एक अतिशय विलक्षण देखणॆ असे हे मंदिर सन १८७५ साली शेठ सुंदरदास यांनी काळबादेवी येथील विठ्ठल वाडीच्या नाक्यावर बांधले.
आता ते बांधले गेले ते कोणा साठी तर प्रत्यक्ष द्वारकाधीशासाठी, तेव्हा त्याच्या लौकीकास साजसे असेच त्याचे राजसी रुप असावे. प्रवेशद्वारावरची सुरेख गणेशाची प्रतिमाच आपल्याला मोहुन टाकते. मंदिराच्या दोन्ही दर्शनी भागवर जे कलाकुसर केले आहे, ज्या प्रतिमा आहेत त्याला तोड नाही.
जर बाहेरुन हे येवढे अप्रतिम असेल तर आतुन कसे असेल ? सभागृहाच्या वर या गायन वादन करत असलेल्या देवता त्या सौदर्यांत भर घालतात. भव्य प्रशस्त सभागृह. वर तिन्ही बाजुस असलेले सज्जे. त्यावरील कलाकुसर.
वास्तुकला असावी तर अशी.
No comments:
Post a Comment