भाबडेपणा म्हणजे काय रे भाऊ ? वेताळाने विक्रमला विचारले, माझ्या प्रश्नाचे समाधानकारक उत्तर दे नाहीतर परीणाम तुला ठावुक आहे.
बा वेताळा, याचे उत्तर सोपे आहे. वर्तमानपत्रात , थोरामोठयांच्या सुरस, अर्थपुर्ण, अरेबियन नाईट्स मधे शोभतील अश्या कथा वाचुन, मग आता या लोकांची चौकशी होईल, गैरव्यवहार आढळल्यास कारवाई होईल, अफाट संपत्ती, जमीनी सरकारजमा होईल, नदीखोऱ्यात डुबलेले प्रकल्प त्याचा योग्य तो विनीयोग करुन वर काढण्यात येतील , जमीनी मुळच्या खरोखरीच्या शेतकऱ्यांना परत मिळतील , योग्य तो न्याय केला जाईल आदी भ्रामक कल्पना, सर्वसामान्य माणुस खोट्या आशेपोटी उराशी बाळगतो, समजले का वेताळा भाबडेपणा भाबडेपणा म्हणतात तो हाच की रे.
अरे विक्रमा उगीचच हवेत बोलु नकोस. नीट काय ते सांग.
वेताळा हल्ली वर्तमानपत्र वाचणे सोडुन दिलेले तर नाहीस ना ? कालचाच लोकसत्ता घे. सर्व लेख, बातम्या वाच, आपसुकच कळेल.
विक्रमा तु बोललास आणि हा मी चाललो.
आणि वेताळ उडुन जावुन परत आपल्या झाडावर लटकु लागला, सर्व काही दोन दिवसात विसरुन जाण्यासाठी. ?
1 comment:
हा हा हा! झकास! :)
Post a Comment