Monday, April 12, 2010

कॅटल क्लास

मा. शशी थरुर यांनी सर्वसामान्य माणसांबद्दल बोलतांना "कॅटल क्लास" हा शब्दप्रयोग केला होता तेव्हा ते बोलणे किती झोंबले होते, नाकाला नुसत्या मिर्च्या लागल्या होत्या.

पण ते काय चुकीचे बोलले होते ?


आजाद हिंद एक्सप्रेस. पुणे ते हावडा.

दिड-दोन दिवसाचा प्रवास , भर उन्हाळ्याचा प्रवास,  आरक्षण नसलेल्या डब्यातुन प्रवास.
त्या प्राध्यापकांनी बाटलीत आधी दगड भरले, मग गोटे, मग वाळु, शेवटी आणखी काही
तरी जागा उरली होती. हे ही असेच डब्यात माणसांचे  भरभर भरणे, अगदी संडासात देखिल माणसे उभी रहात, बसत प्रवास करतात, जिथे पाय ठेवायला जाग मिळेल तिथे, बुड टेकवायला जागा मिळेल तिथे, ज्या अवस्थेत गाडीत शिरुन जागा मिळावली अगदी त्याच अवस्थेत शेवट पर्यंत प्रवास, न हलता, न उठता , आपल्या नाकाला खाज आली तर आपला हात काय तिथ पर्यंत पोचायचा नाही, खाजवायला दुसऱ्याला सांगायला लागण्याची पाळी.

कसे हे लोक अश्या अवस्थेत, स्थितीत प्रवास करत असतील  या मरणाप्राय उकाड्यात, गरमीत, भाजुन टाकणाऱ्या या लोखंडी पिंजऱ्यात ?

( राजाभाऊंनी एकदा दिल्ली पर्यंत हा असा प्रवास केला आहे )  

3 comments:

शिरीष said...

गर्दीच्या वेळी मुंबईच्या लोकलचा फर्स्ट क्लास ही बॅटल क्लासच असतो...

HAREKRISHNAJI said...

पण तो प्रवास तास-दोन तासात संपतो. ही परिस्थिती खुप वाईट असते. मी अनुभव घेतला आहे याचा

आनंद पत्रे said...

लोकलचा प्रवास तासा-दोन तासाचा असला तरी शारिरीक-मानसिकरित्या खुप थकवतो... कोंबड्यांच्या खुराड्याप्रमाणे भासतो