Sunday, April 05, 2009

कठोर परिश्रमास पर्याय नाही. शिस्तीने राष्ट्र महान बनते.

बघवत नाही हो , हे उमेदवारांचे हाल बघवत नाहीत, ज्या वयात नातवंडे, पतवंडॆ यांच्या सानिध्यात आपले उतारवय मजेत , आरामात, सुखासीनतेत घालवायचे त्या वयात रणरणत्या उन्हात, तप्त वातावरणात , अंगाची काहीली करुन घेत मतांसाठी दारोदारी वणावण करीत फिरत रहायचे।

नको नको , आमची सेवा करण्यासाठी आपण आपले स्वतःचे हे एवढे हाल करुन घेवु नकात. आराम करा , आता विश्रांती घ्या.
आमचे मत आपल्यालाच आहे हो. काळजी नसावी.

3 comments:

Anonymous said...

आता एक महिना थोडा त्रास सहन केला की मग पुढे ५ वर्ष एसी मधे बसुन रहायला बरं असते नां....

Narendra prabhu said...

छान हाणलेत शालजोडीतले.

HAREKRISHNAJI said...

kayvatelte व नरेन्द्र प्रभु,

धन्यवाद