सौ. मंजुषा कुलकर्णी-पाटील या आजच्या तरुण पिढीतील एक अत्यंत प्रतिभाशाली, गुणवंत गायिका. या सर्व कलावंताचे स्वर्गीय गाणे ऐकताना मधेच कधीतरी एक असा क्षण येतो की आपण क्षणस्थ होवुन जातो, मन शांत होत जाते, याच साठी केवळ याच अनुभुतीसाठी ऋषीमुनी रानात तप करायला जात असावेत का?
1 comment:
"त्या गाताना नेहमीच श्रोत्यांबरोबर स्वःताही गाण्याचा आनंद उपभोगत असतात असे मला वाटते. कार्यक्रम संपल्यानंतर कलावंताच्या चेहऱ्यावरचे तुप्तीचे भाव काही औरच असतात नाही का."
हा अभिप्राय फार छान आहे. कलाकाराला स्वतःला आनंद मिळत असेल तरच श्रोत्यांना आनंद मिळू शकतो. कारण काय असेल ते असो, बरेचदा कलाकार हा आनंद चेहेर्यावर दिसू देत नाही. काही काही कलाकार तर अगदीच निर्विकारपणे गातात/वाजवतात. पण मंजुषा कुठलीही भीड नं बाळगता स्वाभाविक हालचाली आणि भाव प्रकट करताहेत हे बघून छान वाटलं.
Post a Comment