Sunday, June 10, 2007

पैसा अडवा पैसा जिरवा

"पैसा अडवा पैसा जिरवा" , "खोऱ्याखोऱ्याने पैसा ओढा" "टेंडर घ्या टेंडर द्या", "सिंचंन करा संचन करा" , आदी लोकल्याणकारक योजना "जलसंधारण क्रांती" आणण्यासाठी कृष्णा खोरे विकास प्रकल्पात राबवल्या जात असतांना आपल्या लोकशाहीची आधारस्तंभ असलेली वर्तमानपत्रे काय झोपली होती काय ?


तेव्हाच याची दखल का घेतली गेली नाही ? बैल गेला आणि झोपा केला. त्याचवेळी सविस्तर माहीती दिली असती तर बरे झाले असते.

चांगली विकासाची गंगा अंगणात आली होती, अवतरली होती, तुम्ही आम्ही सर्वच मराठी, आपणही त्यात डुबकी मारली असती की. कृष्णा खोऱ्यातील वांगी चवीला फार फार चविष्ट, मस्त पैकी वांग्याचे भरीतावर ताव मारला असता की.

No comments: