विक्रमा, तुझे हे हाल मला बघवत नाहीरे. मी हा असा सर्वात उंच फांदीला लटकलेलो, प्रत्येक वेळी मला न्यायला तुला वर पर्यंत चढुन यायला लागते. बस ठरले. मी या झाडावरच्या फांदीपर्यंत रस्ता बांधायचा ठरवला आहे, वेताळाने जाहीर केले.
विक्रम अवाक . अरे वेताळा हे कसे काय शक्य आहे ? झाडाचा, निसर्गाचा, पर्यवरणाचा काही विचार , काळजी, तुला आहे ही नाही ? या झाडावर रहाणारे हे असंख्य पक्षी जातील कुठे ? त्यांची घरटि तुटतील ना ? एक जिवनचक्रच नष्ट होईल ना. आज मी वरपर्यंत आलो, मग हा राजरस्ताच होईल ना. या झाडालाच धोका निर्माण झाला तर तुझे काय ? तु जाशील कोठे ?
विक्रमा मी हे एकदा ठरवले म्हणजे ठरवले, आता यात बदल नाही. जर चीन थेट माउंट एव्हरेस्टवर पर्यावरणाचा विचार न करता ’हाय" वे बांधत असेल तर मी का हा झाडावर रस्ता बांधु नये ?
हे मात्र खर वेताळा, या पुढे केवळ हाच रस्ता नव्हे तर माझ्या साम्राज्यातील सर्व रस्ते, उड्डाणपुल, ईमारती बांधण्याची कामे मी फक्त चीनला देणार आहे. फक्त चार महिन्यात हा रस्ता चीन बांधुन पुरा करणार आहेत म्हणे. नाहीतर आपल्या कडचे कंत्राकदार, चार चार वर्षे झाली तरी एक साधा सरळसोट रस्ता बांधुन पुरा करता येत नाही, नवीन रस्ता तर सोड, दुरुस्ती साठी खोदलेला रस्ता दुरुस्त करायलाच चार चार वर्षे घेतात. आता बोल ?
अपुर्ण.
2 comments:
खूप बोलकं स्फुट आहे हे.
आहे ती निसर्ग संपदा लवकरात लवकर संपवून टाकावी एकदाची!!!!!
apratim kaam aahe Kishori Amonkarancha....Internet var downloadable form madhe available aahe ka?
Post a Comment