Wednesday, March 31, 2010

ना.धो.महानोरांवर "विज" संकंट का बरं ओढवले असेल ?

या विजमंडळाच्या लोकांचा नक्कीच साहित्यसंमेलनामधे ना.घो.महानोरांचे लांबलेले , लांबलांब लांबलेले, भाषण मधेच बंद करण्यासाठी तर मंडपातली बत्ती गुल करण्याचा इरादा नव्हता ना ? मग ते शक्य न झाल्यामुळे त्याचे उट्टॆ काढायला आपला मोर्चा त्यांनी पळासखेड्याला वळवला असावा का ? 

का भाषण ऐक, ऐक, ऐकुन महाबोअर झालेल्यांनी आपली गंमत हो करत  हा कट तर रचला नसावा ना ?

आपली उगीचच वाटणारी शंका हो.

विपश्यना पॅगोडा - गोराई

महालक्ष्मी मंदिर - लोकमान्य सेवासंघसमोर, विलेपार्ले


पांगारा

कधी तरी अचानक काहीसे सापडुन जाते .

सुंदर मुंबई विद्रुप मुंबई

एखाद्या वास्तुचे स्थापत्यकलाशैलीचे निरिक्षण करायला जावे, त्या सुंदर वास्तुच्या पुढे हे सारे

चिंतामणी पाश्वनाथ जीनालय - विलेपार्ले

श्री पारलेश्वर मंदिर व श्री गणपती मंदिर - विलेपार्ले.

श्री भवानी शंकर मंदिर


आपल्या रहात्या वाड्याच्या आवारात १८०६ साली मुंबईचे शिल्पकार नाना शंकरशेट नी हे शंकराचे मंदिर बांधले. प्रवेशद्वाराजवळील व मागील बाजुस असलेले कैलाशपती आता बहरु लागलेले आहेत.त्याच आवारातील राममंदिर


हाजी अली दर्गा

फुल फुल फुलायचेताडदेवला A.C. Mkt  समोरच्या बाजुला हा वृक्ष काय फुलुन राहिलाय.
आपण Cardiologist कडे निघालेलो आहोत याचे देखिल भान विसरायला लावावे.  

मेरे छोटेसे दिलपे ना करना सितम, मुझे देना न गम , मेरे बाके सनम तुम्हे मेरी कसम

ताण , सततचा ताण, मानसीक ताणतणाव, पोखरणारी चिंता, काळजी आणि नैराश्य. मग त्या मुळे खाण्यावरील नियंत्रण सुटणे, वजन वाढवुन घेणॆ, वजन वाढल्याने आत्मविश्वास गायब होणे आणि आत्मविश्वासा अभावी येणारे नैराश्य.

आपणच खांबाला धरुन ठेवायचे व खांबाने आपल्यला जखडुन ठेवले करुन रडायचे.

राजभाऊ, आज पहिली सावधगिरीची घंटा घणघणत वाजली आहे.

तेव्हा ब्लॉगवर "माझा सात्क्षाकारी हृदयरोग " लिहीण्याची इच्छा बाळगु नका.

Monday, March 29, 2010

गिरीगावची लिलावती देवी

ग्रामदेवी मंदिर - गावदेवी. व त्याच्या आवारातील हे सुबक दत्त व शिवमंदिर. सोमवंशी क्षत्रिय ज्ञाती समाजाचे.

पवनपुत्र महाबली हनुमान की जय !


रामांजनेय देवस्थान, सुभाष रोड, विलेपार्ले येथील देवळातील ही एक देखणी मुर्ती.

याचे नाव काय ?

का पण का ?

काही व्यक्‍ते हे व्यासपीठाला रणांगण का समजतात आणि स्वतःला योध्दा ?

सदानकदा लढाईच्या आवेशात ते आपले म्हणणे ठोकत असतात.

कैसे धरु "धीर "

व्यासपिठावर या जागी उभे रहाण्याचा हक्क माझा, निवेदन करण्याचा अधिकार माझा, हे अचानक माननीय मुख्यमंत्र्यांबरोबर मिरवीत रंगमंचावर पदार्पण केलेल्या "त्यांच्या" ध्यानी आले आणि त्यांचा "धीर " सुटला.

ही राजकारणी लोक आपली खुर्ची सांभाळण्यात माहीर, पण येथे झाले उलटेच. अधिकृत सुत्रसंचालक खुर्चीत विसावलेले हे पाहुन चक्क गनीमी कावा करत "त्यांनी" माइक वरुन सुत्रसंचालन करावयाच एकदम सुरवात केली.

पण ज्या गावच्या बोरी त्याच गावच्या बाभळी.

त्यांचे अतिक्रमण क्षणिक ठरले.

हे साहित्यसंमेलन की खाद्यसंमेलन ?


खाण्यापिण्याची उत्तम व्यवस्था या साहित्य संमेलनात ठेवली गेली होती.
मजा आली. 

साहित्य संमेलन - २०१० - पुणॆ

जा मै तोसे नाही बोलु !

दोन ध्रुवावर दोघे आपण.

साहित्य संमेलन आणि खुर्ची.

या साहित्य संमेलनामुळे आधीच डळ्मळीत होवु घातलेली आपली खुर्ची अधिक धोक्यात येवु नये करुन माननीय मुख्यमंत्री नियोजीत कार्यक्रमाच्या दिवसाऐवजी आदल्याच दिवशी अकस्मात साहित्य संमेलन प्रगटले.


आपली खुर्ची "सेफ" ठेवण्यासाठी काय काय म्हणुन करायला लागते.  

अशी उंचावर नेवुन ती खुर्ची ठेवावी, वर चढण्यासाठी शिडी ही नसावी.


Thursday, March 25, 2010

खिचडी सम्राट - श्री, बृंदावन भवन - शुध्द शाकाहारी भोजन

आज राजाभाऊंना काहीसे हटके खाण्याची इच्छा झाली, डालबाटी, चुरमा लाडु, गरमागरम डाल ढोकली, आणि वर खिचडी खाण्याची हुक्की आली, त्यांच्या  मनात, त्यांच्या डोळयासमोर एकमेव उपहारगृह आले,  ते म्हणजे भुलेश्वर येथील "खिचडी सम्राट " मग ते तेथे जावुन धडकले.  खिचडी सम्राट , या ठिकाणी मिळणाऱ्या शुध्द शाकाहारी , कांदा लसुण व्यर्जीत ( आता कदाचीत कांदालसुण जेवणात टाकत असावेत, बरोबर ठावुक नाही ) , जवळजवळ दहा प्रकारच्या मुगाच्या डाळीच्या खिचडी मुळॆ हे नाव पडले.  मसाला खिचडी, हरीयाली खिचडी, ड्राय फ्रुट खिचडी , मकाई खिचडी काय मागवाल ते  खरे.तर सुरवात केली ती डालबाटीनी.

पण पहिल्याच डिश मधे राजाभाऊ आटपले.  त्यांना वाटले होते , येतील लहानश्या बाट्या. त्या काय आपण सहजच खावु. पण त्या भल्यामोठाल्या तुपाने बरबटलेल्या, तुपात बुडलेल्या बाट्या,  बाट्या कुस्करुन त्यावर रिती केलेली डाळ, हे सारे काही त्यांच्याचाने संपवेना, ( कसे काय संपेल, संध्याकाळी खाल्लेले छोले व कुलचे, त्यांचे काय  )  

पुर्वी पाच सहा वेळा ते येथे जेवले आहेत. कधी मकाई रोटी बरोबर शेवटमाटार, तर कधी आलु मटार. पण त्यांचे पोट जास्त रमले आहे ते डालढोकळीतच.

आज त्यांच्या बाजुला बसलेल्या गृहस्थांनी " पापड मेथीका साग " मागवला होता. त्यांच्या एकदा मनात आले की त्यांच्याकडे हा पदार्थ चाखायला मागायचा.

परत पुन्हा केव्हातरी.