आज सकाळी उठायला अंमळ उशीरच झाला. सकाळीच चक्क सिल्कची भरजारी साडी नेसलेल्या, अलंकारानी मढलेल्या, अनोळखी बाईने बदामपीस्तानी भरलेला मसाला दुधाचा कप पुढे केला. मग माझे चरणस्पर्श करुन चरणधुल आपल्या कपाळी लावली. प्राणनाथा, सुप्रभात, मसाला दुध पिताना ! क्षणभर मला कळेनासे झाले ही परकी बाई माझ्या घरात करतेय काय ? आणि वरती हा सर्व सात्वीकभाव ?
मी विचारले त्ताई आपण कोण ? आणि माझी बायको कोठे आहे ? तशी ती खुदकन गालातल्या गालात हसु लागली. अहो (?) असे काय करता, हि कसली मेली थट्टा ? मला ओळखले नाहीस का हो ? आपल्या अर्धांगीनीशी वागण्याची ही कोणती पद्धत ? मुलाला बोलवुन विचारले, अरे तुझी आई कोठे ? तर त्यानी त्याच परक्याबाई कडे बोट दाखवले. हि काय माझी आई. माझा संभ्रम आणखीन वाढला, माझे आईवडील सर्वजण मला वेडयात काढु लागले. या ग्रुहस्थाला आपली बायकोपण ओळखता येत नाही ? याला झाले तरी काय आहे ?
हे रहस्य काय ?
मग माझी दया येवुन त्या मॅडमनी मला पडलेल्या कोडयाचे उकल केले.
अरे, मोरु , आयुष्यभर, स्म्रुती इराणीचा "तुलशी" चा चेहरा एका रात्रीत बदलुन तिच्या जागी गौतमी गाडगीळ येते आणि मालीकेंनी खुळावलेले सबंध बिनडोक जग तिला तुलशी म्हणुन निमुटपणे स्विकारते , तसेच "देश मे निकला होगा चांद" मधे पम्मीचे नवरे प्लास्टीक सर्जरी करुन तिच्याबरोबर आट्यापाट्याचा खेळ खेळत रहातात, ( मधेच तो हा असतो, आणि हा तो, मग तो तोच असतो, आणि हा हाच असे काहीतरी ), आणि हे सारे पहाताना कोणाच्याही मनात एकदाहि शंका येवु नये ही हा काय पागलपणा आहे याची ?
असे असता मग मी माझा चेहरा बदलला तर काय झाले ?
- स्प्रुर्ती तंबी दुराई याच्या "दोन फुल एक हाफ" या सदरातील लेखापासुन.

3 comments:
mast!!
sahi!!!
kay bindok lok ahet he daily soap vale
हाहाहाहा!!! मजा आली वाचून
Post a Comment