आजच्या दै.सकाळ मधे एक बातमी वाचुन हसु आले. नियोजीत कालाविधीपेक्षा दहा मिनीटे सभा अधिक वेळ घेतल्याने एका उमेदवारावर गुन्हा दाखल केला आहे.
१९८४. इंदिरा गांधी यांच्या हत्त्येनंतर झालेल्या शिखविरोधी दंगलीत आरोपी असलेल्यांवर २५ वर्षे झाली तरी अजुनही खटले सुरु आहेत, या सदरहु व्यक्ती आरोपी आहेत की नाही या मुद्दावरच अजुन गाडी अडकलेली दिसतेय. २५ वर्षानंतरही दंगलीत होरपळलेले अजुनही न्यायाच्या प्रतिक्षेत आहेत.
मुंबईत झालेली दंगल, गुजरात मधे झालेली दंगल , बाबरी मशीद पाडल्यानंतर देशभर उसळलेल्या दंगली, यातल्या गुन्हेगारांचे पुढे काय होते कधी त्याचा पत्ता पण लागत नाही.
या गंभीर गुन्हांची ही गत तर दहा मिनिटांच्या जास्तीचे काय ??
2 comments:
खटले २५ वर्ष सूरू नाहित तर ते मुद्दाम... लां ब व ले जातात.
.
आनी हा दहा मिनिटांचा खेळ म्हंजे कार्य तत्परतेचा दिखावा ... बाकी काय?
Sachin.
Exactly the same.
Post a Comment