Sunday, May 31, 2009

करून करून भागले आणि शबे गम बुरी बला है आणि गीत गोवींदम





संध्याकाळ झाली व्यसनाधीन राजाभाऊंचे पाय आपसुक त्या ठिकाणी वळले । क्या करू कंट्रोल नही होता ।

कल के कलाकार संगीत संमेलन संपल्या वरती पुढेचे दोन दिवस भजन संमेलन व् शबे- गझल चे होते। म्हटले चला आता भजन देखील ऐकुया तेवढेच आयुष्यात ( हा पेटंट शब्द , त्यांच्या बायकोच्या मेट ) राहिले होते।


शबे-गझल गाजवले ते प्रती तलत असणारे श्री हजारे यांनी गायलेल्या चार गझालांनी व गोहाटी वरुन ख़ास आलेल्या तरुण प्रतिभाशाली प्रार्थना चौधरी हिनी , । प्रार्थनानी तर आदला दिवसही गाजवाल्याचे कळले, तीने खुप चांगली भजने देखील म्हंटली म्हणे ।


दूसरा एक अप्रतीम कार्यक्रम पहायला मिळाला।


गीत गोवींदम , अ सेलेब्रेशन ऑफ़ अष्टपदी । देबी बासु, दक्षा माशुवाला आणि आंनंदी जोशी या गुरूंनी एक देखणा प्रयोग सादर केला । ऐसा अनुभव परत मिळणे नाही

Thursday, May 28, 2009

उगवत्या सुर्याच्या देशातुन कोणीतरी लुभावणारे



काल "कल के कलाकार संगीत संमेलन" आखिर संपले तर । आता तरी राजाभाऊ रेंगाळत पडलेली कामे मार्गी लावतील या आशेने काही जणांनी निस्वास टाकला असेल ।
कालचा दिवस गाजवला जपानच्या नृत्यांगना काओरी नाका यांनी अप्रतीम ओडीसी नृत्य सादर करुन।

Tuesday, May 26, 2009

पायल उम्ब्राणी आणि वरदा फडके

काल एक अप्रतीम कथ्थक नृत्य पाहिले, पुण्याच्या पायल उम्ब्राणी आणि वरदा फडके यांचे। पुण्याचे कलावंत हे संपुर्ण विश्वात उत्तम , सर्वोत्तम , सर्वश्रेष्ठ आहेत हे राजाभाऊंचे प्रामाणीक मत , मग जेव्हा त्यांचा कार्यक्रम असतो तेव्हा त्यांच्या आनंदाला उधाण येते।
स्वःता गुरुवर्य श्रीमती मनीषा साठेजी आपल्या शिष्यांबरोबर उपस्थीत होत्या ।


कल के कलाकार संगीत संमेलन


जर तुम्ही त्यांना विरोध करू शकत नसाल तर त्यांना सामील होणे चांगले हे आता राजाभाऊंच्या बायकोने ओळखले व ती पण त्यांच्या बरोबर कल के कलाकार संगीत संमेलन ला येवु लागली ।

Monday, May 25, 2009

जेव्हा लक्षाप्रमाणेच त्या कड़े पोचण्याचा प्रवास मस्त असतो तेव्हा .









दिवेआगाराला जातांना राजाभाऊ सरळ वाट कधीच धरत नाहीत।


मुंबई वरुन रेवस किंवा मांडव्याला लॉन्चनी जायचे , रमतगमत, मग कधी आवास , सासवाने बघत अलीबाग - आक्सी , नागाव करत हळुवार पणे चौल, रेवदंडाच्या नयनरम्य नारळीफोफळीच्या बागांचा आस्वाद घेत , रेवदंडा - काशीद -मुरुडच्या , एका बाजुला समुद्र ठेवत वळणावळणानी सरकत जाणारया रस्ताच्या मोहात पडत , बेभान होत , मुरुड ते दिघी लॉन्चनी प्रवास करत व एकदाचे का बोर्लीला पोचले की सुटकेचा निश्वास टाकत दरमजल करत दिवेआगाराला पोचणे हा त्यांच्या स्वभाव झाला आहे।


त्यांच्या बरोबर त्यांच्या बायको-मुलाची फरफट आणि परवाला तर त्यांच्या भाच्याची देखील, आपल्या मामाचा आटा सटक आहे हे जाणुन असून देखील त्याचा हा विक्क्षिप्तपणा नव्याने जाणुन घेत।


पण दिवेआगाराला समुद्रात दुबक्या मारतांना त्याने कदाचीत मामाचा हा वेडेपणा खपवुन घेतला असावा ।

स्वदेश


या पोराचा जीव तो केवढा आणि त्याचा बोझा तरी किती !

कल के कलाकार





















Thursday, May 21, 2009

जंगल


फारच वाईट झाले

जॉर्ज फर्नांडीस नामक वादळाचा जो या निवडणुकीत दारुण अस्त झाला तो फारच वाईट ।

कोठे थांबायचे हे कळले नाही तर शेवट असाच होतो।

Wednesday, May 20, 2009

दरबार


मुबई मधील चर्चगेट परिसरातील एक मुख्य रस्ता। मंगळवार, रात्रीचे ८- ८.३० वाजले असतील ।
एक झाड़ , त्याचा पार, पारावार ठेवलेली लहानशी मूर्ती , बहुदा साईबाबांची। झाडावरही तस्वीर, हार घातलेले।
समोर लागलेली भक्तांची रांग, मुर्तीच्या समोर माथे टेकवायाचे व त्यांच्या कानी आपल्या समस्या सांगायच्या।

Kal Ke Kalakaar Sangeet Sammelan - Day 4

Ranjani Ramachandran - Pune
Ninad Mulaokar - Mumbai
Hemraj Chandel -Mandi 

Tuesday, May 19, 2009

Kal Ke Kalakar Sangeet Sammelan - Day 3


Priyanka Mallick - Allahabad - Raga Madhuvanti
Jay Thakkar - Mumbai
Mohammedad Hameed Khan - New Delhi - Raga - Puriya Dhanashree
Sanjay Jha & Amit Sharma - Dhanbad/Reva -Raga Bhopali
Om Prakash Shrivastava -Varansi - Raga _ Puriya Kalyan
Gopal Singh Thakur- Khaiagadh - Raga - Bageshree

Bharat Nayak - Gwalior -Raga - Marwa

Monday, May 18, 2009

कल के कलाकार संगीत संमेलन





शनिवारी १६ तारखेला या संमेलनाला प्रारंभ झाला. पहिल्या दिवशी राजाभाऊंना याला जायला काही मिळाले नाहे , कारण एकच त्यांची बायको. ( नेहमी प्रमाणेच सारा दोष तिचाच असतो किंवा तिलाच द्यायचा असतो )

दुसऱ्या दिवस गाजवला तो जालंदर वरुन आलेल्या श्री. संदिप सिंग यांनी आपल्या दिलरुबा वादनाने.
काल दोन आणखी कलाकारांचे कार्यक्रम पाहिले, हावडा वरुन आलेल्या मिनाक्षी मजुमदारा राग बागेश्री गायल्या. चिनपिन्या (?) वरुन आलेल्या सुजित देवघोरीया यांचे वायोलीन वादनाने तर मैफिलीत खास रंग भरला

पाहुणे आले घरा.

फ्लेमिंगो आले आहेत. शेकड्यांनी आलेल्या या पक्षांना न्याहाळणे एक आनंददायक अनुभव असतो. त्यांच्या हालचाली फार ग्रेसफुल असतात. पण हळुहळु त्यांचे अस्तित्व धोक्यात येत चालले आहे. प्रदुषणाच्या विळख्यांनी यंदाला ते आजारी पडत आहेत आणि एकदा का शिवडी न्हावाशेवा सागरी सेतुचे काम सुरु झाले की मग सारे संपलेच.