Saturday, April 11, 2009

जो जो जे जे वांछील तो ते लाहो प्राणीजात

ही जनता फार मोठी स्वार्थी आहे, सदैव फक्त आपलाच स्वतःचा विचार करत असते, आज काय हे पाहिजे, उद्या काय ते पाहिजे, बस्स अख्खा वेळ यांच्या मागण्या सुरु असतात, कशानेही, कितीही, काही ही केले तरी समाधान होत नसते.
 
कधी तरी या जनतेने आपल्या नेत्यांच्या विचार केला आहे का ? त्यांच्या इच्छाआकांक्षा, महत्वकांक्षा, त्यासाठी त्यांनी केलेली आयुष्यभरची धडपड, त्यांच्या पदरी पडणारी सततची निराशा, लक्षाच्या जवळ पोचुनही त्यापासुन लांब राहिल्याने मनाची झालेली अवस्था, घोर निराशा. कधी तरी याचा विचार जनतेने केला आहे काय ?
 
हीच वेळ आहे काही तरी करुन दाखवण्याची, या नेत्यांनी आपल्यासाठी जे काही केले आहे त्याची परतफेड करायची.  
 
बहुतेक वयोवॄध्द नेत्यांची आयुष्यातील ही शेवटची निवडणुक असण्याची शक्यता आहे. बिच्चारे आयुष्यभर पंतप्रधान होण्याच्या स्वप्नांचा पाठलाग करुन दमलेले आहेत. त्यांच्या साठी आत्ता किंवा नंतर कधीच नाही अशी परिस्थिती आहे.
 
असे काय करता येईल का की तीन तीन महिन्यासाठी प्रत्येकाला पंतप्रधान होण्याची संधी देता येईल ? किंवा एकावेळी चार पंतप्रधान करता येतील काय ? 
 
अखेर हे सार साऱ्यांच्या इच्छा पुर्ण व्हाव्यात या साठीच .   
 

1 comment:

Anonymous said...

प्राणीजात! ...मानवजात नव्हे. :-)