Showing posts with label RAHUL DESHPANDE. Show all posts
Showing posts with label RAHUL DESHPANDE. Show all posts

Sunday, August 12, 2007

श्री. राहुल देशपांडे


यु खुदा के लीये छीनो ना मेरे होशो हवास । ऐसे गाया ना करो की ख़ुमार आ जाये ॥ (मुळ - ऐसे नज़रोसे ना देखो की ख़ुमार आ जाये). आज दिवली अमावस्या ,गटारी. तुडुंब मदिरापान करुन गटारात लोळायचा दिवस. सकाळी सकाळी मला नशा चढली आहे. तरी पण मी हे पुर्ण शुद्धीत राहुन लिहीत आहे.

कारण ही नशा सुरेची नाही तर सुरांची आहे. तरुण पिढीतील अग्रणीय गायक श्री. राहुल देशपांडेचे गाणे ऐकुन आलेली ही झिंग आहे.

आज मुंबईत कर्नाटक संघात खयाल ट्र्‌स्ट नी पं.कॄष्णराव शंकर पंडीत यांच्या स्मॄती उत्सव निमीत्ते आयोजील्या शास्त्रीय संगीताच्या दोन दिवशीय महोत्सवात श्री. राहुल देशपांडे सर्व रसीकांना राग रामकली, नटभैरव, चीज सावरे आजय्यो, व निर्गुणी भजन गावुन तॄप्त करुन राहीले.

(Video upload pending )

लिहीणार - राहुलजींचा चाहता.

- ज्याला थोडे तरी गाणे कळायला हवे होते.

Saturday, April 28, 2007

राहुल देशपांडे आणि नांदी

सद्ध्या मी राहुलमय झालो आहे. काल कार्यक्रमाच्या सुरवातीस गायलेली ही नांदी. उद्याचा इतिहास आज रचण्याऱ्या, वर्तमानकाळातील तरुण पिढीचे हे लोभिवणारे रुप. अजुन किती वर्षे आपण गतकाळात रमत, उसासे टाकत गेले ते दिन गेले, करत बसणार आहोत ?

श्री. राहुल देशपांडें व वसंतोत्सव


शिवधनुष्य आपल्या तरुण खांद्यावर समर्थपणे उचलण्याचा संकल्प श्री. राहुल देशपांडेंनी योजीला आहे. पुण्याच्या सवाई गंधर्व महोत्सवाच्या धर्तीवर आधारीत "वसंतोत्सव" नामक संगीत समारोह मुबंईत १९ व २० मे रोजी षण्मुखानंद सभाग्रुहात आयोजीत केला गेला आहे. ह्यासाठी त्यांना हवी आहे ती आपली साथ. डॉ. पं. वसंतराव देशपांडेंच्या गायकीचे सर्वांगीण दर्शन घडविण्याचा हा पहिलाच प्रयास आहे, त्या मागची कारणमीमांसा स्पष्ट करतानां राहुलजी म्हणाले की दुर्देवानी पं.वसंतरावांवर "कट्यार काळजात घुसली" नंतर ते नाट्यसंगीत गायक आहेत हा शिक्का बसला, हे पुसण्यासाठी व त्यांची पुरती ओळख करु देण्यासाठी असा महोत्सव दरवर्षी होणार आहे. आता डॉ.वसंतराव देशपांडे प्रतिष्ठानची धुरा देखिल राहुलजींनी आता आपल्यावर घेतली आहे. तरुण वयातील राहुलजींचे खरच जेवढे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे.
काल रात्री मुबंईत प्रथमच राहुलजींचा " शतःजन्म शोधिताना, संगीत नाटकाची वाटचाल" हा अप्रतीम कार्यक्रम झाला. पण जवळजवळ १२५ वर्षाचा इतिहास उलगडुन सांगण्यास २-३ तासाचा अवधि तसा अपुराच आहे. गोडी अपुर्णतेतील चाखत, तृप्त मनाने गिरगावकर मध्यरात्री घरी परतले ते पुढच्या १९-२० मे रोजी होणाऱ्या "वसंतोत्सव" वे वेध लावुन.
पण काल राहुलजींचे मनोगत ऐकताना मला असे जाणवले, खर म्हणजे माझा हा जाणवुन घेण्याचा अधिकार नाही , माझ्या मर्यादेचे उल्लघंन करण्याचे धाडस करत मला असे म्हणावसे वाटते की श्री. राहुलजी हे उत्तम हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत गाणारे गायक आहेत, त्यांच्यावरही हा "शिक्का" बसु नये. सध्या ते पं. मुकुल शिवपुत्रकडे गाणे शिकत आहेत.
पुढील वाटचालीसाठी राहुलजींना शुभेच्छा व त्यांना ह्या नविन उपक्रमात भरभरुन यश मिळो ही परमेश्वरापाशी प्रार्थना.

श्री. राहुल देशपांडे- लावीली थंड उटी वाळ्याची

लावीली थंड उटी वाळ्याची, संगीत शाकुंतल मधले हे गीत तसे शृंगारीक अंगाचे, १२५ वर्षापुर्वीचे, श्री. राहुल देशपांडेनी नांदी नंतर गायला सुरवात केली. माझ्या आवडते हे गाणे. बहोत अच्छे.

Friday, April 27, 2007

श्री. राहुल देशपांडे- दादा ते आले ते गायले आणि त्यांनी मन जिंकले


चारपाच वर्षापुर्वीची गोष्ट, इंदौरात दिपावलीत, पाडव्याच्या भल्यापहाटे आम्ही समस्त मराठी समाज, नववर्षाचा आनंद द्विगुणीत करण्यासाठी रवींन्द्र नाट्यगृहात जमलो होतो. प्रयोजन होते, स्वानंद आयोजीत तरुण, प्रतिभाशाली गायक श्री. राहुल देशपांडेचा नाट्यसंगीतावर आधारीत कार्यक्रम. पडदा उघडण्याआधी, पडद्याआड जुन्याकाळाच्या प्रथेनुसार नांदी सुरु झाली. प. वसंतराव देशपांडेंची कैसट लावली होती. हळूहळू पडदा उघडू लागला, सर्वजण आर्श्चयचकीत होवुन रंगमंचावरील तो अविष्कार मंत्रमुघ्ध अवस्थेत ऐकत भावनावश होत होते. श्री. राहुल देशपांडे नांदी गात होते. ते आले त्यांनी गायला सुरवात केली आणि त्यांनी जिंकले, इंदौर काबीज केले. टाळ्याच्या गजरात त्यांना दाद देणे सुरु झाले. वा, वा, बढिया, क्या बात है? पहिल्याच दर्शनाने रसीक नादवला, खुळवला, श्री. राहुल देशपांडेच्या प्रेमात पडला. नांदीनंतर श्री. राहुल देशपांडेनी जवळजवळ तीन, चार का पाच ? देव जाणे, येथे वेळेचे भान होते कोणाला ? (फक्त्त मध्यांतरात पोह्याचा बेत होत त्यापुरतेच आम्ही होशोहवासात होतो) (या होशोहवास शब्दावरुन "युं खुदाके लिये छीनो ना मेरे होशोहवास । ऐसे नज़रोसे ना देखो खु़मार आ जाये ॥ - नुरज़हान), सुरवातीच्या काळापासुन अगदी अलीकडच्या काळातील नाट्यगीते ऐकवली. तेथे सर्व वर्तमानपत्रानी त्यांना कार्यक्रमाआधी व नंतर अगदी डोक्यावर घेतले होते, भरभरुन राहुलजींवर लेख लिहिले जात होते ? ( आपल्या मुंवई, पुण्यात ही गोष्ट मोठी दुर्मीळ ) . जोहर मायबाप जोहार.
ह्या कार्यक्रमाआधी आदल्या दिवशी संध्याकाळी ते डॉ. शशीकांत तांबे यांच्या घरी गाणार असल्याचे वर्तमानपत्रात वाचुन मी डॉ. तांबेच्या घरी पण गेलो होतो. पण काही कारणास्तव श्री. राहुल देशपांडेचे ते गाणे रद्द झाले. ( मुख्य कार्यक्रमापुर्वी ते कसे दुसरीकडे गाणार ? आयोजन करणाऱ्यांना हे समजायला हवे होते, मग डॉ. तांबेच गायले) . त्या नंतर मी श्री. राहुल देशपांडेचा मुबंईतील कार्यक्रम सहसा चुकवत नाही. दोन वर्षापुर्वी श्री. राहुल देशपांडेचा लोकमान्य सभाग्रुह, विलेपार्ले, येथे शास्त्रीय संगीताचा झालेला कार्यक्रमपण मला चांगलाच आठवतो.
हे सारे आज आठवण्याचे कारण काय तर आज बस मधुन जाताना मी अचानक पं. वसंतराव देशपांडेचे नाव लिहीलेला फलक वाचला. तो वाचण्यासाठी बस मधुन उतरुन पहीले तर काय उद्या रात्री साडेआठ वाजता साहित्य संघात श्री. राहुल देशपांडेचा नाट्यसंगीताचा कार्यक्रम आहे. मला जायलाच हवे.
ह्या तुलनेवरुन.
मध्यंतरी मी मुकुल शिवपुत्र यांच्या कार्यक्रमाला गेलो होतो, तेव्हा ते " माझ्या सुरवातीला माझे गाणे ऐकल्यानंतर लोक, आम्हाला पं. कुमारजी गंधर्वांची आठवण झाली हे सांगायचे, मग मला ह्या तुलनेचा राग यायचा ,पण आज मलाच माझ्या वडीलांची खुप आठवण येत आहे " अश्या अर्थाचे काहीतरी म्हणाले. त्याच्या स्वरात विशाद होता का ? देव जाणे. खरच ही तुलना कीती अयोग्य असते.
हरीवंशराय बच्चनची एक सुंदर कविता आहे. महान वृक्ष आपल्या खाली वाढणाच्या झाडाझुडपांना बघुन म्हणातो की ही माझ्या छ्त्रछायेत ही किती सुखी आहेत. उन, पावसाचा मारा मी झेलतो, यांना कसलीच तोशीश लागुन देत नाही. झाडेझुडपे म्हणतात हा वृक्ष एकटाच खुप मोठा झाला आहे, वाढ्ला आहे, आणि ह्याने तर आमची वाढ खुंटुन टाकली आहे.
श्री. राहुल देशपांडेंवर श्री, तात्या अभ्यंकरनी त्यांच्या ब्लॉगवर अप्रतिम लेख लिहीलेला आहे.

Sunday, April 08, 2007

पं. मुकुल शिवपुत्र व राहुल देशपांडे

पं. मुकुल शिवपुत्र

राहुल देशपांडे
श्री. मुकुल शिवपुत्र नामक अवलियाचे स्वर्गीय संगीत, गाणे ऎकण्याचे भाग्य कुणा भाग्यवंतालाच लाभत असावे. नशिबाने माझी गणती त्यात होणे आहे. आज सकाळी पुण्यात, गरवारे सभागृहात, कुमार गंधर्व जयन्ति समारोह निमित्ते मुकुल शिवपुत्रांचे गाणे ऎकण्याचा मणिकांचन योग जुळुन आला.
आनंदाने परीसीमा गाठल्यावर त्या क्षणी " बस्स मौत अगर आनी है तो इसी वक्‍त आये " असे भावना व्यक्‍त करतांना म्हणायची पद्धत आहे, मला तर अशी मौत बार बार स्वीकारत जगायला आवडेल.
आज मुकुल शिवपुत्रच्या साथीला तानपुऱ्यावर राहुल देशपांडे होते. राहुलजीचे मी ४-५ वर्षापुर्वी इंदोरला दिवाळीत पाडव्याच्या पहाटे प्रथम ऎकले त्या क्षणापासुन मी त्याच्यावर फिदा झालो आहे. त्यांनी त्यावेळी जवळ जवळ ३-४ तास नाट्यगीते गायली होती. गेल्या वर्षी विलेपार्लेला त्यांचा शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमाला सुद्धा मी गेलो होतो.
ह्या दोघांचा कार्यक्रम मी सहसा चुकवत नाही.

गायनातून शिवपुत्र यांची कुमार गंधर्वांना आदरांजलीपुणे, ता. ८ - युगप्रवर्तक गायक पंडित कुमार गंधर्व यांच्या जयंतीनिमित्त त्यांचे पुत्र, शिष्य आणि प्रतिभावंत गायक पं. मुकुल शिवपुत्र यांच्या गायनाची सकाळची विशेष मैफल आज रंगली. कुमारांच्या अनोख्या बंदिशींचा आनंद तर त्यांनी दिलाच; पण स्वतःच्या एका वेगळ्या शैलीचाही सुरेल प्रत्यय दिला. ........कुमार गंधर्वनिर्मित "धूनउगम' रागांपैकी एक "बिहाडभैरव'ने मुकुल यांनी मैफलीचा प्रारंभ केला. विलंबित त्रितालातील "ये हो रे श्‍याम' आणि त्याला जोडून द्रुत त्रितालातील "बना बनी आयो' ही रचना त्यांनी सादर केली. त्यानंतर "पिलू' रागातील "धूली भरे अती सोभित' हे रसखान यांचे पद त्यांनी गायिले. मध्यंतरानंतर त्यांनी राग "खट'मधील "आयी अंबुवा' ही बंदिश, "देसकार' रागातील कुमाररचित "आ दिलबरा' ही बंदिश पेश केली. "छैलवा न डारो गुलाल' या भैरवी ठुमरीने मुकुल यांनी आपल्या गायनाची सांगता केली. त्यांना सुरेश आचरेकर (तबला), सुरेश फडतरे (हार्मोनिअम), राहुल देशपांडे आणि विनय चित्राव यांनी तानपुऱ्यावर साथ केली.