केलेली. पदरी चार मुली. रोजची मजुरी पंचवीस रुपये, या पंचवीस रुपयात पाच जणांचा संसार चालणार कसा ? "

"रात्री दोन वाजताही पाण्यासाठी नदी गाठावी लागते, मग सहावीत शिकणाऱ्या ममतालाही आपल्या वजनाइतका पाण्याचा हंडा उचलावाच लागतो किंवा परीक्षा सुरू असतांनाही बाळूला चार-पाच तास पाणी भरण्यासाठी वेचावे लागतात. या मंडळींच्या आयुष्यात "जय हो ... " कधी होणार आणि कोण करणार ? "

आणि दुसरी बातमी. 


"जेजुरी साकारणार अद्वितीय शिल्प. जेजुरी येथील श्री मार्तंड देवस्थानातर्फे सुमारे एक कोटी रुपये खर्चून बनविल्या जाणाऱ्या ब्रॉंझ माध्यमातील या शिल्पसमूहात  .... "


या "एक कोटी रुपयात " किती जणांचे जीवन वाचु शकेल ?  किती जणांचे आयुष्य सुसह्य होवु शकेल ? किती गावांचे प्रश्न सुटू शकतील ?  

पण . 

पोटापेक्षा भावना महत्वाच्या.   


Saturday, April 25, 2009

वणवे




अक्कलशुन्य, बिनडोक माणसाने आणखी एक निसर्गचक्र आपल्या ह्व्यासापोटी जाळुन टाकले 

वाहतुक पोली्सच जेव्हा कायदा मोडत असतात तेव्हा




कायद्याचे पालन करण्यासाठी हे वाहतुक पोलिस नो पार्कींग झोन् मधल्या ्गाड्या उचलुन या  व्हॅन मधे घालुन नेतात. 

या उघड्या व्हॅन मधे पाठीमागे अश्या प्रकारे माणसांना बसायला . उभे रहायला कायद्याने परवानगी आहे का ? 
एखाद्या टेंपो मधुन अशी माणसे नेली गेली तर तत्काळ दंड आकारण्यात येतो.

अश्या रीतेने या उघड्या व्हॅन मधे पाठीमागे ्मा्णसांनी उभे रहाणे, बसणॆ अत्यंत धोकादायक आहे.  

ते तोल जावुन् खाली पडण्याची शक्यता आहे.

आणि या व्हॅनची नंबर प्लेट ? कायद्याच्या कोणत्या कलमा खाली ती योग्य आहे ? 

   

वाहतुक पोली्सच जेव्हा कायदा मोडत असतात तेव्हा




कायद्याचे पालन करण्यासाठी हे वाहतुक पोलिस नो पार्कींग झोन् मधल्या ्गाड्या उचलुन 

Thursday, April 23, 2009

छंद , विरंगुळा.







वडील निवृत्त झाले तेव्हा त्यांचा आयुष्यात एक पोकळी निर्माण झाली. आता पुढे काय.
कधीतरी मी त्यांना , त्यांची कलेची आवड लक्षात घेता रंग आणि ब्रश भेट दिले.

आश्वासन




मी सर्व उमेदवारांना आश्वासन देतो कि आमच्या पुण्यातील पी.एम.टी.मधली आसनव्यवस्था जो कोणी सुधारण्याचे आम्हाला आश्वासन देइल त्यालाच मी मत देइन.


मला ठावुक आहे की हे खासदारांच्या कार्यक्षेत्रात येत नाही, पण आता पर्यंत येवढी आश्वासन मिळाली आहेत त्यात आणखी एकाची भर.

Sunday, April 19, 2009

रस्सी जली मगर बल नही जला

दरवाजा भलाभक्कम आहे . कुलुपही चोरटुयानी फोडलेले दिसत नाही. 
लेकीन. 
खंडहर यह कह रहे है , इमारत कभी बुलंद थी.



वीटभट्टी, आणि अनिल अवचटांचे. "प्रश्न आणि प्रश्न "


आज पहाटे फिरायलो निघालो. वाटॆत वीटभट्टी पाहिली आणि दोन पुस्तके आठवली. मिलींद बोकील यांनी कातकरींवर लिहीलेल्या पुस्तकात कात तयार करण्याची कामे बंद पडल्यावर कातकरी या व्यवसायात वळले हे लिहीले आहे आणि दुसरे पुस्तक अनिल अवचटांचे. "प्रश्न आणि प्रश्न " . या मधल्या पाणी आणि माती " या लेखात त्यानी लिहीलयं - 
 
 
"ही वाहुन जाणारी माती म्हणाजे हजारो वर्षाच्या नैसर्गीक प्रक्रियेतुन बनलेला अतिशय मुल्यवान थर. माती म्हणजे केवळ खडकांची भुकटी नव्हे. त्यातल्या बॅक्टेरिया, जीवजंतु, किडे वनस्पती या सर्वांनी ती जिवंत बनलेली असते. 
 
आपण माणसं ही अशी बेजबाबदार की इतका किमती थर आपण खरवडून काढतो. भट्टीत घालून त्यातले जीवजंतू मारून त्याची वीट , म्हणजे थोडक्यात परत दगड बनवतो. 
 
मागे पुण्यातील वीटभट्टी-कामगारांची मी माहीती घ्यायला फिरत होतो. तेव्हाचे आठवले : वीटभट्टीवाले मुळशी तालुक्यातुन माती आणायचे. विटेला कधी नित्कॄष्ट, मुरमाड माती चालत नाही. ती उत्कॄष्ट पोयट्याची लागते, जिथे माती घायला यांचे ट्रक यायचे तिथे गेलो. शेतकऱ्यांना विचारायचो. त्यांनी काही आर्थीक अडचण म्हणुन जमीन "खणायला" काढलेली असायची. कुणाच्या घरी लग्न निघालेले किंवा कुण्याच्या गळ्याची कर्ज आलेले. जिथे हजारो वर्षे शेतीने भरभरुन उत्पन्न दिले , तिची हजार-दोन हजार रुपयांसाठी कायमची हत्त्या होत होती. गावेच्या गावे मुरमाड झालेली पहायला मिळाली. पुण्याच्या विठ्ठ्लवाडीजवळाच्या वीटभट्टांवर अशा मुलायम, चाळलेल्या मातीचे डोंगर उभे राहीलेले. माती तुडवुन, मळून लोण्यासारखी होत होती. माती नावाच्या निसर्गातील चमत्काराच्या चिता तिथे अहोरात्र फुललेल्या दिसल्या.   

Saturday, April 18, 2009

चामडॆ , प्रश्न आणि प्रश्न

श्री. नरेंद्र प्रभु यांच्या ब्लॉग वर चामडे वापरु नका या वर लेख वाचला. चामड्यासाठी सापांचे काय केले जाते याचे त्यांनी फोटोही टाकले आहेत.
Post: खरोखरच माणूस किती वाईट आहे ! Link: http://prabhunarendra.blogspot.com/2009/04/blog-post_13.html

व्हीगन जीवनशैलीत मधे सुद्धा हेच सांगीतले आहे. भुतदया, प्राण्यांवरील अनुकंपेपोटी , त्यांच्या वर होणारी कॄरता थांबवण्यासाठी चामड्यांपासुन बनवलेल्या वस्तु वापरु नका.
मला वाटते, चामडे का वापरु नये याला आणखी एक ऍंगल आहे. केवळ जनावरांसाठी नव्हे तर मानवासाठी देखील. ते कमवणाऱ्या कारखान्यात कामं करणाऱ्या माणसांसाठी तरी.
अनिल अवचटांच्या "प्रश्न आणि प्रश्न " या पुस्तकात त्यांनी कोल्हापुरातील पंचगंगा या नदीच्या प्रदुषणाबद्दल लिहीले आहे. यात चामड्याच्या कारखान्यातुन बाहेर सोडल्या जाणाऱ्या रसायनाचा. घाणीचा मोठा वाटा आहे. हे दुषीत पाणी नळावाटे पिण्याच्या पाण्यातही मिसळले जाते.
तेवढेच नव्हे तर या कारखान्यात काम करणारे कामगार अत्यंत वाईत परिस्थितीत कामं करत असतात.
" अनेक छोटे हौद. त्यात चुना , रसायन मिश्रीत पाणी होते. त्यात चामडे कमावयाची एक प्रक्रिया असे. लोकांना त्यात उभे राहुन काम करावे लागे. मालकांनी त्यांना पायात गमबुटही दिलेले नसे. ते मोठ्या टायरच्या ट्युबच्या छोट्या तुकड्याला एका बाजुने बांधत त्यात पाय घालुन या घातक हौदात काम करत. सर्वत्र जनावरांची कातडी टांगलेली. त्यात मसाला भरलेला असल्याने फुगलेली व पाणी निथळणारी. काही माणसे कातडे आल्या आल्या हाताने, छोट्या हत्याराने घासुन त्याला चिकटलेले मांस, कातडीवरचे केस सोलत बसलेली असते. तीही उघड्या हातांनीच. त्या सर्व परिसरात या सगळ्याचा कुजका सडका वास भरलेला.
या प्रक्रियेत १५० प्रकारची रसायनं वापरली जातात. त्यातील क्रोमीयम सल्फाईट हे आपल्या शरीरात गेलं तर कॅन्सर निर्माण करु शकतं असं आहे. कामगार उघड्या हाताने क्रोमीयम सल्फाईट्ची हिरवी-निळी पावडर उचलत होते आणि पाण्यात कालवत होते. आपण काय हाताळतोय याची कणभर जाणीव त्यांना नसावी, असा त्यांचा चेहरा होता. किंवा माहीत असते तरी ते काय करणार होते ? "

हा बुट फेकुन मारायची कोणाची शामत आहे ?

म्हातारीचा बुट. 

Friday, April 17, 2009

सामना आणि मर्मभेद

अरुण साधु यांच्या सामना कादंबरीत कामगार नेता डिकास्टाच्या तोंडी (चित्रपटात कै.सतीश दुभाषी) एक वाक्य आहे "तर राज्याच्या मुख्यमंत्राला मंत्रालयासमोर जोड्याने हाणु"

त्या काळात हे असे जोडे फेकुन कोणी मारत नव्हते.

शशी भागवत यांच्या "मर्मभेद" या कादंबरीत एक जबरदस्त प्रसंग दिला आहे. प्रतिकुल परिस्थितीचे हुशार राजकारणी कसा धीरोद्धत्त वागुन आपल्याला हवे त्या संधीत त्याचे रुपांतर कसे करतो.

राजपुत्र कुणाल अचानक गायब झाले आहे, त्यांचा घात झाला असावा, यात काळेबेरे असावे हे जाणुन समस्त खवळलेली, संतापलेली जनता जाब विचारायला कृष्णांतच्या प्रासादासमोर जमते आणि संतापाच्या भरात कृष्णांताच्या वर व इतर सरदार, मंत्रांवर दगडधोंद्याचा वर्षाव करते. सारे जण पळुन आत जातात, फक्त कारस्थानी कृष्णांताशिवाय. तो धीराने सारा मार खात अचल उभा रहातो.

हळुहळु लोकक्षोम ओसरु लागतो, आणि मग कावेबाज कृष्णांत हरलेली बाजी उलटवतो.
तेव्हा ........

Tuesday, April 14, 2009

इसापनिती आणि राजकारणी.

दोन कोल्हे प्रवासास निघाले. एक वॄद्ध आणि एक तरुण. 

वाटेत एक नदी लागली. तेथे होत्या खुप जळवा. नदी पार करतांना दोन्ही कोल्हांचे सारे अंग त्या जळवांनी भरुन गेले, अश्या चिकटल्या त्यांना.
 
तरुण कोल्हाने विचारलो, आपण या अंगाला चिकटलेल्या जळवा काढुन का टाकत नाही आहोत ? 

अनुभवी, वॄद्ध कोल्हाने उत्तर दिले, " हा सारा प्रदेश या अश्या रक्तपिपासु जळवांनी भरलेल्या. , या साऱ्या जळवा आपले रक्त पिवुन शांत झाल्या आहेत, फुगल्या आहेत, आणखी रक्त पिण्याची त्यंची क्षमता संपली आहे. यांना काढुन टाकले तर यांच्या जागी नवीन जळवा चिकटतील व परत त्या आपले रक्त शोषु लागतील.
 
तेव्हा आहे ते ठिक आहे.          

Monday, April 13, 2009

बायकोला दुखवायचय ? नाराज करायचय ?


घॊट वालाचे कढण ( की कढवणी ? ) , चांगले झाले आहे. 

पण. ( हा सुर फार कुत्सीत, हेटाळणी करणारा लागला पाहिजे)  

पण , आईच्या हातची चव त्याला नाही. माझी आई काय मस्त करायची.  

(एका भांड्याला आलेला पोचा आणि हे उरलेले वाल घेवुन जा , जा सांग आपल्या आईला मला कढण करुन घाल म्हणुन )

स्वीस बॅंक आणि बेहिशोबी पैसा

स्वीस बॅंकेत ठेवलेला, न ठेवलेला , असलेला किंवा नसलेला बेहिशोबी पैसा भारतात परत आणा म्हटल्यावर सर्व खुष. लगेच माना डोलायला लागतात. माझ्या लहाणपणापासुन मी हे ऐकत आलो आहे परत आणा, परत आणणार, आणणार, पण अजुन पर्यंत तरी पैश्याचे काय झाले हे कळलेले नाही. 
 
"भारतातील सर्व काळा पैसा उघडकीस आणु" . या घोषणेत तेवढा जोर नाही , अपील नाही व ती अडचणीची देखील असावी. 
 
जेव्हा सुखराम सारख्या एखाद्या नेत्याच्या घरी छापा मारला जातो , तेव्हा पैसे कोठे आणि कसे ठेवावेत किंवा आता जागाच राहिली नसल्यामुळॆ मग ते उश्यांच्या अभ्रात, चादरीत बांधुन त्यांची बोचकी करुन ठेवलेले मिळतात.  काही लोकप्रतिनिधी मत देण्यासाठी मिळालेला काळा पैसा बुद्धुपणॆ सरळ बॅकेच्या बचत खात्यात जावुन भरतात व पकडले जातात.  
 
गल्लीतले कालचे कार्यकर्ते गळ्यात जाडजाड सोन्याच्या चेनी ( चेन नव्हे चेनी ) घालुन , गाड्या उडवीत फिरु लागतात,  निवडणुकीत उमेदवार कोट्यावधी उड्डाणे घेतात.
 
तेव्हा सध्या भारतातच असलेला बेहेशीबी पैसा बाहेर आणला गेला तरी पुरेसा आहे, स्वीस बॅक तर दुर राहिली.

सापळॆ


एखादी चाल निरर्थक खेळावी लागते , अहेतु वाटते, पण लावलेल्या सा्पळ्यात अलगद सापडावा म्हणुन ती खेळावी लागते.  केव्हा केव्हा मला उंट फार आवडतात, लांबवरचा पल्ला धरुन बसलेले असतात.  

Pb7 व Px P खेळुन त्याने  चुक केली. काळा उंट ओपन झाला.  Ka8 हि एक निरर्थक खेळी.  Pe4 x Pf3 - Blunder.      

बुढीया नही गुडीया है

"गुडीया" हा  शब्दप्रयोग इंदिरा गांधीच्या बाबतीत पण केला गेला होतो. 
 
"गुंगी गुडीया." 
 
पण या गुंगी गुडीयाने कामराज योजना आणली आणि  एका कॉंग्रेसमधल्या वयोवॄध्यांना एका झटक्यात घरी पाठवुन, राजकारणातुन निवॄत्तीची सक्ती करुन एक दणका दिला होता. 
 
आता परत एका गुडीयाची गरज आहे, राजकारणातुन अतीवॄध्यांना निवॄत्त करुन घरी आराम करायला  पाठवायला.   

Sunday, April 12, 2009

शतरंज के खिलाडी.



गेले दोन दिवस सपाटुन हरत होतो, समोर आलेले खायचे नाही, चांगल्या चाली रचुनही त्याचा फायदा करुन घ्यायचा नाही, उगीचच आपल्या मोहऱ्या प्रति्स्पर्धाला दान करायचा.  

Simply Blunder. 

रेटीग खाली खाली जाता जाता तळाला पोचले. मग परत एकदा मनाने उभारी घेतली. 

Yes. You can do it. Come on Fight.

मग काय पानीपत आणि पानीपत. 

तेव्हा 

मौजे गम से न कोई हो मायुस ,जिंदगी डुबकर उभरती है


Saturday, April 11, 2009

एक संध्याकाळ पर्वतीवर


एक संध्याकाळ पर्वतीवर


ही पण तट्बंधीचीच भिंत, पण त्याच्या बाजुची भिंत कशी नटलेली, सजलेली नाही तर ही,

जो जो जे जे वांछील तो ते लाहो प्राणीजात

ही जनता फार मोठी स्वार्थी आहे, सदैव फक्त आपलाच स्वतःचा विचार करत असते, आज काय हे पाहिजे, उद्या काय ते पाहिजे, बस्स अख्खा वेळ यांच्या मागण्या सुरु असतात, कशानेही, कितीही, काही ही केले तरी समाधान होत नसते.
 
कधी तरी या जनतेने आपल्या नेत्यांच्या विचार केला आहे का ? त्यांच्या इच्छाआकांक्षा, महत्वकांक्षा, त्यासाठी त्यांनी केलेली आयुष्यभरची धडपड, त्यांच्या पदरी पडणारी सततची निराशा, लक्षाच्या जवळ पोचुनही त्यापासुन लांब राहिल्याने मनाची झालेली अवस्था, घोर निराशा. कधी तरी याचा विचार जनतेने केला आहे काय ?
 
हीच वेळ आहे काही तरी करुन दाखवण्याची, या नेत्यांनी आपल्यासाठी जे काही केले आहे त्याची परतफेड करायची.  
 
बहुतेक वयोवॄध्द नेत्यांची आयुष्यातील ही शेवटची निवडणुक असण्याची शक्यता आहे. बिच्चारे आयुष्यभर पंतप्रधान होण्याच्या स्वप्नांचा पाठलाग करुन दमलेले आहेत. त्यांच्या साठी आत्ता किंवा नंतर कधीच नाही अशी परिस्थिती आहे.
 
असे काय करता येईल का की तीन तीन महिन्यासाठी प्रत्येकाला पंतप्रधान होण्याची संधी देता येईल ? किंवा एकावेळी चार पंतप्रधान करता येतील काय ? 
 
अखेर हे सार साऱ्यांच्या इच्छा पुर्ण व्हाव्यात या साठीच .   
 

Friday, April 10, 2009

सि्झलर्स


हल्ली ती  नवऱ्याचे ऐकायला हळुहळु शिकायला लागली आहे ( ऐकायला की त्याच्या फर्माईशी पुऱ्या करायला ?

  

ती दहा मिनीटॆ

आजच्या दै.सकाळ मधे एक बातमी वाचुन हसु आले. नियोजीत कालाविधीपेक्षा दहा मिनीटे सभा अधिक वेळ घेतल्याने एका उमेदवारावर गुन्हा दाखल केला आहे.
 
१९८४. इंदिरा गांधी यांच्या हत्त्येनंतर झालेल्या शिखविरोधी दंगलीत आरोपी असलेल्यांवर २५ वर्षे झाली तरी अजुनही खटले सुरु आहेत, या सदरहु व्यक्ती आरोपी आहेत की नाही या मुद्दावरच अजुन गाडी अडकलेली दिसतेय. २५ वर्षानंतरही दंगलीत होरपळलेले अजुनही न्यायाच्या प्रतिक्षेत आहेत. 
 
मुंबईत झालेली दंगल, गुजरात मधे झालेली दंगल , बाबरी मशीद पाडल्यानंतर देशभर उसळलेल्या दंगली, यातल्या गुन्हेगारांचे पुढे काय होते कधी त्याचा पत्ता पण लागत नाही.
 
या गंभीर गुन्हांची ही गत तर दहा मिनिटांच्या जास्तीचे काय ??  

अतिरेक्यांच्या भीतीचा अतिरेक

त्या सिक्युरीटी गार्डनी बॅग उघडली, आत मधे एक पुडके होते , 
 
"हे काय आहे ? " त्याने पुच्छा केली.
 
"काही नाही " ( आता हा काय जबाब झाला ? )
 
या माझ्या उत्तराने त्याचे समाधान झाले. 
 
बॅगेतले सामान उगीचच इकडेतिकडे केले , बॅग बंद केली.
 
"गाडीची डिकी उघडा " 

जरासे इकडेतिकडॆ बघीतले. झाले समाधान.
 
त्याला म्हटले, "बाबारे  स्फोटके कशी असतात, बॉम्ब म्हणजे काय ? कसा असतो, तो हाताळायचा कसा , काहीतरी तुला माहीती आहे कायरे ? तु आता डिकीत पाहिलस, चालकाच्या सिट खाली, किंवा गाडीच्या आत काय असले तर ? तु संपुर्ण गाडी तपासलीस काय ? "
 
पण एक गोष्ट चांगली झाली निदान या निमीत्ये का होईना पण अनेकांना सिक्युरीटी गार्ड म्हणुन रोजगार उपलब्ध झाला.  
 
काही देवळाच्या परिसरात कॅमेरा, कॅमेरा असलेला मोबाईल घेवुन जाण्याची बंदी केली आहेत. कारणॆ बंदी करणाऱ्याला ठावुक. 
 
या युगात जगातील कोणत्याही कानाकोपऱ्यातील नकाशे, द्रुष्य घर बसल्या इंटरनेट वर बघायला मिळतात, गाभाऱ्यातील आरत्या, दॄश्ये  टी.व्ही वर रोज पहायला मिळतात, देवाच्या मुर्त्याचे फोटो हवे तेवढे बाहेर रस्तावर उपलब्ध असतात. पण तुम्ही त्या परीसराच्या जवळपास कॅमेरा घेवुन जावु शकत नाहित, अगदी तुम्हाला देवळात जायचे नसले तरी. 

Wednesday, April 08, 2009

क्रिकेटची पाठशाळा

तो बबबच्चो आज का विविविषय है बबबल्ला कैसे हाहातोतो मे पकडना.
सुस्सुनील , सास्सामने आना तो जरा , डडडरना मत देदेखो इसे बबल्ला ककहते है , इइसको येये ऐसा हातोमे पपकडना, दादाया हाथ इइधर, बाया उधर, फिफिर जजब सामनेसे गेगेंद आयेगी ना तो ये ऐसे घुघुमाने का, ससमझे ठिक तराहसे, मैमै बिबिस-बिबिस बाबार बोबोलनेवाला नही.
देखो गेंद गया सीसीमापार

अब गावो सब मिलकर "तु है मे रे किरण तु है मेरी किरण "


आपल्या लाडक्या सुनील गावस्करबद्दल शाहरुख खानाने काहीही अकलेचे तारे तोडावेत आणि आम्ही ते ऐकुन घ्यावेत.

पाठशाला

तर मग आता पर्यंत आपण निवडणुका जवळ आल्यानंतर दगाबाजी कशी करायची, दुसरयाचे टिकिट कसे कापायचे, आपल्याला टिकिट न मिळाल्यास बंडखोरी कशी करायाची, पक्ष कसा बदलायाचा, अपक्ष म्हणुन कसे ऊभे रहायचे मित्रापक्षाबरोबर वाटाघाटी कश्या करायच्या, त्या कश्या फिस्कटायच्या, काडीमोड कशा घ्यायचा निदान तो घेणार म्हणुन धमक्या कश्या द्यायच्या हे शिकलो।
तर मग आजचा विषय आहे, या अभ्यासक्रमात यंदाच त्याचा समावेश करण्यात आलेला आहे, आता पर्यंत
आपल्या रोखाने आलेले अडचणीचे प्रश्न कसे टाळायचे, त्याला बगल कशी द्यायची, कल्टी मारून ते विचारण्यावरच कसे उलटावायचे हे शिकलो। नीट लक्ष दया , अत्यंत महत्वाचा हा पाठ आहे, जर तुम्ही लक्ष दिले नाहित तर आपल्या दिशेने भिरकवण्यात आलेली , येणारी, फेकुन मारलेली वास्तु आपण चुकवू शकणार नाही।
सर्व प्रथम हे मानेचे व्यायाम तुम्हाला शिकवतो ते शिकुन घ्या ,
क्रं।

Tuesday, April 07, 2009

काय हो राजाभाऊ

काय हो राजाभाऊ , आपल्यासारख्या नोकरी करत असलेल्या , ज्याचा आयकर पगारातुन कापला जावुन तो परस्पर भरला जातो , त्याला "आपण आयकर भरलेला नाहित तेव्हा तो भरा " अशी नोटिस येवु शकतात , तर तशी नोटिस हे जे निवडणुकीत उभे असलेले उमेदवार आपली कोट्यावधी रुपयाची मालमत्ता जाहिर करत आहेत त्यांना "आपण ही संपत्ति केव्हा आणि कशी जमवली याचे स्पष्टीकरण द्यावे " या साठी येत असला का ?

Sunday, April 05, 2009

तुम्ही त्यांना हरवु शकता

आपण आपल्या  आयुष्यभर ज्या मोजक्या नेत्यांना त्यांच्या स्वार्थासाठीचे राजकारण करतांना पहात आलो आहे, ज्या वॄत्तीचा आता आपल्याला उबग येत चालला आहे,  अश्या थोर मोठ्या नेत्यांना आपण हरवु शकतो, भले  त्यांच्याबद्दल आपल्या मनात कितीही आदर असो.

बस झाली की आता त्यांची दे्शसेवा. 

येवु द्या की नवीन विचा्रांच्या तरुणांना पुढे.  

वासुदेवाची ऐका वाणी

दान पावल दान पावल, पंढरीच्या विठोबाला, कोल्हापुरच्या महा्लक्ष्मीला , दान पावल, दान पावल , तुळजापुरच्या भवानीला, जेजुरीच्या खंडॆरायाला  दान पावल, दान पावल. 

गिरगावात अजुनही एक परंपरा जिवंत आहे


कुणी मागती पै्से तर कुणी मागती मते. 

कठोर परिश्रमास पर्याय नाही. शिस्तीने राष्ट्र महान बनते.

बघवत नाही हो , हे उमेदवारांचे हाल बघवत नाहीत, ज्या वयात नातवंडे, पतवंडॆ यांच्या सानिध्यात आपले उतारवय मजेत , आरामात, सुखासीनतेत घालवायचे त्या वयात रणरणत्या उन्हात, तप्त वातावरणात , अंगाची काहीली करुन घेत मतांसाठी दारोदारी वणावण करीत फिरत रहायचे।

नको नको , आमची सेवा करण्यासाठी आपण आपले स्वतःचे हे एवढे हाल करुन घेवु नकात. आराम करा , आता विश्रांती घ्या.
आमचे मत आपल्यालाच आहे हो. काळजी नसावी.

Saturday, April 04, 2009

संभ्रम - अनिल अवचट

अनिल अवचटांचे " संभ्रमसंभ्रमसंभ्रम" हे अंध श्रद्धांचे गुरू, अंध श्रद्धांची केंद्रे आणि अंध श्रद्धांचे बळी या विषयावरती लिहीलेले पुस्तक, काल पुण्याला येतांना लोकल ट्रेन मधे वाचायला घेतले.

एका देवीच्या डोंगरवर होणारी यात्रा, मग तेथे दिले जाणारे पशु, पक्षांचे अमानुष बळी , रक्तांचे वहाणारे पाट, वाचवेना. पुस्तक बंद केले. मानसरोवर स्थानक जवळ यायला लागले आणि ......
आणि अचानक ट्रेन मधले लाईट गेले, म्हटले देवीचा कोप झाला की काय ? आपण हे असले अंध श्रद्धांचे रिपोर्टींग करणारे पुस्तक वाचायला घेतले म्हणुन की काय देवीने हे लाईट बंद केले. मनातल्या मनात कान पकडले ना.
हमरस्तावर आलो। समस्त बुबा, महाराज, बाबा, फकीर, साध्वी, अवलीये, देवदेवता यांनी नक्कीच मला नास्तीकपणाबद्दल उदारमनाने क्षमा करुन माझ्यावर आपल्या कॄपेचा वर्षाव केला असावा, हमरस्तावर पोचतो न पोचतो तो समोर एक ....

एक गाडीवाला हात केल्याबरोबर उभा राहीला, त्या टॅवेरावाल्याने लिफ्ट दिली ती थेट अगदी घरा जवळ. खुप लवकर पोचलो. त्याला जायचे होतो महाबळेश्वरला, पिकप करण्यासाठी १० -१०.३० पर्यंत पोचायचे होते , मुंबई ते महाबळेश्वरचे अंतर ३ -३.३० तासात कापायचे होते. त्यात सतत त्याचे मोबाईल चालु, आणखी गाड्या त्यांना हव्या होत्या.

परत समस्त जनांची कॄपा , भरधाव वेगातही व त्यात मोबाईल वर चालक सतत बोलत असतांनादेखील अपघात झाला नाही.
घरी आल्यावर बायकोने नव्हे "अन्नपुर्णॆने" तिच्या रुपात येवुन मस्त पैकी डालबाटी केल्या होत्या त्या हादाड्ल्या।


कॄपाच कॄपा. अनील अवचटांमुळॆ.
आता फक्त बालाजी, लक्ष्मी व कुबेर यांची कॄपा व्हायची राहीली आहे. वाट बघतोय.

Friday, April 03, 2009

मुंबईभर रस्तावर मिळत आहे "Yellow Carpet Treatment "


गालिच्या वरुन चालतांना ठेच लागली तर तो दोष दगडाचा नाही तर तो फुलांचा आहे , ती पहाण्यासाठी सतत वरती पाहात जो चालत रहाणार त्याचा आहे

राम जन्माला ग सखे राम जन्मला







भल्या पहाटे आकाशवाणी वर लागलेल्या "राम जन्माला ग सखे राम जन्मला " या सुरेल गाण्यानी जाग आली की समजावे आज राम नवमी । या दिवशीं राजाभाऊ हमखास काळाराम आणि गोराराम या दोन राममंदीरात, रामाचे दर्शन घ्यायला जातातच। मुख्य आकर्षण येथे मिळणारा सुंठवडा। त्याचा तोंडात बकाना भरायचा

Thursday, April 02, 2009

एक सुखद क्षण

खुप दमुनभागुन , दिवसभर मर मर मरमरुन केलेल्या कामाने बेजार होवुन रात्री बिछान्याला पाठ टेकावी आणि लक्षात यावे अरे आपण दिवा मालवायला विसरलो आणि पांघरुणही घेतलेले नाही । अंगात उठण्याचे त्राण अजिबात नसते , जागचे हलवतही नाही , एवढे आपण थकलेलो असतो , ( हा मधला वेळ फार वाईट असतो, झोप डोळ्यावर आलेली असते आणि उजेड झोपुन देत नसतो ) , अश्या वेळी कोणी तरी हलक्या पावलाने यावे आपल्या अंगावर प्रेमाने पांघरुण घालावे व दिवा मालवावा।

पण हा सुखाचा क्षण नशिबात असायला हवा ।