Friday, July 31, 2009

दाभोसा धबधबा

प्रवासात अवचीत काही अप्रतीम स्थळ सापडुन जातात, आपण त्याच्या मोहात पडतो, दरवर्षी येथे परत येवुच मनाशी ठरवत रहातो, पण जाणे काही होत नाही.


जव्हारच्या जवळील दाभोसा धबधबा पाहिल्याबरोबर देहभान हरपले होते. खुप खुप उंचावरुन खाली खोल दरीत झेपावणारा हा प्रपात वेडेपिसे करुन सोडणारा आहे.

Thursday, July 30, 2009

माननीय शिक्षणमंत्री श्री. रामकृष्ण विखे-पाटीलजी,

माननीय शिक्षणमंत्री श्री. रामकृष्ण विखे-पाटीलजी,

सप्रेम नमस्कार,


ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेत गोंधळ झाल्याचे कबुल करण्यात आपण प्रामाणीकपणा दाखवला, बरे वाटले.


आता जरा लक्ष प्राध्यापकांच्या संपात घातलेत तर फार बरं होईल. मुलगा बरेच दिवस झाले घरी बसुन आहे. ( नाही तरी एरवी महाविद्यालयात जरी जात असला तरी तो लेक्चरना बसत असेलच असे नाही तरी पण).


गेल्या वर्षी अभ्यासक्रम बदललात, पाठ्यपुस्तके महाविद्यालय सुरु झाल्यानंतर त्यानुसार दोन-चार महिन्याने प्रकाशीत झाली. आम्ही काय म्हटल का ? आमच्यापेक्षा तुम्हालाच त्यांची काळजी असावी हे जाणुन गप्प बसलो ना.


पण आता तरी त्यांच्यासाठी सारे सुरळीत व्हावे हो, तेव्हा जरा त्यांच्या कडेपण लक्ष द्या.Monday, July 27, 2009

वैतरणा पुल, खोडाळा, देवबांध, सुर्यमाळ आणि दोन निसर्गवेडे

जीव कासावीस होवु लागला, शरीरात उठलेला आंतरीक दाह अधिकाधीक भडकुन उठु लागला. तप्त शरीर आणि तडफडणारे मन, धाव घेवु लागले, ओढ लागली , सह्याद्रीची, निसर्गाची, पावसाचे रुप पाहाण्याची, मनमुराद भटकण्याची.


औषध "न" लगे मजला.


चित्रपटात आपण अनेकदा एक प्रसंग पाहातो, बंद दरवाजा उघडुन पलिकडे जातो, आणि अचानक एकदम दृष्य पालटते, समोर येत ते काही निराळेच असते. अगदी तस्सेच. गाडी कसाऱा घाटात डावीकडे कसारा- जव्हार रस्तावर वळली , आणि अचानक निसर्गाच्या कुशीत प्रवेश झाला. एक अप्रतीम परिसर. निसर्गाने काहीही हातचे न राखता सारे काही उधळुन दिलेले, नुसती नयनरम्य लयलुट.


केवढे निसर्गाचे वैभव येथे पहायला मिळते.

या नदीवर धरण होवु घातलय. वेंतरणा पुलाकडचा सारा परिसर दोन तीन वर्षात पाण्याखाली नाहिसा होणार आहे


स्वागताला आला तो विहीगावचा एक भलामोठाला धबधबा. पण यात फारसे गंतुन पडायचे नव्हते. या धबधब्यापाशी दोन-चार गृप आले होते. आमचे खरे लक्ष लागले होते ते पुढे असलेल्या वेंतरणा पुलाजवळील महाभयानक अविष्काराकडे, पाण्याच्या रौद्रस्वरुपाकडे, महाभयंकर वेगात खाली बेभान होवुन झेप घेणऱ्या पाण्याच्या प्रवाहाकडे, आपल्या वेगाने बलदंड खडक कोरुन त्या भयानक घळीतुन उद्दामपणे आपल्या मस्तीत धावणाऱ्या , कल्लोळ करणाऱ्या प्रपाताकडे.


पाय काही निघवत नव्हता.पण हा सारा परिसर येवढा निसर्गाने भारावला आहे हे ध्यानी घेता रस्तावरुन पुढे चालत निघालो. जेथे दृष्टी जाईल तेथे केवळ हिरवा शालु, त्यावर तांबडी जरीबुट्टी, सोबत सतत लागणारी वेंतरणा, ओढेनाले, धबधबे कधी खोडाळ्याला पोचलो कळालेच नाही.


आता वेध लागले होते ते देवबांध चे. वेंतरणा नदिच्या किनारी येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाद्वारे लोकोपोयोगी अनेक उपक्रम चालवले जातात, एक गणपती मंदिर आहे, आणि मुख्य म्हणजे हा चार कि.मी. चा रस्ता , अप्रतीम. जातांना बस मिळाल्यामुळे बसनी गेलो पण येतांना मात्र डोंगरातुन पायवाटांनी चढत आलो, तेवढे थ्रिल.


या वाटेत मधेमधे जबरदस्त मोठाले धबधबे आहेत, पहात पहात, चवीचवीने आनंद लुटत परत खोडाळ्याला , हा रस्ता पुढे जव्हारला जातो, या रस्तानी परत कधीतरी प्रवास करायला हवा ही खुणगाठ मनाशी बाळगत परतलो.


आता जायचे होते ते सुर्यमाळला. खोडाळा-वाडा रस्तावरचे हे आणखीन एक वेडापिसा करुन सोडणारे ठिकाण. स्वागताला ढग खाली उतरले होते, आता आम्ही उंचीपण बऱ्यापैकी गाठलेली, पठार, हिरवीगार कुरणे, शितल पवन, आल्हाददायक वातावरण, काश ती पण सोबत असती.


अप्रतीम परिसर. परत परत जावुन पहाणासारखा.


पुढे वाड्याला जाण्यासाठी काय वहान मिळेल का नाही याची शाश्वती नव्हती, बऱ्याच वेळाच्या प्रतिक्षेनंतर परत माघारी खोडाळ्याला फिरणाच्या दुख:द निर्णय घेतला , अपुर्णतेच गोडी असते अशी मनाची खोटी समजुत घालत.

Saturday, July 25, 2009

मोरे राजा हो ले चल नदीयां के पार

http://www.youtube.com/watch?v=aWqjDTu0n6U

मोरे राजा हो ले चल नदीयां के पार
मोरी रानी हो तुम ही मोरी प्राण आधार

मालती माधव, सुधीर फडके यांच्या वर लिहिता लिहिता अचानक ललिता देउळकरांचे हे गाणे आठवले. सी.रामचंद्र यांचे संगीत असलेले हे एक मस्त गाणे.

"अनवट" लाटा, उस्ताद राजा मीयां, व शशी व्यास


बहुचर्चीत, भाकीत केल्याप्रमाणे मुंबईत समुद्रकिनारी भल्यामोठाल्या लाटा उसळो न उसळो, समुद्र किनाऱ्यापासुन जवळच काही अंतरावर मात्र अनेक "अनवट" लाटांच्यावर लाटा रसिकांच्या अंगावर उसळत होत्या, सारे जमलेले त्या वर्षावाखाली गच्च भिजुन जात मजा लुटत राहिले.


काल संध्याकाळी "अनवट, आग्रा घराण्याच्या दुर्मीळ चिजा " हा कार्यक्रम उस्ताद राजा मीयांनी यांनी सादर केला.


पंचम निषादचे शशी व्यास नेहमीच दर्जेदार कार्यक्रम आयोजीत करत असतात, त्या पैकी हा एक. नोम तोम नी जे काही सुरु झाले त्यात "जोग" , "बरवा', "सुर मल्हार " नी भरती येत गेली, सौख्याच्या लाटा उसळत गेल्या .


बहार आली

Friday, July 24, 2009

लाटाच लाटा चहुकडे

"काय ग शाळेत नाही गेलीस ती आज, काय काकी घरला आली म्हणुन दांडी ? "
राजाभाऊंनी आपल्या पुतणीला विचारले.
"असे काका तु येडा का खुळा ? एवढे पण तुला कळत नाही आज केवढ्या मोठ्या , ह्या भल्यामोठ्याला लाटा उसळणार आहेत मुंबई मधे, आज शाळा बंद ."


सतर्केतेचा इशारा। आज शक्यतोवर मुंबईत अत्यावश्यक काम असल्याशिवाय घराबाहेर पडुन नका. दुरचित्रवाणीवर एका वाहिनीची निवेदीका कोकलत होती. वर्तमानपत्रातहीच चर्चा.

ही अतीउत्साही लोक शहराला कोठे घेऊन जाणार आहेत इंद्रदेव जाणे।


जणु ह्याच्या आधी पावसाळ्यात कधी समुद्रकिनारी मोठ्या लाटा उसळतच नव्हत्या, मुंबईमधे पावसाळ्यात कधी रस्तावर पाणी तुंबतच नव्हते. पावसाळ्यात मरिन ड्राईव्ह वर या लाटांच्या वर्षावात दरवर्षी पावसाळ्यात भिजायला नेहमीच लोक येत असतात, यात नवीन ते काय ?

यांनी मुंबईला घाबरट करुन टाकायला सुरवात केली आहे.

Wednesday, July 22, 2009

युगांत


एक युगांत झाला । गंगूबाई हानगल गेल्या।

Tuesday, July 21, 2009

चंगळ आहे.

चंगळ आहे.


पावसाळ्यात कोवळे लुसलुसीत गवत खाणाऱ्यांची की हे खावुन धष्टपुष्ट झाल्यानंतर आखाडीला, आषाढ अमावस्येला त्यांना कापुन खाणाऱ्यांची ?

Monday, July 20, 2009

मलाका स्पाईस - पुन्हा एकदा

राजाभाऊंची बायको आणि मुलगा, दोघेही बदमाश, आतुन एकामेकाला सामील. एकानी मारल्यासारखे करायचे दुसऱ्याने रडायचे.

शनिवार उजाडला, दुपार झाली।

राजाभाऊंचा मुलगा त्यांना म्हणाल, "बाबा, तुज्याकडुन हे अपेक्षीत नव्ह्ते, नेहमी तु असाच करतोस, आधी हो म्हणतोस मग नंतर मागे हटतोस. "

राजाभाऊ ढीम्म.

संध्याकाळ झाली. नाटकच दुसरा अंक सुरु झाला. "आई, जेवायला काय करतेस ? काहीतरी चांगले कर ना"

याचा शेवट कोरेगाव पार्क मधे असणाऱ्या मलाका स्पाईस मधे झाला.

इंडोनेशीया, मलेशिया , जपान, व्हियतनामी , थायलंड, ब्रम्हदेश, तैवान, चायना आदी देशांचे पदार्थ येथे फार चविष्ट मिळतात, डेलीकसी.

प्रेमीयुगलांसाठी तर ही जागा अतिशय रोमॉटिक आहे. बाहेर बगीच्यात Candle Light Dinner आखोंमे आखें डालके.

D-for Dumpling Shao Mai (Taiwan )
Baby Potato Satay
Vietnam Topaz Curry
Two Mustard Noodles
Thai Chilli Rice Khao Phad (Thailand )

किस्मत मे खुशीका नाम नही दो दिन भी हमे आराम नही

ज्याला सज्जाद डसलाय , ज्याच्या दिलात सज्जाद्च्या ठेक्याचे जहर भिनले आहे त्याला आराम मिळणे कठीण आहे.


Kitaabik यांनी You Tube वर सैय्याची गाणी टाकली आणि राजाभाऊंची नींद हराम केली


http://www.youtube.com/watch?v=gDpyyho3T1A&feature=channel

Friday, July 17, 2009

आंखों मे नींद थी मगर सोये नही रात भर

http://www.youtube.com/watch?v=-NpbExMTngk&feature=related

जो कोणी मधुबालाला येवढे दुखी करतो त्याला काय म्हणावे ?

काली काली रात रे दिल बडा सताये

http://www.youtube.com/watch?v=aJX9xTOJIjI&feature=related

http://www.youtube.com/watch?v=WwBCv7_4V98&NR=1

काली काली रात रे दिल बडा सताये तेरी याद आये
झुटोंसे प्यार किया हाय क्या किया सारे जहांका दुख ले लिया
अब रो रे के प्राण जाये

कसं नशीब असते. काही वर्षापुर्वी या भन्नाट सज्जदची "सैय्या" चित्रपटातील गाणी अतिशय दुर्मीळ होती. ज्या कोणा संग्रहकांकडे ती होती ते कोणाच्याही ताकास तुर लावुन देत नव्हते, आपल्या कडे ही गाणी आहेत याची बाहेर जरा सुद्धा चाहुल लागुन देत नव्हते.

मग अचानक एकदा उदय द्रविडकडुन कळले.HMV नी या चित्रपटातील गाण्यांची ध्वनीफित तीनचार महिन्यापुर्वी काढली आहे. दुकानत पोचेपर्यंत जीव थाऱ्यावर नव्हते. शोधल्या नंतर ती मिळाली. गाणी ऐकल्यानंतर दर्दचा खरा अर्थ कळला. सज्जादनी लता गायला लावलय.

आणि " kitaabik " यांनी आता तर यांनी भांडार उघडुन दिलय.

जगातला सर्वश्रेष्ठ मेंडोलिनवादक सज्जाद हुसेन

http://www.youtube.com/watch?v=qdYD5JdMEfE

किस्मत का दरवाजा समझो खुल गया. जगातला सर्वश्रेष्ठ मेंडोलिनवादक सज्जाद हुसेनचे मेंडोलिनवादन ऐकायचे राहुन गेले होते. आज ते अचानक सापडुन गेले

Thursday, July 16, 2009

बांध प्रीती फुलडोर मन लेके चितचोर -सुधीर फडकें राग जयजयवंती

यु ट्युब ची मुसाफिरी करताकरता अचानक हरवले होते ते गवसले. कँसेट मधे जरासे ते ख़राब झाले होते।
Sj6288 ( http://www।youtube।com/user/sj6288 ) यांच्या परवानगींने मी येथे हे गाणे दिले आहे. त्यांचे धन्यवाद.बांध प्रीती फुलडोर मन लेके चितचोर ।
दूर जाना ना दूर जाना ना दूर जाना ना ॥
मनके किवार खोल मीत मेरे अनमोल ।
भूल जाना ना भूल जाना ना भूल जाना ना ।
कैसे सहूँ बिछोह मन में रमा है मोह
रूठ जाना ना रूठ जाना ना रूठ जाना ना रूठ जाना ना

मालतीमाधव चित्रपटातील लता मंगेशकरनी गायलेले व सुधीर फडकेंनी संगीत दिलेले जयजयवंती रागातील हे अतिशय सुरेल गाणे मध्यंतरी परत अचानक आठवले. सुधीर फडकेंनी काही मोजक्या हिंदी चित्रपटांना अप्रतिम संगीत दिले आहे. मालती माधव हा त्या पैकी एक. माझ्या आवडीचे हे एक गाणे.

sangeetagod ह्याच्या खालील लेखात राग जयजयवंती चा उल्लेख वाचुन मागे मी या गाण्याबद्दल लिहिले होते
http://kasakaay.blogspot.com/2007/04/blog-post.html#links

परमेश्वरानी धरतीवर दर्द (दर्द वरुन लताचे एक दुसरे गाणे आठवले - दर्द मिला हे तेरे प्यार की निशानी ओ देने वाले तेरी मेहरबानी हाय ) प्रथम निर्माण केला तो भोगण्यासाठी माझ्या सारख्यांना पाठवले, नंतर दया येवुन दर्द सुसह्य करण्यासाठी लता, तलत सारखे आवाज निर्माण केले. त्याचा सोबत हुस्नलाल-भगतराम, अनिल बिस्वास, श्याम सुंदर, मदन मोहन, रवी, विनोद, सज्जाद हुसेन, सी. रामचंद्र, गुलाम हैदर, वसंत देसाई, शंकर-जयकिसन आदी संगीतकारांची कुमक दिली

ही गाणी राजाभाऊंपर्यंत पोचावीत या साठी प्रकाश कद्रेकर सारखे दोस्त दिले. डॉ.प्रकाश जोशी, उदय द्रविड, नारायण मुलानींसारख्यांची भेट घालुन दिली. प्रकाश कद्रेकरनी त्या काळात ही दुर्मीळ असलेली गाणे भल्या मोठ्या मेहनतीने, मोठाले दाम मोजुन मिळवावीत व राजाभाऊंनी त्यावर डल्ला मारावा।

Monday, July 13, 2009

baandh preet phool dore
baandh priti phuul dor,
man leke chitchor
duur jaana naa, duur jaana na

man ki kivaad khol,
mita mere anamol
bhuul jaana naa,
bhuul jaana na

kaise sahuun vichhohan,
man mein rama hai mohan
ruuth jaana naa, ruuth jaana na

जपानच्या नृत्यांगना काओरी नाका

Sunday, July 12, 2009

पुन्हा एकदा "आशा"


शनिवार आला. राजाभाऊ बायकोला म्हणाले ’चल आज तुला आराम , आज स्वयपाकघरात म्हणुन पाय ठेवायचा नाही " .

मस्त पावसाळी धुंदंफुंद नशीला माहोल, चमचमीत, मसालेदार जेवण जेवणाचा मोह काय आवरेना. काय मनी धरुन निघाले होते. मारे मनात मांडे खात होते. येथे जावु तेथे खाऊ.
पण.

पण जी बायको नवऱ्याच्या बेतात मोडता घालणार नाही (नेहमीच) , ती बायको कसली.

"अजीबात नको. आषाढ सुरु आहे. या दिवसात साधे, सात्वीक जेवावे."

मग ती आणि ते आपटॆ रस्तावरील "आशा डायनींग हॉल " मधे जेवायला गेले.
काचऱ्याची बटाटा भाजी ,वांग्यांचे भरीत , पडवळाची भाजी ( देवा तुच माझा रक्षणकर्ता , पडवळाची भाजी खाण्याचे मला धैर्य दे ), डाळभात, आणि रसम. अमर्यादीत जेवण. केवळ ५५ रुपयात. "

Saturday, July 11, 2009

टाटा स्कायची जादु. पिक्चर गायब


जणु पावसाची वर्दी देण्याचे काम टाटा स्काय करते, पाऊस सुरु झाला की पिक्चर गुल.

Wednesday, July 08, 2009

स्व.राजीव गांधी मुंबईकर की !

राजाभाऊ आणि स्व.राजीव गांधी , दोघांचा जन्म मुंबई मधला ना, एकाच सुतीकागृहातला. डॉ. पुरंदरेंच्या कडे.

मग, स्व.राजीव गांधी मुंबईकर की !

वाह उस्ताद वाह

आपल्या आगमनाची वर्दी देण्यासाठी त्याच्याकडे काहीच साधन उरले नव्हते, त्याची ती प्रिय सखी, ती सौदामीनी, ती तर त्याला सोडुन केव्हाच गेली होती, आतमधे , तबल्यावर कडकडत राहण्यासाठी आणि तो आषाढातला मेघ बाहेर तिच्या विना, तिच्या आठवणीत तुफान बरसत राहीला.

सभागृहाच्या आत सारे तालाचा वर्षावात , जलधारात गच्च ओलेचिंब होत होते, मग बाहेर कोसळत असलेल्या मुसळधार पावसाची काय तमा.

काल झाकिर हुसैन च्या शिष्यवर्गांनी गुरुपोर्णिमा साजरी केली.

शेवटी मन प्रफुल्लित केले ते उस्ताद झाकीर हुसैन, फाझल कुरेशी आणि योगेश साम्सी यांच्या तबलावादनानी.

काल किती तरी काळानंतर राजाभाऊंचे मन प्रसन्न झाले, शांत झोप लागली.

सर्वांना असाच गुरु लाभो.

Sunday, July 05, 2009

साहेब मोठे हुश्शार हो.

साहेब मोठे हुश्शार हो.

एका दगडात दोन पक्षी मारले की.


वांन्द्रे- वरळी सी लिंकला राजीव गांधींचे नाव सुचवले , कॉंग्रेस वाले खुष, नामांतरकारणॆ, सध्या हाती काहीच मुद्दा नसलेल्यांना काहीतरी मुद्दा मिळाला म्हणुन ते ही खुष.
चला या निम्मीत्ते तरी का होईना, वीर सावरकरांची आठवण तरी आली.

सराफा तेरी याद मे पेट हुवा बैचेन रे

याद आ रही है इंन्दोर तेरी याद आ रही है.
५६ व सराफ्याची फार याद येवुन राहिली आहे. किती तरी वर्षे झाली इंन्दोर वारी झालेली नाही.
भुट्टे का कीसवाले भैय्या वाट बघत असतील.


Saturday, July 04, 2009

एक चेहरे पे कई चेहरे लगा लेते है कोग

जेव्हा कलावंत येतात , गातात आणि निराशा करतात

जावळ


मेनलॅंड चायना - पुणॆ

Corn and Potato Tsing Hoi style
Lotus leaf wrapped Rie with Corn Kernal & Almonds.


Wontons


Wontos and crispy veg. in Chilli Plum Sauce
राजाभाऊंच्या बायकोने पुण्याला ज्या संकुलात ते रहातात तेथे एक स्नॅक्स कांउंटर उघडला आहे. बिच्चारी काल दिवसभर साबुदाणॆ वडे, उपवासाचे थालीपिठे, तळुन तळुन, बटाट्याची काळीमीरी घालुन केलेली भाजी, रताळ्याचा किस करुन दमली असेल, आता तिला परत रात्री घरी जेवण करावे लागु नये या शुद्ध हेतुने राजाभाऊ निघाले बाहेर.
त्यात परत या ब्लॉगर मंडळींनी फार घोटाळा करुन ठेवला आहे, श्री.शंतनु घोषनी सांगावे http://www.shantanughosh.com/ व राजाभाऊंनी ऐकावे.
पण एक गोष्ट खरी , सर्वोत्तम चायनीस जेवायचे असेल तर मेनलॅंड चायना ला पर्याय नाही.
हा कमळाच्या पानात शिजवलेला फ्राईड राईस एवढा आवडला आहे , delicacy नी एवढे खुष केले आहे की दर खेपेस आता दुसरे काही तरी मागवु असे ठरवले असतांना देखील तोच मागवला जातो.

मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय
या महेंगाई के जमानेने मे प्रत्येक गोष्टीचे दर, भाव शेकडो पटीने वाढत असता अजुन पर्यंत वाढली नाही ती मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाची वर्गणी.
महिना तीस रुपयात वाचकांना जे वाचायला मिळाते त्यास तोड नाही.

Friday, July 03, 2009

गुरु बसो भिक्षुला सांगतात,
"तुझा हातात दंड असेल तर मी तुला आणखीन दंड देईन,.पण नसेल तर मात्र हिसकावुन घेईन"

काहे मेहा बरसत नाही
विठ्ठल विठल, आम्ही पण निघालोय बर का वारीलाजेव्हा कलावंत न आल्यामुळे निराशा होते आणि आयोजकांच्या भुमिकेचाही राग येत नाही

डॉ. शशिकांत तांबेचे घर. मु,पो. इंन्दोर. श्री.राहुल देशपांडे यांचे गाणे.

राहुल देशपांडे इंन्दोर मधे रविंद्र सभागृहात दिवाळी, पाडवा पहाट कार्यक्रम सादर करण्यासाठी आलेले.
एक दोन दिवस आधी डॉँ. शशिकांत तांबेंच्या घरी संध्याकाळी राहुल देशपांडेच्या गाण्याची एक घरगुती महफिल.
पण राहुल आले नाहीत, संयोजकांनी विरोध दर्शवल्या मुळे. मुख्य कार्यक्रमाच्या आधी दुसरे कार्यक्रम करु नयेत हे भुमीका उचीत.

पण चला निदान डॉ. शशिकांत तांबे यांचे गाणे ऐकायला मिळाले

रामदासी मल्हार

आणि कलावंत जेव्हा निराशा करतात व आयोजक ?

गरवारे महाविद्यालय। पुणे
सभागृह तुडुंब, खच्चुन भरलेले, जणु मुंबईतील लोकलच्या डब्यात सकाळची वेळ.
मुंगीला सुद्ध्या आत जायला जागा नसावी.
बाहेर ही वऱांड्यांत रसीक उभे, उभ्याने तरी का होईना, स्वर्गीय गाणे ऐकण्यासाठी.
सर्वांना प्रतिक्षा होती केव्हा एकदा मुकुल शिवपुत्र येतात आणि आपली तृप्ती करतात.

बाहेर संयोजक फार व्यस्त होते आणखीन आणखीन तिकीटे विकण्यात.
मुकुल शिवपुत्र आलेले नाहीत, येणार नाहीत हे ठावुक असतांना देखील आणि त्यांच्या जागी आपण विजय सरदेशमुखांना गायला लावणार आहोत हे सर्वांपासुन लपवुन.

Thursday, July 02, 2009

जेव्हा कलावंत निराशा करतात त्यांचा गोष्ट.

"मेघमल्हार." , नेहरु सेंटर आयोजीत फार प्रतिष्ठीत, दर्जेदार संगीत महोत्सव, गेली १९ वर्षे नेहरु सेंटर तो सातत्याने सादर करत आले आहे.

महफील संपल्यानंतर मीता पंडीत परत गौड मल्हार ची विलंबीत बंदीष गायला बसल्या तेव्हाच पुढचे कलाकार , जयतिर्थ मेवुडी आलेले नसावेत हे ध्यानी आले. ट्रफिक मधे अडकले असतील येतील लवकरच वाटु लागले.
पण त्यांचा पत्ता नाही.
नेहरु सेंटरच्या डौ. काझींनी मग त्याचे खरे कारण सर्वांना सांगीतले.
जरी त्यांना नेहरु सेंटर नी आमंत्रित केले होते, नेहरु सेंटर नी त्यांचा मुंबईत कार्यक्रम ठेवला होता, तरी देखील नेहरु सेंटरला सरळने येता ते त्या आधी मालाडला दुसऱ्यांकडे ध्वनीमृद्रण करण्यासाठी गेले. आणि मग वाहतुकीत अडकले.
राजाभाऊंसारखे काही जण खोट्या आशेने वाट बघत थांबले बाकीचे निघुन गेले.
पण यातुन एक चांगले गोष्ट हाती लागली. त्यांच्या ऐवजी काही राजस्थानी लोककलाकारांनी मल्हार वर एक कार्यक्रम सादर केला तो ऐकायला मिळाला, जो ऐरवी ऐकणे कठीण होते.

सखियां झुलन चली रे फुलबागीयांन | घीर आई कारी कारी बदरीया ||

नेहरु सेंटर आयोजीत "मेघ मल्हार " ला जातांना छत्री न घेता जाणे व वाटेत पावसानी भिजवले तर दोष पावसाचा नाही, संयोजकांचा नाही, कलाकारांचा तर नाहीच नाही आणि "मल्हार " रागांचा तर अजीबात नाही. असलाच तर तो राजाभाऊंचाच आहे.

एखादी गोष्ट तुम्हाला मिळाली नसेल , ती होवुन गेलेली असेल. तुम्ही ती घडत असतांना त्या स्थळी उशीरा पोहोचता आणि तुमच्या हाती फारसे काही लागलेले नसते.

पण
पण तरी देखील ती अकस्मात तुमच्या वाट्याला येते. जे हुकले आहे ते मिळते.
हे गौंड्बंगाल काय आहे ?
मुंबईच्या संथगती वाहणाऱ्या वाहतुकीने चर्चगेट ते वरळी जवळजवळ दिड - पावणे दोन तास घेतले. मीता पंडीत गात असलेला सुरदासी मल्हार संपत आला होता. हाती लागली ती कजरी आणि टप्पा.

कार्यक्रम संपला. आता प्रतिक्षा होती ज्यांचे गाणे ऐकण्यासाठी हा जो हट्टाहास केला त्या जयतीर्थ मेवुडींच्या गाण्याची.
आणि अचानक मीता पंडितांचे गाणे पहिल्या पासुन सुरु झाले. गौड मल्हार ची विलंबीत बंदीश.
का पण का ?