कधीनाही ते राजाभाऊ बायकोला घेवुन नाटकाला गेले. "दिवसा तु रात्री मी"
एक कुटुंब, लग्नाळु मुलगी. तिला दिवसा, सकाळी सात ते रात्री सात पर्यंत दिसत नाही. तिचे महाविसराळु वडिल, ठार बहिरा भाऊ, सलग वाक्य बोलण्याची समस्या असणारा दुसरा भाऊ, समंजस वहिनी आणि त्यांच्या नोकर बाज्या.
तिला बघायला एकजण येतो, आपल्या आईवडिलां बरोबर. त्याचीही एक समस्या आहे, त्याला रात्रीचे, संध्याकाळी सात ते सकाळी सात दिसत नाही.
मग या सर्व गोधंळमुळे होणाऱ्या गंमतीजमती, व्यंगामुळे उडवली गेलेलीए थट्टा, हसुन हसुन पुरेवाट.
पण अचानक कोठेतरी वाचल्याचे आठवले.
परदेशात शारीरीक व्यंग हा नाटकांचा विषय, त्यातील थट्टेचा, खिल्ली उडवण्याचा विषय कधीच नसतो.
आणि मग नाटक नुसतेच पाहिले गेले
1 comment:
पण काय हरकत आहे , ऑल द बेस्ट नावाचं एक नाटक होतं त्यांत असेच तीन मित्र काही ना कांही व्यंग असलेले एकाच मुलीवर प्रेम करतात असं काहीसं छान होतं पण. मुलीचा आधीच एक प्रियकर असतो पण हे तीघे ही तिचे छान मित्र बनतात.
Post a Comment