Monday, April 05, 2010

काफे मैसूर , काकडी डोसा आणि टॉमेटो रसम

राजकारणात पक्षप्रती असलेली आपली निष्ठा हे राजकारणी लोक अगदी सहजच बदलतात, मग या प्रंतप्रधानाने तरी  या निष्ठापालटु खेळात मागे रहावे ?    http://foodateachglance.blogspot.com/2010/03/blog-post_27.html

आतापर्यंत माटुंग्याला गेल्यावर राजाभाऊंची निष्टा केवळ "रामाश्रय " च्या प्रती  वाहिलेली होती.   
पण हल्ली राजाभाऊंचे मन त्या रामाश्रयात  फारसे रमत नव्हते.  तेव्हा त्यांनी मग आपली पार्टी बदलायचे ठरवले. तसा त्यांचा माटुग्याचा खाद्यप्रवास कॅफे मद्रास पासुन सुरु झालेला  मग तसे अधुन मधुन इडली हाऊस, मणी ( रुईया जवळाचा तसेच शंकरा मठाजवळील ), मधे ते भेट देत असत. पंण निष्ठा एकाच ठिकाणी.    

आज ते काफे मैसुर मधे गेले. खरं म्हणजे त्यांची आज नीर डोसा किंवा रवा डोसा खाण्याची इच्छा होती.  आयत्या वेळी बेत बदलला आणि  मग राजाभाऊंनी एक प्रयोग करायचे ठरवले. दोन परस्परविरोधी चवीचे पदार्थ मागवायचे.

गरमागरम तिखट रसम, टॉमेटो रसम आणि गोड काकडी डोसा.  

हे सारे राजाभाऊंसाठी नव्हे .

हे एक दाक्षिणात्य खाद्यपदार्थ मिळणाचे दर्जेदार उपहारगृह आहे

7 comments:

भानस said...

निषेध... निषेध...
राजाभाऊ, फोटू पाहून वाटले पटकन एक तुकडा तोडावा आणि त्या लुसलुशीत खोब~याच्या चटणीला लावून खावा. वर तिखट रस्सम... आहाहाSSS...

Ap____M said...

Once we were at air-conditioned section of Sundars and ordered just coffee. We were asked to go to non-ac section, if were not going to order any other dish.

On the other hand, in the ac section of Cafe Mysore, when we ordered just coffee, we were given a small plate of potato chips free. "Aatithya" mhantaat te he .. "nusti coffee nakaa pioo, kaahi tari khaa"!

BTW, kadhi tari Madras Cafe suddha try karaa.

aaditey.oak said...

पंतप्रधान राजाभाऊंचा नि.... षे.... ध.... !! :-)

HAREKRISHNAJI said...

भानस,

क्या बात है. हा गोडुस काकडी डोसा मस्त होता. बहुदा पहिल्यांदाच खाल्ला असावा. मी मात्र त्या चटणीला हात लावला नाही. नुसताच खावास वाटला, त्याची चव भरुन घेण्यासाठी.


AP---M,

मी पुर्वी बऱ्याव वेळा किंबहुना फक्त कॅफे मद्रासमधेच जात असे, पण अलीकडे जाणे बंद केले, येथे खुप खुप गुजराती लोक खायला येतात व त्यामुळे त्याची मुळाची चव बिघडली आहे असे मला वाटते.सुंदर्स, सरस्वती मधे एकदाच गेलो होतो. दुर्गा परमेश्वरीत व मुत्तुस्वामी मधे नाही गेलेलो. एकदा मुत्तुस्वामी मधे इडीअप्पम खायला जायचे आहे.

आदित्य,

नुसता निषेध व्यक्त करण्यापेक्षा काहीतरी कृती करा. येथे खायला माझ्याबरोबर चला.

HAREKRISHNAJI said...

Ap____M,

आणि हो, इडली हाऊस पण मला आवडते.

Anuja said...

राजाभाऊ, आदितेय ओक म्हणजे माझा लेक. मगाशी कमेंट टाकताना चुकून त्याच्या अकाऊंटमधून टाकली गेली :-)

रोहन... said...

वा पंत .. आम्हास कधी घेउन जाणार राज्यात फेरफटका मारावायास??? :)