अनिल अवचटांचे " संभ्रमसंभ्रमसंभ्रम" हे अंध श्रद्धांचे गुरू, अंध श्रद्धांची केंद्रे आणि अंध श्रद्धांचे बळी या विषयावरती लिहीलेले पुस्तक, काल पुण्याला येतांना लोकल ट्रेन मधे वाचायला घेतले.
एका देवीच्या डोंगरवर होणारी यात्रा, मग तेथे दिले जाणारे पशु, पक्षांचे अमानुष बळी , रक्तांचे वहाणारे पाट, वाचवेना. पुस्तक बंद केले. मानसरोवर स्थानक जवळ यायला लागले आणि ......
आणि अचानक ट्रेन मधले लाईट गेले, म्हटले देवीचा कोप झाला की काय ? आपण हे असले अंध श्रद्धांचे रिपोर्टींग करणारे पुस्तक वाचायला घेतले म्हणुन की काय देवीने हे लाईट बंद केले. मनातल्या मनात कान पकडले ना.
हमरस्तावर आलो। समस्त बुबा, महाराज, बाबा, फकीर, साध्वी, अवलीये, देवदेवता यांनी नक्कीच मला नास्तीकपणाबद्दल उदारमनाने क्षमा करुन माझ्यावर आपल्या कॄपेचा वर्षाव केला असावा, हमरस्तावर पोचतो न पोचतो तो समोर एक ....
एक गाडीवाला हात केल्याबरोबर उभा राहीला, त्या टॅवेरावाल्याने लिफ्ट दिली ती थेट अगदी घरा जवळ. खुप लवकर पोचलो. त्याला जायचे होतो महाबळेश्वरला, पिकप करण्यासाठी १० -१०.३० पर्यंत पोचायचे होते , मुंबई ते महाबळेश्वरचे अंतर ३ -३.३० तासात कापायचे होते. त्यात सतत त्याचे मोबाईल चालु, आणखी गाड्या त्यांना हव्या होत्या.
परत समस्त जनांची कॄपा , भरधाव वेगातही व त्यात मोबाईल वर चालक सतत बोलत असतांनादेखील अपघात झाला नाही.
घरी आल्यावर बायकोने नव्हे "अन्नपुर्णॆने" तिच्या रुपात येवुन मस्त पैकी डालबाटी केल्या होत्या त्या हादाड्ल्या।
कॄपाच कॄपा. अनील अवचटांमुळॆ.
आता फक्त बालाजी, लक्ष्मी व कुबेर यांची कॄपा व्हायची राहीली आहे. वाट बघतोय.
No comments:
Post a Comment