"मी महाराष्ट्र बोलतोय " हा आजच्या दै. सकाळ मधला लेख. लेखातील काही उतारे
"राज्यातील जवळपास प्रत्येक विभागात व प्रत्येक जिल्य्हात पाण्याची टंचाई, बंद पडत चाललेले उद्योगधंदे आणि वाडती बेरोजगारी, या समस्यांनी अक्षरशः उग्र रूप धारण केलयं."
"वीजटंचाई आणि पाणीटंछाई यापेक्षाही महाराष्ट्राला आज भेडसावणारी मोठी समस्या म्हणाजे बेरोजगारीची "
"तर अवघ्या पाच-सात रुपयांसाठी साठ साठ किलो माणसांना वाहून नेणारे सायकल रिक्षावाले नागपूरमधे दिसले. सूर्य डोक्यावर आग ओकत असताना या महिला, हे शेतकरी काम करूच कसं शकतात, हा प्रश्न आम्हाला अजूनही सुटलेला नाही. पण सारं काही पोटासाठी "
" मग कोणतीच कर्जमाफी त्याला सावरु शकत नाही आणि आत्महत्येचा आकडा फुगत जातो "
"नवऱ्यानी आत्महत्या केलेली. पदरी चार मुली. रोजची मजुरी पंचवीस रुपये, या पंचवीस रुपयात पाच जणांचा संसार चालणार कसा ? "
"रात्री दोन वाजताही पाण्यासाठी नदी गाठावी लागते, मग सहावीत शिकणाऱ्या ममतालाही आपल्या वजनाइतका पाण्याचा हंडा उचलावाच लागतो किंवा परीक्षा सुरू असतांनाही बाळूला चार-पाच तास पाणी भरण्यासाठी वेचावे लागतात. या मंडळींच्या आयुष्यात "जय हो ... " कधी होणार आणि कोण करणार ? "
आणि दुसरी बातमी.
"जेजुरी साकारणार अद्वितीय शिल्प. जेजुरी येथील श्री मार्तंड देवस्थानातर्फे सुमारे एक कोटी रुपये खर्चून बनविल्या जाणाऱ्या ब्रॉंझ माध्यमातील या शिल्पसमूहात .... "
या "एक कोटी रुपयात " किती जणांचे जीवन वाचु शकेल ? किती जणांचे आयुष्य सुसह्य होवु शकेल ? किती गावांचे प्रश्न सुटू शकतील ?
पण .
पोटापेक्षा भावना महत्वाच्या.
No comments:
Post a Comment