तरुण खासदार श्री. मिलींद देवरा, यांनी दक्षिण मुंबईतील घरगल्ल्यांच्या समस्येवर कायमस्वरुपी उपाययोजना करण्यास निवडुन आल्यानंतर पुढाकार घेवुन आपल्या विकास निधीतुन अनेक ठिकाणी घरगल्या नुतनीकरण व सांडपाण्याचे पाईप दुरुस्तीची कामे सुरु केली. मी रहात असलेल्या गल्लीमधे व मागच्या तसेच बाजुच्या गल्लीत ही त्यांनी आपल्या निधीतुन संपुर्ण घरगल्ल्या दुरुस्त केल्या आणि नरकातुन आमची मुक्तता केली. कारण कितीही त्या साफ केल्यातरी त्यांची अवस्था वाईटच होती. आज अनौपचारीक समारंभात ते आमच्या गल्लीत आले होते.
आमच्या अडीअडचणी सोडवणारे असे खासदार आम्हाला लाभले हे आमचे भाग्य.
पण एक गोष्ट मला चांगलीच खटकली. काही अतीउत्साही कार्यकर्त्यांनी त्यांचे स्वागत करण्यासाठी ढोलताशा ठेवला होता, हा खासदारांना खुश करण्याचा की त्यांचे आगमन आता तुमच्या विभागात झाले आहे हे लोकांना कानठळ्या बसत सांगण्याचा एक केवीलवाणा प्रयास. आपण कोणत्या युगात वावरत आहे याचे ही भान नसावे ? पुढे बेंडबाज्या, मागे खासदार आणि आमची वरात.( मला नाही वाटत त्यांना हा सारा तमाशा आवडत असावा. He is different. अर्थात हे माझे वैयत्तीक मत आहे). आम्हाला खासदारांना काही सांगायचे होते, त्यांच्या पर्यंत पोचायचे होते, तर हा सावळागोंधळ. आज या दोन गल्लीतील नागरीकांनी लोकसहभागातुन आपला संपुर्ण विभाग स्वताःच्या कष्टाने, अंगमेहनतीतुन, स्वखर्चाने पाच वर्षापुर्वी केवळ नुसताच स्वच्छच केला नाही तर गेली पाच वर्षे तो तसाच सांभाळला आहे. मी अभिमानाने सांगु शकतो की आज साऱ्या मुंबई समोर आम्ही एक आदर्श ठेवला आहे. आज आमचा पॅटन ईतरत्र राबवला तर दक्षिण मुंबई स्वच्छ होण्यास वेळ लागणार नाही. हे सारे खासदारांच्या निदर्शनास आणायचे होते. पण सारे राहुन गेले.
कधीकधी वाटते , काय चाललय ? आज २१ व्या शतकात देखील आपण मुलभुत प्रश्न सोडवण्यात धन्यता मानत आहोत ?
2 comments:
तुमचे मुद्दे बरोबर आहेत. आपण घोळ घालण्यात पटाईत. खासदार आले आहेत तर त्यांच्याशी चर्चा करा समस्यांवर- ताशे कसले वाजवाताय?
आज पर्यंत अनेक मान्यवरंनी आमच्या गल्लीला भेट दिली, पण असा प्रकार केव्हाच घडला नाही. हा सारा भोवतालच्या खुशमस्कऱ्यांचा प्रताप. आमदार, खासदारांना मिळणारा विकासकामासाठी निधी शेवटी हा सर्व पैसा आम्ही कर भरतो त्यातुनच मिळालेला असतो. गटारे , घरगल्यांचे नुतनीकरण केल्यानंतर त्याचा उदघाट्न समारंभ ? फिती कापणे ? त्याचा हा असा गाजावाजा, गजर करत, ध्वनीप्रदुषण वाढवत जगाला दाखवुन देण्याचा अट्टाहास ? मी या वादकांना आमच्या गल्लीत आल्यावर वाद्ये वाजवण्यास मनाई केली होती, पण शेवटी ते त्यांचे काम करत होते.
नव्या पिढीच्या खासदारांच्या चेहऱ्यावर मला नाराजी दिसत होती, ही गोष्ट ते enjoy करत नसावेत, असे जर असेल तर त्यांनी स्पष्ट्पणे सर्व तमाश्याला बंद करायला हवे.
Post a Comment