Friday, June 29, 2007

आहार व आरोग्य: अन्न: स्रोत व वर्गीकरण

आहार व आरोग्य: अन्न: स्रोत व वर्गीकरण

MEGH AND RAIN

Pandit Rajan and Sajan Mishra sang "Megh Raga" in Megh Malhar Mahotsav organised by Nehru Centre during 2005,and It rained very heavily after two days of the concert.

Somebody was mentioning this incidence to Shri Ritish and Rajnish Mishra, (Sons of Pandit Rajan and Sajan) after their performance in Megh Malhar Mahotsav on 27/06/07. They also sang the same "Megh Raga".


All I am saying that this year the rain started pouring very heavily in Mumbai on the same night. It did not wait for two more days. (baap se bete sawai )

Yesterday I could not attend the three days Megh Malhar as I was facing thunderbolts and storms at home. I reached very late on the previous night from the program and on the top of it I got up 5.00 a.m early in the morning to upload video's and write blog.

Bhar aayo re badarva,

Thursday, June 28, 2007

रामदासी मल्हार -पं. राम आश्रय झा

मेघ

मेघ

<

मेघ मल्हार

चातक आणि मी. एक वाट पहातो पावसाची आणि मी मेघ मल्हारची. नेहरु सेंटर आयोजीत तीन दिवसीय मेघ मल्हार महोत्सव सुरु झाला आहे. आता फक्त मेघ. मल्हार, मेघ मल्हार, मियां का मल्हार, गौड मल्हार, रामदासी मल्हार, तिलक मल्हार, गांधी मल्हार, सुर मल्हार .

प्रथम सत्राची सुरवात श्री. रितेश व रजनीश मिश्रा यांनी आपल्या दमदार आवाजात मेघ रागानी सुरवात केली, मग ते मियां का मल्हार गायले. आपले वडील व गुरु राजन व साजन मिश्रा याचा वारसा ते समर्थपणे चालवत आहेत.

दुसऱ्या सत्रात पं. राम आश्रय झा यांनी रामदासी मल्हार, मेघ मल्हार व तिलक मल्हार मधल्या पारंपारीक बंदिशी ऐकवल्या.

Monday, June 25, 2007

मै और मेरी तनहाई


वर्षाऋतुतील हे असे मदहोशी, धुंदफुंद वातावरण. या बेहोशीच्या माहोल मधे, कुणाला हवी असते सुरांची नशा तर कुणाला सुरेची. एक गहन प्रश्न मला सतवत आहे. लता की नुरज़हान ? धरतीने हिरवाकंच शालु परीधान केलेला, समोरील सिंहगड ढगात हरवलेला, धुक्याची शाल पांघरलेला. नशीली हवा, बोचरे वारे, काली घटा छाये मोरा जीया तरसाये. बैचेन मी, सोबतीला लता व नुरज़हान.

लतानी आपल्या दर्दभऱ्या आवाजात गायला सुरवात केली. अर्थात कॅसेटवर.
किस्मतमे खुशी का नाम नही, काली काली रात रे दिल बडा सताये तेरी याद आये, वो रात दिन वो, आज मेरे नशीब ने मुझको रुला रुला दिया ( सैंया - संगीत सज्जाद हुसेन ) सपना बन साजन आये ( शोखीयां- जमाल सेन ) साजन तुमसे प्यार करू ( बदनाम - बंसंत प्रकाश ) , जावोगे ठेस लगाके बहोत पछतावोगे बालम ( ( फरेब - अनील विश्वास ), टुटेगी ना प्यार की डोर ( अंबर - गुलाम मोहंमद) साजन से पहली बार मिले तो बोले कैसे ( रिस्ता के.दत्त्ता) ,जोगन बन आई हुं सैय्या तोरे कारण ( शबाब नौशाद ) टुटे हुवे अरमांनो की दुनीयां बसाये ( लाहोर - श्यामसुंदर).

बस्स. किती म्हणुन काळीज पिळवटुन घ्यायचे ?

मग बारी आली नुरज़हानची. सुरवातीलाच तीने चक्क ब्रह्मास्त्र काढले.

बदनाम मुहब्बत कौन करे और इश्कको रुसवा कौन करे ।
जब दे दिया दिल ही आपको , फिर आपसे शिकवा कौन करे ॥
आख़ोमे समाये जब तुम हो और दिल मे समाये जब तुम हो ।
फिर तुमही बतादो आके जरा दुनीया की तमन्ना कौन करे ॥
आसुतो पिये मुश्कील मगर इतना भी बतादो आकर ।
जो आग लगी है सीने मे वो आग को ठंडा कौन करे ॥ ( दोस्त - श्याम सुंदर)

फैसला येथेच झाला.

Sunday, June 24, 2007

मै और मेरी तनहाई


वर्षाऋतुतील हे असे मदहोशी, धुंदफुंद वातावरण. या बेहोशीच्या माहोल मधे, कुणाला हवी असते सुरांची नशा तर कुणाला सुरेची. एक गहन प्रश्न मला सतवत आहे. लता की नुरज़हान ? धरतीने हिरवाकंच शालु परीधान केलेला, समोरील सिंहगड ढगात हरवलेला, धुक्याची शाल पांघरलेला. नशीली हवा, बोचरे वारे, काली घटा छाये मोरा जीया तरसाये. बैचेन मी, सोबतीला लता व नुरज़हान.
लतानी आपल्या दर्दभऱ्या आवाजात गायला सुरवात केली. अर्थात कॅसेटवर.
किस्मतमे खुशी का नाम नही, काली काली रात रे दिल बडा सताये तेरी याद आये, वो रात दिन वो, आज मेरे नशीब ने मुझको रुला रुला दिया ( सैंया - संगीत सज्जाद हुसेन ) सपना बन साजन आये ( शोखीयां- जमाल सेन ) साजन तुमसे प्यार करू ( बदनाम - बंसंत प्रकाश ) , जावोगे ठेस लगाके बहोत पछतावोगे बालम ( ( फरेब - अनील विश्वास ), टुटेगी ना प्यार की डोर ( अंबर - गुलाम मोहंमद) साजन से पहली बार मिले तो बोले कैसे ( रिस्ता के.दत्त्ता) ,जोगन बन आई हुं सैय्या तोरे कारण ( शबाब नौशाद ) टुटे हुवे अरमांनो की दुनीयां बसाये ( लाहोर - श्यामसुंदर).
बस्स. किती म्हणुन काळीज पिळवटुन घ्यायचे ?
मग बारी आली नुरज़हानची. सुरवातीलाच तीने चक्क ब्रह्मास्त्र काढले.
बदनाम मुहब्बत कौन करे और इश्कको रुसवा कौन करे ।
जब दे दिया दिल ही आपको , फिर आपसे शिकवा कौन करे ॥
आख़ोमे समाये जब तुम हो और दिल मे समाये जब तुम हो ।
फिर तुमही बतादो आके जरा दुनीया की तमन्ना कौन करे ॥
आसुतो पिये मुश्कील मगर इतना भी बतादो आकर ।
जो आग लगी है सीने मे वो आग को ठंडा कौन करे ॥ ( दोस्त - श्याम सुंदर)
फैसला येथेच झाला.

BELABAHAR: तबला संगत#links

BELABAHAR: तबला संगत#links

BELABAHAR: राग देश#links

BELABAHAR: राग देश#links

Thursday, June 21, 2007

नवीन गंधर्व यांचे बेलाबहार वादन

मी नवीन गंधर्व यांच्या साठॊ http://madhurdhwani.blogspot.com हा बेलाबहार हे वाद्य जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचावे या हेतुने बॉग सुरु केला आहे. लवकरच या वाद्याची संपुर्ण माहीती मी लिहिन.

Wednesday, June 20, 2007

झाडावरच्या फांदीपर्यंत रस्ता ?


विक्रमा, तुझे हे हाल मला बघवत नाहीरे. मी हा असा सर्वात उंच फांदीला लटकलेलो, प्रत्येक वेळी मला न्यायला तुला वर पर्यंत चढुन यायला लागते. बस ठरले. मी या झाडावरच्या फांदीपर्यंत रस्ता बांधायचा ठरवला आहे, वेताळाने जाहीर केले.
विक्रम अवाक . अरे वेताळा हे कसे काय शक्य आहे ? झाडाचा, निसर्गाचा, पर्यवरणाचा काही विचार , काळजी, तुला आहे ही नाही ? या झाडावर रहाणारे हे असंख्य पक्षी जातील कुठे ? त्यांची घरटि तुटतील ना ? एक जिवनचक्रच नष्ट होईल ना. आज मी वरपर्यंत आलो, मग हा राजरस्ताच होईल ना. या झाडालाच धोका निर्माण झाला तर तुझे काय ? तु जाशील कोठे ?

विक्रमा मी हे एकदा ठरवले म्हणजे ठरवले, आता यात बदल नाही. जर चीन थेट माउंट एव्हरेस्टवर पर्यावरणाचा विचार न करता ’हाय" वे बांधत असेल तर मी का हा झाडावर रस्ता बांधु नये ?

हे मात्र खर वेताळा, या पुढे केवळ हाच रस्ता नव्हे तर माझ्या साम्राज्यातील सर्व रस्ते, उड्डाणपुल, ईमारती बांधण्याची कामे मी फक्त चीनला देणार आहे. फक्त चार महिन्यात हा रस्ता चीन बांधुन पुरा करणार आहेत म्हणे. नाहीतर आपल्या कडचे कंत्राकदार, चार चार वर्षे झाली तरी एक साधा सरळसोट रस्ता बांधुन पुरा करता येत नाही, नवीन रस्ता तर सोड, दुरुस्ती साठी खोदलेला रस्ता दुरुस्त करायलाच चार चार वर्षे घेतात. आता बोल ?
अपुर्ण.

Tuesday, June 19, 2007

बेला बहार - एक छोटिशी झलक

आज जगाला फारसे हे वादय ठावुक नाही. श्री. नवीन गंधर्व यांचे वडील बेला बहारचे जनक . हे वादय लोकांपर्यंत पोहोचण्याचा ध्यास घेतेलेले श्री. नवीन गंधर्व लवकरच बॉग सुरु करणार आहेत. सर्व संगीतप्रेमींनी या साठी त्यांना आशीर्वाद व साथ देवुन, त्यांचे साह्य करावे अशी माझी नम्र विनंती.



कार्य सिद्धीस नेण्यासी श्री समर्थ आहेतच. त्यांच्या या शुभकार्यात परमेश्वर त्यांना भरभरुन यश देवो, ही शुभकामना. यशस्वी भव.

Monday, June 18, 2007

हे रहस्य काय ?

आज सकाळी उठायला अंमळ उशीरच झाला. सकाळीच चक्क सिल्कची भरजारी साडी नेसलेल्या, अलंकारानी मढलेल्या, अनोळखी बाईने बदामपीस्तानी भरलेला मसाला दुधाचा कप पुढे केला. मग माझे चरणस्पर्श करुन चरणधुल आपल्या कपाळी लावली. प्राणनाथा, सुप्रभात, मसाला दुध पिताना ! क्षणभर मला कळेनासे झाले ही परकी बाई माझ्या घरात करतेय काय ? आणि वरती हा सर्व सात्वीकभाव ?
मी विचारले त्ताई आपण कोण ? आणि माझी बायको कोठे आहे ? तशी ती खुदकन गालातल्या गालात हसु लागली. अहो (?) असे काय करता, हि कसली मेली थट्टा ? मला ओळखले नाहीस का हो ? आपल्या अर्धांगीनीशी वागण्याची ही कोणती पद्धत ? मुलाला बोलवुन विचारले, अरे तुझी आई कोठे ? तर त्यानी त्याच परक्याबाई कडे बोट दाखवले. हि काय माझी आई. माझा संभ्रम आणखीन वाढला, माझे आईवडील सर्वजण मला वेडयात काढु लागले. या ग्रुहस्थाला आपली बायकोपण ओळखता येत नाही ? याला झाले तरी काय आहे ?

हे रहस्य काय ?

मग माझी दया येवुन त्या मॅडमनी मला पडलेल्या कोडयाचे उकल केले.
अरे, मोरु , आयुष्यभर, स्म्रुती इराणीचा "तुलशी" चा चेहरा एका रात्रीत बदलुन तिच्या जागी गौतमी गाडगीळ येते आणि मालीकेंनी खुळावलेले सबंध बिनडोक जग तिला तुलशी म्हणुन निमुटपणे स्विकारते , तसेच "देश मे निकला होगा चांद" मधे पम्मीचे नवरे प्लास्टीक सर्जरी करुन तिच्याबरोबर आट्यापाट्याचा खेळ खेळत रहातात, ( मधेच तो हा असतो, आणि हा तो, मग तो तोच असतो, आणि हा हाच असे काहीतरी ), आणि हे सारे पहाताना कोणाच्याही मनात एकदाहि शंका येवु नये ही हा काय पागलपणा आहे याची ?
असे असता मग मी माझा चेहरा बदलला तर काय झाले ?
- स्प्रुर्ती तंबी दुराई याच्या "दोन फुल एक हाफ" या सदरातील लेखापासुन.

'संगणक जगत' अर्थात Madhav Shirvalkar's info: ह्या आठवड्याच्या उत्तम वेब साईटस..५

'संगणक जगत' अर्थात Madhav Shirvalkar's info: ह्या आठवड्याच्या उत्तम वेब साईटस..५

Sunday, June 17, 2007

सौ. मंजुषा कुलकर्णी-पाटील

सौ. मंजुषा कुलकर्णी-पाटील या आजच्या तरुण पिढीतील एक अत्यंत प्रतिभाशाली, गुणवंत गायिका. या सर्व कलावंताचे स्वर्गीय गाणे ऐकताना मधेच कधीतरी एक असा क्षण येतो की आपण क्षणस्थ होवुन जातो, मन शांत होत जाते, याच साठी केवळ याच अनुभुतीसाठी ऋषीमुनी रानात तप करायला जात असावेत का?



आजच्या मैफीलीची सुरवात त्यांनी धनश्री रागाने सुरु केली, त्यानंतर गौरी व सोहोनी गायल्यानंतर त्या लोकाग्राहस्तव ठुमरी व शेवटी दादरा गायल्या. नाट्यसंगीत गाणे ही तर त्यांची खासीयत, पण ते काही आज ऐकायला मिळाले नाही. तबल्याबर त्यांना साथ केली ती पं. विभव नागेशकरांनी.
आपल्या आक्रमक गायकीने सौ. मंजुषा कुलकर्णी-पाटील नेहमीच ऐकणाऱ्यांना मंत्रमुग्ध व प्रभावीत करत आल्या आहेत. त्या गाताना नेहमीच श्रोत्यांबरोबर स्वःताही गाण्याचा आनंद उपभोगत असतात असे मला वाटते. कार्यक्रम संपल्यानंतर कलावंताच्या चेहऱ्यावरचे तुप्तीचे भाव काही औरच असतात नाही का.
साजन मिलाप या संस्थेतर्फे त्याच्या हिंदुस्तानी शास्त्रीय संगीताचा गाण्याचा कार्यक्रम, भारतीय विद्यार्थी भवन,चौपाटी, मधे झाला.

'संगणक जगत' अर्थात Madhav Shirvalkar's info: संगणक 'स्लो' चालतोय? (भाग २)

'संगणक जगत' अर्थात Madhav Shirvalkar's info: संगणक 'स्लो' चालतोय? (भाग २)

'संगणक जगत' अर्थात Madhav Shirvalkar's info: ह्या आठवड्याच्या उत्तम वेब साईटस..३

'संगणक जगत' अर्थात Madhav Shirvalkar's info: ह्या आठवड्याच्या उत्तम वेब साईटस..३

पण असे का ?

मला समजत नाही की
काम करत असताना आपले दोन्ही हात बरबटलेले असतात, नेमकी तेव्हाच नाकाला खाज का येते ?

बस थांब्यावर ऊभी असलेली बस पकडण्यासाठी समोरुन धावत येणारी माणसे बघुन देखील , ज्यात वयोवृद्ध , बायका, मुले सुद्धा असताना, त्यांच्या कडे कानाडोळा करीत बसचालक बेदरकारपणे न थांबता, त्यांना न घेता निघुन का जातो ?

बसमधे माणसे चढत असताना त्यांना पुर्णपणे आत येवु देण्याआधीच बसचालक घंटी मारुन बस सुरु करायला का लावतो?

ट्रेन मधे आतील माणसे उतरण्याआधीच रानट्यासारखी फलाटावरील माणसे हल्लाबोल का करतात ?

शेवटचा शेंगदाण्याचाच दाणा नेमका खवट का असतो ?

हवामान वेधशाळेचे पावसाच्या संबंधी अनुमान नेहमीच कसे चुकते ?

रविवारी उपहारग्रुहात प्रचंड गर्दी असते, तासनतास आपला नंबर येण्यासाठी भुलेल्या पोटी ताटकळत उभे रहायला लागते, घाईगर्दीत चांगले , निवांत खायला मिळणार नाही हे ठावुक असतानादेखील लोक ईतर दिवशी न जाता रविवारीच का जातात ?

साडीच्या दुकानात दुसरीने निवडलेली साडीच नेमकी आपल्या मनात का भरते ?

जेव्हा आपल्याला प्रचंड भुक लागलेली असते तेव्हाच नेमके बायकोला खायला काहीतरी करायचा कंटाळा आला असतो व भुक नसते तेव्हा खाईये खाईये हा आग्रह का होतो ?

पुण्यात दुकानात, उपहारग्रुहात भल्या सकाळीच पदार्थ संपलेले कसे असतात ?

देवदर्शनासाठी शेकडो, हजारो मैलचा प्रवास करुन , तासंनतास दिवसभर रांगेत उभे राहुन, भक्तांना फक्त एक-दोन सेकंद मुर्तीचे दर्शन सुद्धा धडपणे मिळत नाही

येखादे ठिकाण , जागा, गाव, शहर आपल्याला खुप खुप आवडलेले असते, तेथे परत भेट द्यायचीच हा आपण ठाम निश्चय परत परत केलेला असतो, पण परत जाणे होतच नाही .

अपुर्ण.

बस्तकीया




बस्तकीया, दुबईमधला हा एक देखणा परीसर. पारंपारीक वास्तुशास्त्र, पुरातन पद्धतीची घरे, पुर्वापार चालत आलेला अमोल्य ठेवा, संस्कॄती. वारसा, कला जाणीवपुर्वक , कठोर मेहनतीने व प्रामाणिकपणे जोपासण्याचा दुबई सरकारचा स्त्युत प्रयास. या गल्ली, कुचेत रमतगमत फेरफटका मारण्याचा आनंद काही और आहे.
१९०० च्या सुरवातीस बस्तक, दक्षिण ईराण मधुन आलेल्या व्यापारी लोक येथे या परिसरात स्थाईक झाले. त्यांच्या जुन्या घरांचे आता याच परंपरेचे भान राखत जीर्णोद्धार केला गेला आहे

ह्या रखरखत्या ऊन्हात, तप्त वाळवंटात घरात थंडावा रहावा, नैसर्गीकरीत्या वातानुकुलीत रहावे, या विचाराने केलेली ही विंडटॉवर ची रचना वैशिष्टपुर्ण आहे या दुबईमधे शैख झहीद रोड वर अचंबा वाटतील असे गगनाला स्पर्श करणारे टॉवर्स उभे केले आहेत त्याच बरोबर हेरीटेज साईट्स ही नुसत्याच जपल्या गेलेल्या नसुन त्याची उत्तमप्रतीची देखरेखही होत आहे.

नाहीतर आपल्या कडे जे जे जुने आहे ते ते नष्ट करा. या पाश्वभुमीवर आपल्या पुण्यातील ऐतीहासीक वाडे जमीनदोस्त करुन तेथे विद्रुप ईमारती उभारण्याचे प्रयत्न पाहीले की वाईट वाटते.

Saturday, June 16, 2007

मी अनु: गाथा माझ्या गझलेची

मी अनु: गाथा माझ्या गझलेची

खोताची वाडी


मध्यंतरी वर्तमानपत्रात खोताच्या वाडी विषयी काहीबाही वाचनात आले होते. येथे म्हणे redevelopement व्हायची आहे. ज्यानी खोताची वाडी ही काय चिज आहे हे पाहीलेले नाही असेच नतद्रस्त माणसेच हा देडावाकडा विचार करु शकतात. सौदर्याची जाण नाही, वास्तु जोपायसाची अक्कल नाही, पैसा फक्त पैसाच हवा व त्या साठी वाटॆल ते.
हॊ एक heritage site आहे. येथेले बंगले देखणे आहेत. एक छोटेसे हे गावठणच म्हणायचे.

Friday, June 15, 2007

बॉग टायटल मधला फोटोचा आकार कमी कसा करावा ?

बॉग टायटल मधला फोटोचा आकार कमी कसा करावा ? कोण जाणकार मला मार्गदर्शन करु शकेल काय ?

हे जग म्हणजे सर्वात मोठा रंगमंच आहे रे



वेताळाचे स्वगत सुरु झाले " विक्रमाआआ हे जग म्हणजे सर्वात मोठा रंगमंच आहे रे ! यह जीवन एक नाट्य आहे, आपण सारे कलावंत केवळ कठपुतळी रे कठपुतली, सुत्रधार कोइ और है रे ॥" ( अगदी आनंद मधल्या राजेश खन्ना टाईप)

विक्रम नेहमी प्रमाणे आपला बुचकळ्यात पडला. ह्या वेताळाला झालय तरी काय ? काल परवा पर्यंत तर बरा होता. आज अचानक याच्या अंगात नट कुठुन संचारला ? काही उमजेना. आपले मौनव्रत बरे. कळेल थोडया अवधीने.

अरे विक्रमा तुझ्या राज्यात हे काय चाललय ? तुझे राज्यकारभारात लक्ष्य आहे का नाही ? तुझ्या राज्यात मराठी नाटकांना आपली हक्काची जागा पाहीजे होती ती आता मिळाली ना मग ती सर्वांनी व्यवस्थीत वाटुन घ्यायची. व्यवसाईक , समांतर, बालरंगभुमी गुण्यागोविद्याने एकत्र नांदावेत, या सर्वांनी मिळुन रसीकांचे मन रिझवावे तर मधेच हे बेसुर सुर कुठुन येवु लागले ?
विक्रमा, समांतर रंगकर्मी, बालरंगभुमीवाले केवळ पाचच गाव मागताहेत रे ! त्यांना सबंध साम्राज्य नको आहे रे ! केवळ आपल्या हक्काचा रंगमंच त्यांना हवाय. सुईच्या अग्रावर रहाणारी ही जागा ती पण बिल्डर्सना भाडयाने ? का ? कशासाठी ? आणि या साठी ऋषीतुल्य दामु केंकरेंना आज आपल्या हाती सुदर्शनचक्र घ्यावे लागले ? विजय तेंडुलकर, लालन सारंग, डॉ. जब्बार पटेल, सुलभा देशपांडे, अरुण साधु, रत्नाकर मतकरी, वामन केंद्रे, सुभाष भेंडे, अलेक पदमसी, नदीर बब्बर, फिरोझ खान, राकेश बेदी, दिनेश ठाकुर, माधव वझे, सुरेश खरे, अरुण काकडे, विनय आपटे, शफायत खान, मीना नाईक, कमलाकर नाडकर्णी, प्रेमानंद गज्वी, कोणाकोणाची नावे घेवु , या सर्व मातबगार, जेष्ठ आणि श्रेष्ठ मंडळींना भर रस्तात उतरावे लागले ? लानत है तुमपर और तुझ्या राज्यातील समस्त नाट्यरसींकावर. जरा जनाची नाही निदान मनाची तरी. प्रतिनिषेध कसले करता ? वेताळाचा आवाज चढु लागला.

वेताळा शांत हो ,अट्टहास करु नकोस, आम्ही अद्यायावत असा वातानुकुलीत रंगंमंच उभारु असे आज मी तुला आश्वासन देतो.

विक्रमा तु बोललास आणि हा मी चाललो पळुन रंगमंचावर भाषण करायला.

Thursday, June 14, 2007

वाचा विचार करा आणि विसरुन जा

UNKE DUSHMAN HAI BAHUT AADMI AACHA HOGA: विक्रमा आम्ही मराठी हा आमचा गुन्हा काय रे ? वेताळाने विचारले.#links

श्रीमती प्रतिभाताई पाटील यांचे अभिनंदन


आपल्या श्रीमती प्रतिभाताई पाटील यांचे राष्टपतीपदाच्या उमेदवार म्हणुन सर्वमताने निवड झाल्याबद्द्ल त्यांचे हार्दीक अभिनंदन . त्या भारताच्या पहिल्या महिला राष्टपती असतील. आणि ह्या पहिल्या मराठी वक्‍ती असतील तसेच पहिल्यांदाच राष्टपतीपद आपल्या महाराष्टातील वक्‍तीला मिळणार आहे.

गेल्याच महिन्यामधे मला त्यांना अगदी जवळुन पहाण्याची , ऐकण्याची संधी मिळाली होती. कल के कलाकार संमेलनाला श्रीमती प्रतिभाताई पाटील प्रमुख पाहुण्या म्हणुन खास राजस्थान वरुन आल्या होत्या. त्यांचे तेव्हाचे मोजकेच व समर्पक भाषण ऐकुन मी फार प्रभावित झालो होतो.
श्रीमती प्रतिभाताई पाटील यांचे हार्दीक अभिनंदन व त्यांना शुभेच्छा.

आपल्या महाराष्टातील सर्व मराठी राजकीय पक्ष श्रीमती प्रतिभाताई पाटील यांच्या पाठीशीच आपापसातले मतभेद व खेकडाव्रुत्ती विसरुन रहातील ही आशा.

महाराष्ट्रात कॉंग्रेसशी एकनिष्ठ असलेल्या मोजक्‍या ज्येष्ठ व्यक्तींमध्ये प्रतिभा पाटील यांचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते. खानदेश कन्या व विदर्भाच्या स्नुषा असलेल्या प्रतिभाताई सध्या राजस्थानच्या राज्यपाल आहेत. शांत व विनयशील स्वभाव हा प्रतिभाताईंच्या व्यक्तिमत्त्वाचा गुणविशेष. प्रतिभाताईंचे वडील (कै.) नारायणसिंह ऊर्फ नानासाहेब पाटील जळगावमधील नामवंत विधिज्ञ होते. वयाच्या बाराव्या वर्षी प्रतिभाताई मातृप्रेमाला पारख्या झाल्या. त्यानंतर मावशीने त्यांचा सांभाळ केला. प्रतिभाताईंचे शालेय शिक्षण जळगाव येथील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये (हल्लीचे आर. आर. विद्यालय), तर महाविद्यालयीन शिक्षण मूळजी जेठा महाविद्यालयात झाले. त्यांचे थोरले काका रावसाहेब दिवाण बहादूर डोंगरसिंग पाटील हे स्वातंत्र्यपूर्व काळात लेजिस्लेचर कौन्सिलचे सतत बारा वर्षे सदस्य होते. त्या अर्थशास्त्र व राज्यशास्त्र हे विषय घेऊन एम. ए. झाल्या. विद्यार्थिदशेत त्यांनी केवळ अभ्यासावर भर न देता खेळाडूवृत्ती जोपासली. महाविद्यालयीन जीवनात त्यांनी टेबल-टेनिस विजेत्या म्हणून नाव कमावले होते. एवढेच नव्हे, तर आंतरमहाविद्यालयीन सामन्यांतही त्यांनी अजिंक्‍यपद प्राप्त केले होते. प्रतिभाताईंनी १९६२ मध्ये जळगाव मतदारसंघातून प्रथमच प्रचंड मताधिक्‍याने निवडणूक जिंकली, त्या वेळी त्यांचे वय २५ वर्षे होते. आमदार असतानाच त्यांनी १९६५ मध्ये एल. एल. बी.ची पदवी मिळविली होती. आमदार झाल्यानंतर त्यांचा विवाह सात जुलै १९६५ रोजी डॉ. देवीसिंह शेखावत यांच्याशी झाला. श्री. शेखावत उदारमतवादी असल्याने पत्नीला त्यांनी राजकारणात केवळ सहकार्यच केले नाही, तर प्रोत्साहनही दिले. जळगावचे प्रतिनिधित्व केल्यानंतर पुढील निवडणुकीत त्यांनी एदलाबाद (आताचा मुक्ताईनगर) मतदारसंघ निवडला व त्या प्रचंड मतांनी निवडून गेल्या. त्या सतत पाच वेळा विधानसभेवर निवडून आल्या. त्यांनी १९६७ पासून १९७७ पर्यंत सतत दहा वर्षे मंत्रिपद भूषविले. अनेक खाती सांभाळून त्यांनी महाराष्ट्रात उत्कृष्ट कार्य केले. "पुलोद' सरकारच्या काळात त्यांनी विरोधी पक्षनेतेपद यशस्वीरीत्या भूषविले. प्रतिभाताईंची कार्यपद्धती व कॉंग्रेसबद्दलची ध्येयनिष्ठा लक्षात घेऊन त्या वेळचे पंतप्रधान राजीव गांधी यांनी त्यांची राज्यसभेच्या उपाध्यक्षपदी निवड केली. हे जळगाव जिल्ह्यालाच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्राला भूषणावह होते. राजकारणाबरोबरच अंध विद्यार्थ्यांसाठी शिक्षण संस्था; तसेच जळगावमधील अभियांत्रिकी महाविद्यालय हे त्यांच्या शैक्षणिक कार्याचे मानबिंदू ठरले आहेत.

विक्रमा आम्ही मराठी हा आमचा गुन्हा काय रे ? वेताळाने विचारले.

हल्ली वेताळ तसा धास्तावला दिसत होता, मधेच स्वताःशीच "मी मांसाहारी नाही हो, खरच मी मांसाहारी नाही, मी फक्त वरणभातावर साजुक तुप घालुन खाणारा माणुस होतो हो, हवे तर आता तुप पण खाणे बंद करतो, मनेका गांधी म्हणाली होती ना गाईचे दुध पण मांसाहारी आहे , तिचे मी ऐकतो, पण नका हो नका मला" असे अर्थाचे काहीतरी पुटपुटत अचानक वेताळ गप्प झाला.

नेहमी माझ्या प्रश्नाचे समाधानकारक उत्तर दे नाहीतर परीणाम तुला ठावुक आहे म्हणणारा वेताळ, आज आपल्याच विचारात मग्न झालेला होता. काहीच न बोलता मधेच सुस्कारा सोडीत या खांद्यावरुन त्या खांद्यावर फिरणाऱ्या वेताळाचे हाल विक्रमाला आज पहावले नाही, स्वताःहुन त्याने आज बोलायचे ठरवले.
बा वेताळा, काय झाले सांगशील की नाही , तुझे दुःख दुर करणे माझ्या हातात असलेतर मी ते जरुर करीन, विक्रमाने विचारले.

पण वेताळ काहीच बोलला नाही , दर्दभऱ्या नजरेने आपल्या वडाच्या झाडाकडे, आपण लटकत असलेल्या फांदीकडे केवीलवाण्या नजरेने एकटक पहात राहीला, शेवटी ही झाडे विक्रमाने, त्याच्या पुर्वजांनी लावलेली आहेत ते तो कसे विसरु शकत होता ?

विक्रमा, चल तुला मी प्रश्न विचारतोच. मी भुमीपुत्र, स्थानीक, मराठी आहे आणि वर मुंबईत रहातो हा माझा गुन्हा आहे का रे ? आम्ही मांसाहार करतो ती आमची जीवनपद्धत आहे. म्हणुन काय आम्हाला आमच्याकडे घरे विकत घेण्यासाठी पैसा असुन सुद्धा बिल्डरनी घरे विकू नयेत का रे ? परप्रांतीयानी आम्हाला केवळ आम्ही मांसाहारी आहेत म्हणुन आमच्या राहात्या जागेतुनही हुसकवुन लावावे काय रे ? दुर्देवाची गोष्ट म्हणजे काही बिल्डर तर आमचेच भाऊबंद आहेत रे ! आमच्यातल्या शाकाहारी माणसांना आम्ही शाकाहारी आहोत , शाकाहारी आहोत हे दुनीयेला ओरडुन सांगायला लागण्याची, अमराठी लोकांना पटवुन देण्याची वेळ का बरे आली रे ?
आमचा कोणीच वाली नाही का रे ? विक्रमा, अधिक माहीती साठी दि. ९ मे रोजी महाराष्ट टाईम्स मधे आलेला श्री. संजीब साबडे यांचा " शाकाहारी वस्त्यांतील घरं महाग " या विषयावर लिहलेला लेख वाच, आजच्या म.टा. मधले "शाकाहारी वस्तांना मराठी शाकाहारीही नको आहेत " हे श्री.अरुण जोशी , गिरगाव यांचे पत्र वाच.

विक्रमा आता समाज त्यांच्या आहारशैलीवर विभागाला जावु लागला आहे रे ! काहीतरी कर रे , आता तुच आमचा वाली ,आमचा तारणहार, तुच आमचा नेता.

वेताळा, मी तुला याबाबतीत काहीच मदत करु शकत नाहीरे, मला पुढच्या शंभर पिढ्यांची तरतुत करुन ठेवायची आहे, शेवटी पैसा हेच जीवनसर्वस्व, हाच सखा, हाच आप्त, आणि हाच शाश्वत. बाकी सारे झुठ. तु गावाकडे किंवा लांब उपनगरात दुसरे झाड बघ. हवेतर त्यास मी तुला सहायता करीन.

विक्रमा तु बोललास, पण हा मी असा उडुन जावु कुठे रे ?

आणि शेवटी अगतीक वेताळ उडुन जावुन परत आपल्या झाडावर लटकु लागला, दोन दिवसात फांदी खाली करण्यासाठी.

Tuesday, June 12, 2007

विक्रम और वेताळ

विरोधाभास म्हणजे काय रे दादा ? वेताळाने विक्रमला विचारले, माझ्या प्रश्नाचे समाधानकारक उत्तर दे नाहीतर परीणाम तुला ठावुक आहे. वेताळा अरे वेताळा, ही बातमी "एका राजकीय पक्षाच्या हिंदुत्ववादी भूमिकेबाबात त्याच्याच मित्रपक्षाकडुन संशय व्यक्त " ही वाचलीस का ?
वाचली पुढे बोल,
आता हे वाच. "मालेगाव महापौरपदासाठी मौलाना मुप्ती यांच्या तीसरा महाज आणि याच मित्राची युती होणार अशी चर्चा असताना आज अचानक भलत्याच राजकीय पक्षाबरोबर तीसरा महाज यांच्याबरोबर आघाडी झाली असुन मुप्ती यांच्या या पक्षाला महापौर बहाल करण्याचा निर्णयही झाला " वर्तमानपत्र वाचत जा म्हणुन मी तुला गेल्याच वेळा सांगीतले होते नारे .
विक्रमा तु बोललास आणि हा मी चाललो. आणि वेताळ उडुन जावुन परत आपल्या झाडावर लटकु लागला, सर्व काही दोन दिवसात विसरुन जाण्यासाठी.

Monday, June 11, 2007

भाषणे भाषणे व भाषणे

कोणत्याही समारंभात भाषणे ऐकायची म्हटले की माझ्या पोटात भलामोठा गोळा येतो. एकदा का माईक हातात आला की बोलणाऱ्याला आपण किती वेळ बोलावे, काय काय बोलावे आणि का बोलावे याचे भान रहात नाही.

शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम. आधी सत्कार वगरै असावा, नक्की लक्षात नाही, प्रमुख पाहुणे म्हणुन तत्कालीन ब्रु.म.न.पा. आयुक्त श्री. शरद काळे होते. ते भाषण करायला उभे राहिले. भाषण सुरु झाले. " आपण व कलावंत यांच्या मधे मी येवु इच्छीत नाही. मी सुद्धा गाणे ऐकायला आलो आहे ". झाले भाषण संपले. लगेचच मुख्य कार्यक्रम सुरु झाला. सर्वांनी गाणे मस्त पैकी मजेत ऐकले.

शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम. सर्व तरुण कलावंत. एका बुजुर्ग, वयोवृद्ध कलावंताचे भाषण सुरु झाले,(मला कोणाचाही अनादर करायचा नाही,पण आजची तरुण पिढी ही खरच खुप गुणी आहे हे त्यांनी लक्षात ठेवायला हवे होते ) आमच्या वेळी कसे होते, आता काय ही भीषण परीस्थिती आली आहे, तरुण कलांवंतावर तोंडसुख घेवुन झाले, उपदेशाचे मार्गदर्शनापर बोल ही सुनावुन झाले. गाणे म्हणजे काय, कसे असावे, ही पिढी किती बेजबाबदार आहे, नुसती पळाते आहे, वगैरे वगैरे. वरती मी या विषयावर एके ठिकाणी तीन तास बोललो होते (पोटात गोळेच गोळे ) हे पण सांगुन झाले. कार्यक्रमातील मजाच निघुन गेली.

प्रसंग तिसरा. प्रमुख पाहुण्यांकडे खरच जास्त वेळ नव्हता, वेळात वेळ काढुन ते केवळ कबुल केले होते म्हणुन ते अती महत्वाच्या कार्यक्रमामधुन मधुनच आले होते. परत जाण्याची खरच निकड होती आणि हे सर्वांनाच माहीती होते, सांगुनही झाले होते, पण प्रत्येकालाच आपले विचार मांडण्याची संधी दडवायची नव्हती. शेवटी मुख्य कार्यक्रम घाईघाईने आटोपता घ्यावा लागला.

Sunday, June 10, 2007

लोकसहभागातुन स्वच्छ्ता


अस्मादिकांना आज कै.मनोहर विचारे प्रतिष्ठान तर्फे मुंबईच्या महापौर डॉ. सौ. शुभा राऊळ यांच्या हस्ते, "लोकसहभागातुन स्वच्छ्ता" या कामाबद्द्ल मानपत्र मिळाले.


यांस......
आपल्या कर्तुत्वाने सामाजीक क्षेत्रात आपण आपल्या बरोबरच मुंबईनगरीचे नाव उज्ज्वल केले आहे.
आपल्या या अलौकिक कार्याचा आम्हा सर्व मुंबईकरांना सार्थ अभिमान आहे.
आपल्या कर्तुत्वतेजाने उजळलेल्या या मुंबईनगरीत वास्तव्य करणाऱ्या सर्व मुंबईकरांच्या मनात हा अभिमान कायम जाग्रुत राहाण्यासाठी हे मानपत्र प्रदान करीत आहोत.

खेडयाकडे चला, खेडी स्वयंपुर्ण व्हायला हवीत.

"खेडयाकडे चला" "खेडी स्वयंपुर्ण व्हायला हवीत" ही महात्मा गांधींजींची शिकवण प्रत्यक्षात आचरणात आणणाऱ्या चित्रपट तारे-तारकांना माझा हिरवा सलाम. यांचे अनुकरण वास्तवीक पहाता सर्वांनी करायला हवे. आज आपल्यापुढे एक आदर्श घातला गेला आहे. गावाकडे परत जा, शेती करा, शहरांवर पडलेला भार कमी करा, आपला देश शेतीप्रधान आहे याचा विसर पडुन देवु नका हे सारे संदेश या कृतीतुन दिले गेलेले आहेत. आता काहीच्या पोटात दुखत असावे त्याला ईलाज नाही, वागणुकीचा विपर्यास करणारी माणसे काही कमी नसतात.

कदाचीत हे सारे मुळचे व्यवसायाने किसान असावेत , राह भटकले असावेत म्हणा किंवा पोटापाण्यासाठी या मोहमायी दुनियेत आले असावे पण त्यात त्यांचे मन रमलेले नसल्यामुळे ते आपल्या मुळच्या व्यवसायाकडे वळले असावे. मला समजत नाही यात गहजब उडावा असे काय आहे ? ह्याच शुद्ध व प्रामाणिक हेतुने दिलीपकुमार, अमिताभजी, धर्मेन्द्र, सुनिल शेट्टी, संगीता बिजलानीपासुन अमीर खान (लगान फेम) पर्यंत सर्वांनाच मावळाची भुरळ पडत असावी.
या प्रेसवाल्यांना कही कामधंदे नाहीत का?
उगाचाच "खासगी वनांच्या नोंदिमुळे धनिक आगीतुन फुफाट्यात" " अमिताभ पाठोपाठ धर्मेन्द्र ही अडचणीत " आदी ठळक बातम्या छापत असतात.

पैसा अडवा पैसा जिरवा

"पैसा अडवा पैसा जिरवा" , "खोऱ्याखोऱ्याने पैसा ओढा" "टेंडर घ्या टेंडर द्या", "सिंचंन करा संचन करा" , आदी लोकल्याणकारक योजना "जलसंधारण क्रांती" आणण्यासाठी कृष्णा खोरे विकास प्रकल्पात राबवल्या जात असतांना आपल्या लोकशाहीची आधारस्तंभ असलेली वर्तमानपत्रे काय झोपली होती काय ?


तेव्हाच याची दखल का घेतली गेली नाही ? बैल गेला आणि झोपा केला. त्याचवेळी सविस्तर माहीती दिली असती तर बरे झाले असते.

चांगली विकासाची गंगा अंगणात आली होती, अवतरली होती, तुम्ही आम्ही सर्वच मराठी, आपणही त्यात डुबकी मारली असती की. कृष्णा खोऱ्यातील वांगी चवीला फार फार चविष्ट, मस्त पैकी वांग्याचे भरीतावर ताव मारला असता की.

Saturday, June 09, 2007

आशा’ज

सही ओळखिची वाटते आहे का ? मध्यंतरी पेडार रोडवर उड्डानपुल झाल्यास मी दुबईला निघुन जाईन असे कोणीतरी म्हटल्याचे व माझ्या बोलण्याचा विपर्यास केला गेला असल्याचा खुलासा वर्तमानपत्रात वाचण्यात आला होता. आम्ही दुबईत असतांना त्याच्यामागचे कारण थोडॆ थोडे ध्यानी येवु लागले. स्थळ- वाफी सीटी मॉल, उपहारग्रुह भलतेच महाग आहे. येथे जेवायला जाण्याचे आमचे धाडस झाले नाही .



और कुछ तल्ख़ी-ए हालात ने दिल तोड़ दिया

कुछ तो दुनियाकी इनाया़त ने दिल तोड़ दिया
और कुछ तल्ख़ी-ए हालात ने दिल तोड़ दिया

हम तो समझे थे कि बर्सात मे बरसेगी शराब
आई बर्सात तो बर्सात ने दिल तोड़ दिया

दिल तो रोता रहे और ऑखसे ऑसू न बहे
इश्क़ की ऐसी रवायात ने दिल तोड़ दिया

वो मेरे है मुझे मिल जाऎगे आ जाऎगे
ऐसे बेकार खय़ालात ने दिल तोड़ दिया

आपको प्यार है मुझसे कि नही है मुझसे
जाने क्यो ऐसे सवालात ने दिल तोड़ दिया

सुदर्शन "फाकिर "

Friday, June 08, 2007

Thursday, June 07, 2007

जबरदस्त


काल रवींद्र नाट्य मंदीर मधे "जबरदस्त" या मराठी चित्रपटाचा प्रिमीयम शो होता, बेगम अख्तर चा कार्यक्रम सुरु होण्यास वेळ लागत होता, वेळेचा सदुपयोग करण्यासाठी तेथे एक चक्क्रर मारली

यु तो हर शाम उम्मीदोमे गुज़र जाती थी । आज कुछ बात है जो शाम पे रोना आया ॥

गज़ल के दो नाम है. एक गज़ल और दुसरा बेगम अख्तर. ईंतजारी, बेकारारी, दऱबदर को तो आखिर ख़त्म होना ही था. हमे तो अपने होशोहवास तो खोना हि था. दो घंटो ईंतजार करवाया रोशनीने लौट आने के वास्ते. आणि त्यानंतर नांदेडवरुन खास आलेल्या श्री. शास्त्री यांनी बेगम अख्तर नी महफिल मधे गायलेल्या गजला, ठुमरी, दादरा याचे ध्वनीमुद्रण ऐकवले, तोबा तोबा, कयामत ही कयामत.




श्री. शास्त्री यांनी हा कार्यक्रम मस्तपैकी सादर केला. बेगम अख्तर यांच्या जीवनाविषयी, गायकी विषयी फार मोलाची माहीती त्यांनी सांगीतली, आयुष्यभर बेगम अख्तर गज़ल गात राहील्या , आपल्या तब्बेतीकडे दुर्लक्ष करत तबीयतीनी गात राहील्या, आख़ीर मौत सुद्धा त्यांना गज़ला गातांना आली, अहमदाबाद मधे शेवटची गज़ल गाता गाता छातीत एक जबरदस्त कळ आली, गाणे कसेबसे पुरे केले, रात्री दोन वाजता त्यांना हॉस्पीटल मधे नेले, तीन दिवसाच्या अपयेशी झुंजीनंतर त्या अल्लाला प्याऱ्या झाल्या आणि गजल पोरकी झाली. गजल नी आता गायचे कोण्याच्या ह्रुदयातुन ? बॅलीस्टर अब्बासी यांच्याशी निकाह झाल्यानंतर जवळजवळ सात बर्षे त्यांना त्यांच्या पतीने व पतीच्या घरच्याने गाण्याची बंदी केली होती, त्यातच त्यांचे गरोदरपणात मुल गेले, आईचे निधन झाले, खचुन गेलेल्या अख्तरीबाईंची दया येवुन अखेर त्यांच्या पतीने त्यांना गाण्याची परवानगी दिली. खर म्हणजे त्याच अब्बासींच्या मागे लग्नासाठी लागल्या होत्या, त्यासाठी आपले गाणे पण सोडायला तया होत्या. अब्बासी तयार नव्हते . एके दिवशी अब्बासींनी मैफीलीत अख्तरी फैझाबादींना " कोयलीया मत करो कलेज़वा लागी कट्यार " गातांना ऐकले , मग काय ? कट्यार काळजात घुसली. अख्तरी फैझाबादी मग बेगम अख्तर झाल्या.

अख्तरी फैझाबादींनी गजल रंगमंचाबर गज़ल गाण्याची संधी अकस्मात मिळाली. त्या शास्त्रीय संगीत शिकत होत्या, पण त्यात त्यांचे मन नव्ह्ते, त्यांची जान अडकली होती ती गज़लेत. कलकत्तामधे एका कार्यक्रमात मुख्य कलावंत येण्यास फार विलंब झाला होता, चिडलेल्या श्रोत्यांना शांत करण्यासाठी संयोजकांनी अख्तरी फैझाबादींना रंगमंचावर धाडले, रागरंग ओळखुन त्यांनी ख्याल गाण्या ऐवजी सरळ गज़ल गाण्यास सुरवात केली , ऐकणारे बेभान झाले असे कधीही ऐकले नव्हते, फर्माइशी वर फर्माइशी होवु लागल्या , पहील्याच कार्यक्रमात त्यांनी जग काबीज केले.

दोन तास वीज गेलेली होती, साडेसहा वाजता सुरु होणारा कायक्रम जवळजवळ साडे आठ , पावणे नऊ वाजता सुरु झाला. पण बेगम अख्तर ना ऐकायल्या आलेल्यांपैकी कोणीही मागे हटले नाही, दोन तास बिजलीची प्रतीक्षा करीत सर्व जण शांतपणे खाली प्रांगणात ताटकळत उभे होते, धन्य त्या बेगम अख्तर व धन्य ते श्रोते. महफिलाचा शेवट अख्तर बाईंनी गायलेल्या भैरवीनी झाला.

०६/०६/०७ रोजी पु.ल.देशपांडे महाराष्ट कला अकादमीच्या "स्वरालय" उपक्रमत सायंकाळी ६.३० वाजता बेगम अख्तर याच्या खुल्या मैफिलीचे ध्वनीमुद्रण ऐकवले गेले. Thanks to Indian Records collector's Society.
रात्री बाराच्या सुमारास घरी पोहोचलो. बायकोनी मौनराग ऐकवला, साथीला ताल धरायला भांडी संगीत होतेच.

जब हुआ ज़िक्र ज़माने मे मुहब्ब्तका "शकील"
मुझको अपने दिले नाकाम पे रोना आया.

Tuesday, June 05, 2007

गिटार वादन - रितोम सरकार - कोलकता - कल के कलाकार संमेलन

यालाच लोकशाही म्हणतात का रे भाउ ?

समाजातील काही मुठभर लोक आपल्या मागण्यांसाठी संपुर्ण समाजाला, शासनाला वेठीस धरतात, राष्टीय मालमत्तेचे नासधुस करत प्रचंड प्रमाणात नुकसान करतात, रस्त्ते, रेल्वे बंद पाडतात याच्या खेळात पराकोटीची वित्त हानी होते, प्राणहानी होते, हे सारे घडत असताना शासन हतबल होत त्यांच्याशी बोलणी करत रहाते.

यालाच लोकशाही म्हणतात का रे भाउ ?

मल्का-ए-ग़ज़ल बेगम अख्तर याच्या खुल्या मैफिलीचे ध्वनीमुद्रण

बेगम अख्तर यांच्या हळव्या, ह्रुदयाला भीडणाऱ्या सुरांत डुबुन जायचे असेल, मैफिलीत पुन्हा भान हरपुन समरस व्हायचे असेल तर ०६/०६/०७ रोजी पु.ल.देशपांडे महाराष्ट कला अकादमीच्या "स्वरालय" उपक्रमात सायंकाळी ६.३० वाजता बेगम अख्तर याच्या खुल्या मैफिलीचे ध्वनीमुद्रण रविद्र नाट्य्मंदीर, प्रभादेवी येथे ऐकवले जाणार आहे , त्यास जाण्यावाचुन पर्याय नाही.

ईसी बात पर हो जाये

वो जो हम में तुम में क़रार था तुम्हें याद हो कि न याद हो
वोही या’नी वादा निबाह का तुम्हें याद हो कि न याद हो
वो नए गिले वो शिकायते वो मजे मजे की हिकायते
वो हर एक बात पे रुठना तुम्हें याद हो कि ना याद हो
कभी हम में तुम मे भी चाह थी कभी हमसे तुमसे भी राह थी
कभी हम भी तुम भी थे आशना तुम्हे याद हो की ना याद हो
सुनो जिक्र है कई साल का की किया जो आपने वादा था
सो निबाहने का तो जिक्र क्या तुम्हे याद हो कि ना याद हो
जिसे आप गिनते थे आशना जिसे आप केहते थे बाव़फा
मै वोही हूं "मूमिने’ मुबतिला तुम्हें याद हो कि न याद हो.

’मूमिन "

02:03:04:05/06/07

आजची तारीख ०५/०६/०७. पहाटे किंवा दुपारी २ वाजुन ३ मिनट व ४ सेकंदाला घड्याळ दाखवत होते
02:03:04:05/06/07

Monday, June 04, 2007

पैचान कोन




हा खाद्यपदार्थ कोणता ?


भाबडेपणा म्हणजे काय रे भाऊ ?

भाबडेपणा म्हणजे काय रे भाऊ ? वेताळाने विक्रमला विचारले, माझ्या प्रश्नाचे समाधानकारक उत्तर दे नाहीतर परीणाम तुला ठावुक आहे.

बा वेताळा, याचे उत्तर सोपे आहे. वर्तमानपत्रात , थोरामोठयांच्या सुरस, अर्थपुर्ण, अरेबियन नाईट्स मधे शोभतील अश्या कथा वाचुन, मग आता या लोकांची चौकशी होईल, गैरव्यवहार आढळल्यास कारवाई होईल, अफाट संपत्ती, जमीनी सरकारजमा होईल, नदीखोऱ्यात डुबलेले प्रकल्प त्याचा योग्य तो विनीयोग करुन वर काढण्यात येतील , जमीनी मुळच्या खरोखरीच्या शेतकऱ्यांना परत मिळतील , योग्य तो न्याय केला जाईल आदी भ्रामक कल्पना, सर्वसामान्य माणुस खोट्या आशेपोटी उराशी बाळगतो, समजले का वेताळा भाबडेपणा भाबडेपणा म्हणतात तो हाच की रे.

अरे विक्रमा उगीचच हवेत बोलु नकोस. नीट काय ते सांग.

वेताळा हल्ली वर्तमानपत्र वाचणे सोडुन दिलेले तर नाहीस ना ? कालचाच लोकसत्ता घे. सर्व लेख, बातम्या वाच, आपसुकच कळेल.

विक्रमा तु बोललास आणि हा मी चाललो.

आणि वेताळ उडुन जावुन परत आपल्या झाडावर लटकु लागला, सर्व काही दोन दिवसात विसरुन जाण्यासाठी. ?

BreadTalk at Inorbit Mall, Link Road, Madad



Khul ja Sim Sim and the caves, full of bakery products, pastries, and what not ? , were opened for this Alibaba.
How long am I going to be satisfy with the products from Gallords, Yazdani Bakery and City Bakery ? The world has drastically changed and moved ahead. I have to change accordingly if I wish not be be left out.
Yesterday I have discovered great shop for bakery products, of International level and standard called BreadTalk at Inorbit Mall and and another, not so good as BreadTalk, still, named as "Bakery" at Hypercity, at Link Road, Malad.
As usual, my pockets were empty. Better try next time.

Saturday, June 02, 2007

आज मेरे पास बंगला है, गाडी है, दौलत है और मा (धरती मा ) भी है

बलराज सहानींचा "दो बिघा" हा काळजाला घरे पाडणारा चित्रपट आज आठवला, कारण काय तर तिन बिघा. उत्तर प्रदेशातील न्यायालयाने दिलेल्या निकालामुळे सुपरस्टार अमिताभ बच्चन यांना पुणे जिल्ह्यात खरेदी केलेल्या जमिनीवरही पाणी सोडावे लागण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे. पवना धरणालगतच्या पाले गावामध्ये अमिताभ बच्चन यांनी एकूण वीस एकर जागा खरेदी केली होती.शेतकरी नसणाऱ्या कोणालाही शेतजमीन खरेदी करता येत नाही, हा त्यातील प्रमुख आक्षेप होता. ........- सकाळ
पवनाकाठचा धोंडी" ही गो.नी.दा. ची कादंबरी याद असेलच. काळ बदलला, आधुनीक काळात धोंडीची जागा बिग बी घेतली, गंगामैयाकी कसम, मै पहलेसे ही खानदानी किसान ही हूं ! वैसे देखा जाये तो वो दौलतपुर आहेना यु. पी. त, आपला जिलाहा बाराबंकी, हा बराबर, आमी मुळचे तेथेलेच, पोटापाण्याच्या मागे मागे लागुन फिरत फिरत येथे आलो , काय पण ही जागा आहे, हा पवना लेक, यो तिकोना, पल्याड तुंगी, , तबीयत खुश झाली, आता कुठेच जायचे नाही, झाली भटकंती ती बास तेवढीच. आता येथेच डेरा टाकायचा, या लाल, तांबडया मातीत कष्ट करुन, घाम गाळुन शेती करायची, चार पैसे कमवायचे, मुलाबाळांची सोय करायची, विचार आता पक्काच. मित्रांनी अलीशान मोटारगाडया भेट दिल्याच आहेत, मुंबई- लोनावळातर आता तासाभरावर, पहाटे उठावे, शेतावर जावे, ढवळ्यापवळ्याची जोडी नांगराला जुंपावी की जमीन नांगरता नांगरता, मुलाने पाठोपाठ त्यात बियाणे पेरीत यावे, बायकोनी मस्त पैकी भजन म्हणावे " आधी बीज येकले, अंकुरले, आधी बीज येकले ", दुपार व्हावी , नव्या सुनबाईंनी झुणका, भाकर, मिरचीचा ठेचा, मटकेका दह्याचा फक्क्ड बेत आखत, शेतावर जेवण घेवुन यावे, बांधावरी आम के पेड के नीचे बसुन खाना हाणावा, दुपारला मस्त पैकी ताणुन द्यायचे.
पडद्यावर नव्हे तर प्रत्यक्षात हे द्रुश्य, सुरक्षारक्षकानी सांगीतल्या प्रमाणे कुंपणापलीकडे उभे राहुन, आपल्या वडिलोपार्जित जमीनीचा कित्येक वर्षे सांभाळलेला तुकडा, परस्पर विकला गेल्याचे दुःख आणि चिंता चेहऱ्यावर उमटवत , याच मातीत गाडल्या गेलेल्या कुलदैवताला, देवीला गाऱ्हाणे घालत , मुळचा खराखुरा शेतकरी हताश होत पहात असेल.
संदर्भ - बातमी, लोकसता, १५/०५/०७

कल के कलाकारांना काट्याची टक्कर बाल कलाकारांकडुन

Friday, June 01, 2007

तरुण खासदार श्री. मिलींद देवरा He is Different.


तरुण खासदार श्री. मिलींद देवरा, यांनी दक्षिण मुंबईतील घरगल्ल्यांच्या समस्येवर कायमस्वरुपी उपाययोजना करण्यास निवडुन आल्यानंतर पुढाकार घेवुन आपल्या विकास निधीतुन अनेक ठिकाणी घरगल्या नुतनीकरण व सांडपाण्याचे पाईप दुरुस्तीची कामे सुरु केली. मी रहात असलेल्या गल्लीमधे व मागच्या तसेच बाजुच्या गल्लीत ही त्यांनी आपल्या निधीतुन संपुर्ण घरगल्ल्या दुरुस्त केल्या आणि नरकातुन आमची मुक्तता केली. कारण कितीही त्या साफ केल्यातरी त्यांची अवस्था वाईटच होती. आज अनौपचारीक समारंभात ते आमच्या गल्लीत आले होते.

आमच्या अडीअडचणी सोडवणारे असे खासदार आम्हाला लाभले हे आमचे भाग्य.

पण एक गोष्ट मला चांगलीच खटकली. काही अतीउत्साही कार्यकर्त्यांनी त्यांचे स्वागत करण्यासाठी ढोलताशा ठेवला होता, हा खासदारांना खुश करण्याचा की त्यांचे आगमन आता तुमच्या विभागात झाले आहे हे लोकांना कानठळ्या बसत सांगण्याचा एक केवीलवाणा प्रयास. आपण कोणत्या युगात वावरत आहे याचे ही भान नसावे ? पुढे बेंडबाज्या, मागे खासदार आणि आमची वरात.( मला नाही वाटत त्यांना हा सारा तमाशा आवडत असावा. He is different. अर्थात हे माझे वैयत्तीक मत आहे). आम्हाला खासदारांना काही सांगायचे होते, त्यांच्या पर्यंत पोचायचे होते, तर हा सावळागोंधळ. आज या दोन गल्लीतील नागरीकांनी लोकसहभागातुन आपला संपुर्ण विभाग स्वताःच्या कष्टाने, अंगमेहनतीतुन, स्वखर्चाने पाच वर्षापुर्वी केवळ नुसताच स्वच्छच केला नाही तर गेली पाच वर्षे तो तसाच सांभाळला आहे. मी अभिमानाने सांगु शकतो की आज साऱ्या मुंबई समोर आम्ही एक आदर्श ठेवला आहे. आज आमचा पॅटन ईतरत्र राबवला तर दक्षिण मुंबई स्वच्छ होण्यास वेळ लागणार नाही. हे सारे खासदारांच्या निदर्शनास आणायचे होते. पण सारे राहुन गेले.
कधीकधी वाटते , काय चाललय ? आज २१ व्या शतकात देखील आपण मुलभुत प्रश्न सोडवण्यात धन्यता मानत आहोत ?