Saturday, April 18, 2009

चामडॆ , प्रश्न आणि प्रश्न

श्री. नरेंद्र प्रभु यांच्या ब्लॉग वर चामडे वापरु नका या वर लेख वाचला. चामड्यासाठी सापांचे काय केले जाते याचे त्यांनी फोटोही टाकले आहेत.
Post: खरोखरच माणूस किती वाईट आहे ! Link: http://prabhunarendra.blogspot.com/2009/04/blog-post_13.html

व्हीगन जीवनशैलीत मधे सुद्धा हेच सांगीतले आहे. भुतदया, प्राण्यांवरील अनुकंपेपोटी , त्यांच्या वर होणारी कॄरता थांबवण्यासाठी चामड्यांपासुन बनवलेल्या वस्तु वापरु नका.
मला वाटते, चामडे का वापरु नये याला आणखी एक ऍंगल आहे. केवळ जनावरांसाठी नव्हे तर मानवासाठी देखील. ते कमवणाऱ्या कारखान्यात कामं करणाऱ्या माणसांसाठी तरी.
अनिल अवचटांच्या "प्रश्न आणि प्रश्न " या पुस्तकात त्यांनी कोल्हापुरातील पंचगंगा या नदीच्या प्रदुषणाबद्दल लिहीले आहे. यात चामड्याच्या कारखान्यातुन बाहेर सोडल्या जाणाऱ्या रसायनाचा. घाणीचा मोठा वाटा आहे. हे दुषीत पाणी नळावाटे पिण्याच्या पाण्यातही मिसळले जाते.
तेवढेच नव्हे तर या कारखान्यात काम करणारे कामगार अत्यंत वाईत परिस्थितीत कामं करत असतात.
" अनेक छोटे हौद. त्यात चुना , रसायन मिश्रीत पाणी होते. त्यात चामडे कमावयाची एक प्रक्रिया असे. लोकांना त्यात उभे राहुन काम करावे लागे. मालकांनी त्यांना पायात गमबुटही दिलेले नसे. ते मोठ्या टायरच्या ट्युबच्या छोट्या तुकड्याला एका बाजुने बांधत त्यात पाय घालुन या घातक हौदात काम करत. सर्वत्र जनावरांची कातडी टांगलेली. त्यात मसाला भरलेला असल्याने फुगलेली व पाणी निथळणारी. काही माणसे कातडे आल्या आल्या हाताने, छोट्या हत्याराने घासुन त्याला चिकटलेले मांस, कातडीवरचे केस सोलत बसलेली असते. तीही उघड्या हातांनीच. त्या सर्व परिसरात या सगळ्याचा कुजका सडका वास भरलेला.
या प्रक्रियेत १५० प्रकारची रसायनं वापरली जातात. त्यातील क्रोमीयम सल्फाईट हे आपल्या शरीरात गेलं तर कॅन्सर निर्माण करु शकतं असं आहे. कामगार उघड्या हाताने क्रोमीयम सल्फाईट्ची हिरवी-निळी पावडर उचलत होते आणि पाण्यात कालवत होते. आपण काय हाताळतोय याची कणभर जाणीव त्यांना नसावी, असा त्यांचा चेहरा होता. किंवा माहीत असते तरी ते काय करणार होते ? "

1 comment:

Raina said...

Avaghadh Prashna aahe kharach.