Tuesday, July 29, 2008

जन्मासिद्ध हक्क


जगाच्या उलटे जाणे हा आमचा जन्मासिद्ध हक्क आहे आणि आम्ही तो बजावणारच। भले मग अपघात का होईना आम्हाला त्याची काय परवा ?

तुलशी बाग़ व जुना बाजार

केवढी ही तोबा गर्दी ? लोक तुलशी बागेत ( आम्ही देखील ) जावुन एवढी काय खरेदी करत असतात ?

Monday, July 28, 2008

घुमढ घुमढ गरज गरज

घुमढ घुमढ गरज गरज बरसन को आयो मेघा

ऐसोही झरन लागे पीया बिन मोरे नैना ।

पुन्हा एकवार सह्याद्रीच्या माथ्यावर टकरा घेवू लागले आहेत मदमस्त पाण्याने भरलेले मेघ , धरतीला तृप्त करण्यासाठी



दिवाडकरांचे बटाटे वडे



कर्जत व दिवाडकरांचे बटाटे वडे हे मुंबई - पुणे ट्रेन प्रवासातले एक अटूट नाते। पण अलीकडे या दिवाडकरांच्या बटाटे वड्याची मजा साफच गेली आहे ।

सज्जड दम - एक पुणेरी पाटी


Wednesday, July 23, 2008

गणेशोत्सवातील पैशाची उधळपट्टी थांबवा

यंदाला मान्सुननी दगा दिला असल्यामुळे आपल्या राज्यात दुष्काळ सदृश्य परिस्थिति निर्माण झालेली असून दिवसेंदिवस काळ कठिण होत चालला आहे। अश्या खडतर वेळी आपण आपले सणवार फार साध्यापणे साजरे करायला हवेत। उधळापट्टी टाळायला हवी ।
आपल्या हौशेखातिर गणेशोत्सवात करोड रुपये अउत्पादक मुल्यासाठी खर्च होतात, या वर्षी आपण हां उत्सव जर का साध्यापणे साजरे केला व हे वाचवलेले पैशे आपल्या दुष्काळग्रस्त बांधवांना मदत म्हणुन पाठवल्यास , आपण खरी देवपूजा केल्यास पुण्य लाभेल ।

Tuesday, July 22, 2008

नौटंकी

संसदेत चाललेली नौटंकी बघुन सारे जग आज आपल्याला हसत असेल ।
नकोत ते लहान सहान पक्ष, व त्यांची थेरे ।
या प्रादेशिक पक्षाच्या कडबोलीच्या प्राश्वभूमिवर आपल्या प्रणाली मधे मुलभुत बदल घडवुन आणण्याची गरज आहे । अमेरिका व इंग्लड प्रमाणे आपल्या कडेही फक्त दोनच राजकीय पक्ष असावेत असे वाटु लागलय।
या सर्व जेष्ठ संसदपटुंना आता पुढल्या निवडणुकीत मत देता कामा नये।
नविन, तरुण खासदारांनी आता यांची जागा घेण्याची वेळ आली आहे।

गंमत जंमत

तर मग राजाभाऊ हे सरकार तरणार तर। एकंदरीत तशी लक्षण कालपासुन दिसायला लागली आहेत नाही का ? आणि काय हो तुम्ही आपल्याच शेपटीचा पाठलाग करणारा कुत्र्याला पाहिले आहेत का ? कसा गोल गोल आपल्याचा जागी फिरत असतो ना ।

Monday, July 21, 2008

आनंद

काय हो राजाभाऊ , राजकारणात पदे मिळाल्याचा आनंद काही और असतो नाही का ?

हो ना ! काही जण हत्ती वरुन साखर काय वाटतात , तर काही जण भर रस्तात दोन्ही कडची वहातुक थांबवुन हजारी फटाक्याच्या माळ्याच्या माळा फोडून साजरे करतात, १५-२० मिनिटे यांचा आनंद लोकांनी डोळे भरून पहावा या हेतूने आणि मग म्हणुन सर्वांनी ताटकळत उभे रहावे ।

परत येवढ्यावर त्यांचे समाधान होत नसते , मग दुसरया दिवशी वाजत गाजत मिरवणुका काढल्या जातात, विभागभर त्यांची पोस्टर्स लावली जातात काय काय म्हणुन ही लोक करत असतात , प्रकाशझोतात रहाण्यासाठी ।

सरकार रहाणार का जाणार ?

काय हो राजाभाऊ , सरकार रहाणार का जाणार हो ?
अहो, आपल्याला काय फरक पडतो काय ? कोणी ही येवो वा जावो, शेवटी या सर्व नाट्यासाठी लागणारा पैसा आपण प्रामाणिक करादात्यानी भरलेल्या करातुन खर्च होत असतो नाही का ?
मुदतपुर्व निवडणुकीच्या खर्च पण आपणच करायचा असतो नाही का ?

Wednesday, July 16, 2008

क्रिकेट आणि कब्बडी

आता लवकरच आषाढ अमावस्या येईल, मग सुरु होईल श्रावण मास. घरोघरी या निम्मीत्ते या सणांसाठीच्या खास रचल्या गेलेल्या व अलिकडच्या काळात विस्म्रुतीत जात चाललेल्या कथेचे कदाचीत वाचन होईल देखील.
एक आटपाट नगरी, मग तिचा राजा, त्याच्या दोन राण्या, एक आवडती व एक नावडती, अश्या अंगाने सुरु झालेल्या कथेचा शेवट मात्र गोड असायचा. प्रत्यक्षात गोड शेवट असता तर.
किंवा
अमावस्येला दिपपुजा झाल्यानंतर पार रात्र झाली की सारे दिवे गावाबाहेर पारावर जमतात, काही तेजस्वी, तर काही मलुल, मग त्यांच्यात चर्चा सुरु होती कोणाघरी कोणी काय खाल्ले याची.
त्यातलाच दोन दिवे भगभगीत तर दुसरा विझायला आलेला.
किंवा
आवडतीच्या घरी लक्ष्मी पाणी भरते तर नावडतीच्या घरी अठरा विश्वे दारीद्र, एक दादीगीरद्यात लोळते, पंचतारांकीत महालात रहाते पण सदा अत्रुप्त,असमाधानी. नावडती बिचार मिठभाकरी खावुन रहाते,आहे त्याच्यात समाधानी . कोणाकडुन काही अपेक्षा नाही, पण कोणी काही दिले तर अव्हेरायचे नाही हे व्रत.
पण,
गंमत म्हणजे दोन्हींचे "साहेब" एकच. हात लावतील तिथे सोने करतील.
पण.
क्रिकेट आणि कब्बडी , एक आपल्याच मातीतला खेळ, आपलाच, आपल्याच माणसांचा तर दुरसा परकीयां कडुन आलेला

क्र.

नाशिककरांनी केली आम्हा पुणेकरांवर मात - दख्खनची राणी व पंचवटी

अहाहा काय ते वर्णन ’पंचवटीच्या’ पासधारकारांच्या आदर्श बोगीचे ! लिम्का बुकाकडे म्हणे तिची वाटचाल सुरु आहे. काय ती म्हणे पाळली जाणारी स्वयंशिस्त,स्वच्छता, रेड कार्पेट काय , पाढरे स्वच्छ पडदे काय, पहाटॆच्या वेळेत म्हणे लाईटी बंद करुन उरलेली झोप काढणॆ काय, विचारु नका , आरामदायी पणा म्हणजे किती म्हणावा ?

ह्या, झक्कास. मानल बुबा तुम्हाला. जळतोय हो जीव नुसता जळातोय, जलन हो रही है !

पण नाशिककरांनो थांबा काही दिवसांनी बघा आमच्या डेक्कन क्वीन चे प्रवाशी काय चमत्कार करुन दाखवतील ते.

नविन सभासदांचे फुल देवुन स्वागत करणॆ , त्यांना आपल्या परिवारात प्रेमाने सामावुन घेणे, त्यांना येथे बसु नका, येथुन उठा, येथे बसल्यात आदी सुचना कम आदेशापासुन मुक्ती देणे, बसायला आनंदाने चांगल्या जागा उपलब्ध करुन देणे, गाडी मधे ऐसपैस न बसता आवरुन बसणे, तिघांची जागा दोघांनी न अडवणॆ, गाडी मधे पत्ते खेळणे, मद्यपान करणे आदीस मनाई करणे असे अनेक विचार आमच्या अजेंडा वर आहेत हो.

गरज आहे ती या गाडी मधे पण कोणीतरी "बिपीनभाई गांधी" निर्माण होण्याची.

हेची दान देगा देवा पुढल्या जन्मी मी खासदार व्हावा !

देवा एकच मागणे बर का.

खास"दान" मिळण्यासाठी मला पुढल्या जन्मी खासदारच कर रे देवा , ते सुद्धा अपक्ष. आणि हो, सरकार अस्थिर ठेवण्यास विसरु नकोस रे देवा. दर सहा-आठ महिन्याने ते डगमगयाला लाव रे बाप्पा.
अधुन मधुन विश्वासदर्शक ठराव पास करावा लागेल याच पण सोय करुन ठेवशील ना रे.

मग मी तुला सव्वा रुपयाचे पेढे चढवीन रे दिन दयाळा.

Monday, July 14, 2008

मुंबई - पुणॆ - ट्रेन प्रवास

या दिवसात मुंबई-पुणे दरम्यान चा ट्रेनचा प्रवास नेत्रांना सुखदायक, आल्हाददायक असतो, धरतीने पांघरलेला हिरवा शालु, हिरव्या रंगाचा विविध छटा घेबुन सजलेला असतो. सह्याद्रीच्या डोंगरमाथ्यावर टकरा देणारे पाण्याने मदमस्त झालेले ढग व डोंगरकड्यावरुन झेपावणारे धबधबे. अहाहा

राजकारण मोठे गहन हो

काय हो राजाभाऊ , सध्याच्या काळात जी काही मोडतोड, जोडतोड सुरु आहे ती लक्षात घेता भविष्यात या लहान सहान प्रादेशिक पक्षांना संपवण्यासाठी कॉग्रेस व भाजपा एकत्र आले तर आपल्याला आश्चर्य वाटेल का हो?

तर मुंबईतील टॉवरवर बंदी आणा .........

राजाभाऊ, काय ,हो खरच सरकारनी गंभीरपणे या मागणीचा विचार करुन जर का मुंबईतील टॉवरवर बंदी आणली तर आपल्या राजकारणी कम बिल्डर लोकांचे कसे व्हायचे ?

तुम्ही कशाला हो घाबरता ? ही वाक्ये म्हणजे हमखास टाळ्या मिळवण्याची साधने, या पलिकडॆ त्याची उपयुक्तता नाही की.
तेव्हा JUST RELAX.

Friday, July 11, 2008

ऍडमिशन

दहा पैकी दहा जणानी विचारलेले प्रश्न व त्यांची त्यांनीच दिलेली साफ चुकीची उत्तरे -

काय, मुलाची ऍडमिशन झाली काय ?

- हो

कुठे इंजिनियरींगला का !

मग मी अभिमानाने सांगतो

- नाही पर्यावरण शास्त्र.

त्यांच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह.

करार

ये आरजु थी की कभी हम बहार देखेंगे
किसे पता था फिज़ा बार बार देखेंगे ।

करार पाके भी किस्मत मे बेकरारी है
वो और होंगे जो दिल का करार देखेंगे ।

या लता नी गायलेल्या सुरेल, दर्दभऱ्या गाण्यात नायीकेची अवस्था झाली असेल ती आता अणुकरारसाठीचे राजकारण करणाऱ्या राजकीय पक्षांची झाली आहे काय ?

दिल को तेरी नर्गीसी आंखो का सहारा

अरमान हरे दिल की लगन तेरी लिये है हो सजन तेरे लिये है - या तलत नी गायलेल्या गाण्यातील "दिल को तेरी नर्गीसी आंखो का सहारा" या ओळीत नक्की कोणी कोणाची छेड काढली आहे ?


Wednesday, July 09, 2008

हर नर्मदे - मां तु तो जीवन देती है !


नर्मदेच्या क्षितिजापार- लेखीका - सौ. लीला शाह



एक असे पुस्तक वाचायला घेतले आहे की जे वाचु म्हटले तरी वाचले जात नाही. प्रत्येक प्रकरण, प्रत्येक पान, प्रत्येक परिच्छेद, प्रत्येक वाक्य, प्रत्येक शब्द अस्वस्थ , व्यथीत, अंतर्मुख व्हायला भाग पाडतात.



सरदार सरोवर, नर्मदा बचाब आंदोलन, मेघा पाटकर यांच्या बद्दल सविस्तर माहीती देणारी ही कादंबरी वाचतांना ज्या यातनांमधुन ही लोक गेली आहेत ते वाचतांना मन सुन्न होते.



असे कसे आपण निगरगट्ट, संवेदनाहीन, जे आपल्या विस्थापीत, प्रकल्पग्रस्थ लाखो भावंडांना विसरुन गेलो आहोत ? केवळ आपण शहरात सुरक्षीत आहोत म्हणुन ? नळ उघडल्यावर त्यात त्वरीत पाणी येत म्हणुन ? विजेचे बटन दाबल्यावर लगेच दिवा लागतो म्हणुन ?



लाखो माणसांना त्यांच्या जन्मभुमीपासुन, कर्मभुमीपासुन उखडुन टाकुन आपण काय साधतो ? काय कमावतो ? का कशासाठी हे भले मोठाले प्रकल्प बळाचा वापर करुन राबवले जातात ? का ? कोणासाठी ? कशासाठी ?



पुस्तक वाचतांनाच जर मनाला वेदना होत असतील , यातना होत असतील, मन बधीर होत असेल तर प्रत्यक्षात आपले घरदार, जमीन, व्यवसाय, जगण्याची साधने हिसकावली जात असतांना, अत्याचारांना बळी पडत असलेल्यांचा, वेदना सहन करणाअऱ्यांच्या, यातनेने पिचुन जाणाऱ्यांच्या मनाचे काय होत असेल याचा विचार करवतच नाही.



(क्र.)


Tuesday, July 08, 2008

गणपतीच्या उंचीवर मर्यादा

पर्यावरण रक्षणासाठी गणपतीच्या उंचीवर मर्यादा घालण्यात यावी तसेच गणपती विसर्जन समुद्रात करण्याऐवजी पर्यायी व्यवस्था करावी असे मत मुंबईच्या महापौर सौ. शुभा राऊळ यांनी व्यक्‍त करताच नेहमीप्रमाणेच राजकीय पक्षांनी गदारोळ घालायला सुरवात केली.

मुळात पर्यावरण म्हणजे काय हेच ज्यांना ठावुक नाही त्यांच्या कडुन यापेक्षा दुसरी काही प्रतिक्रीया अपेक्षीत करणे हा आपलाच मुर्खपणा आहे.

महापौरांच्या चांगल्या सुचनेला विरोध करणाऱ्यांना या उंच उंच गणेश मुर्तीचे समुद्रात कश्या रितीने विसर्जन केले जाते व दुसऱ्या दिवशी या मुर्त्यांची काय स्थिती असते ? त्या कश्या भग्न अवस्थेत चौपाटीला पडल्या असतात व त्यांची रवानगी अखेर कशी व कोठे होते ते दाखवायला नेले पाहीजे, त्यांच्या डोळयावर लावलेली झापडॆ दुर करुन व बंद असलेली मन उघडुन.


महापौरांना त्यांच्या विधायक कार्यात, या शहराच्या सुधारणॆसाठी त्या करत असलेल्या प्रयत्नात साथ देणे हे प्रत्येक विचारी नागरीकाचे कर्तव्य आहे.

गणपतीच्या उंचीवर मर्यादा

पर्यावरण रक्षणाअसाठी गणपतीच्या उंचीवर मर्यादा घालण्यात यावी तसेच गणपती विसर्जन समुद्रात करण्याऐव

शिकारी खुद यहां शिकार हो गया

दै.लोकसत्ताचा "शिकारी खुद यहां शिकार हो गया" हा मथळा साफ चुकला. शिकार होते ती गरिबबिचाऱ्या मुक्या प्राण्यांची हरिणांची, वाघांची, मानवरुपी हिस्त्र जनावराची नाही. आपल्या बेजबाबदार मुर्खपणामुळे त्या प्राण्याचा त्वरित जीव जातो व त्या हत्येस कारणीभुत असलेले दानव वर्षोनुवर्षे न्यायालयात खटला चालत राहील्यामुळे आनंदात बाहेर जिवन जगत असतो.
धर्मराव अत्राम यांच्या नुसत्या राजीनाम्याने काय होणार ? कायद्यानुसार जेव्हा चिंकाऱ्याची शिकार करणाऱ्यांवर कारवाई होईल , सजा होईल तेव्हाच त्या मॄत जीवास काहीतरी न्याय होईल.
या शिकारप्रकरणात गावकरी, वन्यखाते व संबंधीत पत्रकारांनी, आरोपीस पकडण्यासाठी कोणाचीही पर्वा न करता जे चिकाटीने प्रयत्न केले ते खरोखरच कौतुकास्पद आहेत.
आजच्या लोकसत्ता मधील चंद्रहास मिरासदारांचा या विषयावरील लेख अप्रतीम आहे, आपल्यासारख्यांच्या संवेदनाहीन प्रव्रुत्तीच्या माणसांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणारा आहे.
राजकारणी माणसांपासुन ते सर्वसामान्यांपर्यंत एकाही व्यक्‍तीने या प्रकरणी साधा निषेधाचा सुर लावला नाही ही खरोखरच दुर्दैवाची बाब आहे.
आपण येवढे बेफिकीर का बरे झालो आहेत ?

Monday, July 07, 2008

इंटरसिटी - पासधारकांचा डबा - दिवस पहिला - एक सुखद अनुभव

डॆक्कन क्विन च्या आडमुठ्या प्रवाश्यांच्या वागणुकीने ’आता आपले कसे व्हायचे " या विचाराने धास्तवलेला मी, रविवारी मुंबईस परततांना इंटरसिटी च्या पासधारकांच्या डब्याकडॆ बिचकत गेलो. पण माझी ही धास्ती क्षणभंगुरच ठरली. एक सुखद आश्रय माझी वाट बघत फलाटावर उभे होते. चक्क रांग होती ना तिथे पासधारकांच्या डब्यात प्रवेश करण्यासाठी. शिस्तीने रांगेत उभे रहाणारे प्रवाशी आयुष्यात पहिल्यांदाच पहात होते.
ट्रेन आली. तसा जरासा गोंधळ उडला पण तो प्रामुख्याने पुढच्या जनरल डब्यासाठी उभा असलेल्या माणसांमुळॆ. पण पासधारकांना शिस्तीत डब्यात प्रवेश करतांना पाहुन बरे वाटले, चेंगराचेंगरी नाही, अरेरावी नाही, जागेबद्द्ल स्वामीत्वाची भावना नाही, नाही म्हटल तरी पिशवी, वर्तमानपत्र टाकुन दोस्तासाठी जागा अडवणे हा प्रकार थोड्या प्रमाणात होता, पण तो तेवढ्यापुरता. कौतुकाचा भाग जास्त. मी एक बॅग बाजुला करुन बसलो, कोणीही काहीही बोलले नाही, कोणीही मला उठवण्याचा प्रयत्न केला नाही.
सर्वांनी स्थानग्रहण केल्या नंतर एक दाढी वाले गॄहस्थ ऊठले, सर्वांना बसायला जागा मिळाली आहे की नाही याची जातीने चौकशी केली, एक दोन उभे होते त्यांना बसायला जागा करुन दिली, सर्वांची काळजी योग्य प्रकारे घेतली गेली. लोणावळ्याला चढलेल्या अनेकांना जरासे सरकुन बाजुला सिट वर बसायला जागा करुन दिली गेली.
आतले वातावरणही कसे खेळीमेळीचे. गाडी सुटली, अनेकांनी आपल्या बॅगा खोलुन आणलेला खाऊ सहप्रवाशांना वाटला.
गमतीजमतीत मुंबई कधी आली कळलच नाही.

Saturday, July 05, 2008

डॆक्कन क्वीन - पासधारकांचा डबा - दिवस पहिला - एक अनुभव

"येतुन ऊठा. येथे बसलेले आहेत."
मला समजेना बसलेले आहेत म्हणजे नक्की कोण.मी मुंबईला स्थानकावर लवकर गेल्यामुळे डबा रिकामाच होता.
अं. कोण बसल्यात ? - मी
"आम्ही"
- आम्ही ? आपण तर उभे आहात. बसलोय तर मी . - इती मी
चला ऊठा, ऊठा, येथे बसायचे नाही. आमची ही रोजची जागा आहे. चला ऊठा. येथे मी बसणार. तुमी बाजुला बसा.
बाजुला आपण ही बसु शकता, बसानां. - मी
चांगल्या रितीने समजवुन सांगीतलेले समजत नाही का ? मी काय तुमच्याशी वाद झालतोय का ? भांडंण करतोय का ?
- मी असं कधी म्हटलय का ? मी तर येथे शांत बसलेलो आहे, बोलत तर आपण आहात.
मी आपल्याल्या कधी येतुन ऊठा म्हटंलय तरी काय ? = मी
आता आमचा गॄप येणार आहे, मग तुम्हाला ऊठावेच लागेल. आम्ही पास होल्डर आहोत.
हो कां, माझा ही पास आहे. - मी
आम्ही रोजचेच आहोत
मी ही रोजचाच होणार आहे - मी
मग तुम्ही रोज बसता तेथे जावुन बसा, येथे बसायचे नाही-
मी ढिम्म. अजिब्बात हललो नाही. माझ्यावर काहीच परिणाम होत नाही हे बघितल्यावर त्या गॄहस्थांनी दुसऱ्याकडॆ माझी तक्रार केली.
तुम्हाला यांनी सांगीतलेना येथुन ऊठायला, मग ऊठता येत नाही का ? चांगल्या रितीने सांगतोय " या चांगल्या रिती मधे माझे दोन्ही हात धरुन मला जबरदस्तीने ऊठवण्याचा प्रयत्न.
माझे हात सोडा. माझा अंगाला हात लावायचा नाही - ठामपणॆ मी.
मग ते तणतणत गेले. ही नविन माणसे स्वतःला साहेब समजतात यांचीच रेल्वे, पासुन थेट लालु प्रसाद पर्यंत.
परत मुळचे गॄहस्थ आले.
हातातल्या पिशवीतुन आपली छत्री काढली, माझ्या पाठीमागे सारली. जणु मी ऊठल्यावर त्यांचा नंबर, मग पाण्याची बाटली, वर्तमानपत्रे, पिशवी सारे इतर सीट वर पसरवुन त्या आरक्षीत केल्या.
काय पण होपस.
अनेकवेळा त्यांनी माझे त्यांच्या दॄष्टीतुन झालेले अतिक्रमण हटवण्याचा प्रयत्न केला.
पण नाही जमले. मग ते दुसरी कडॆ जावुन बसले.
त्या आधी त्यांनी आजुबाजुला बसल्येल्या नविन तिघांना हुसकावुन लावले. बिच्चारे भांडण नहो म्हणुन मुकाट्याने दुसरीकडॆ गेले.
या लोकांना हा पासधारकांचा डबा म्हणजे काय आपली जागीर वाटते काय ?

डॆक्कन क्वीन - पासधारकांचा डबा - दिवस पहिला

"येथे बसल्यात"

या वाक्याचा अर्थ असा घ्यायचा की त्या शेटजींना स्वतःला राजेशाही थाटात ऐसपाईस बसायला दोन माणसांची जागा अडवायचीयं.

किंवा

त्यांना व त्यांच्या जोडीदाराला ती मधली सीट पत्ते खेळतांना पत्ते टाकण्यासाठी मोकळी हवी आहे.

भले दुसऱ्यांना उभे का रहावे लागु नये !

आयुष्यभर डॆक्कन क्वीनमधे पासधारकांचा डब्यात प्रवास केल्यांमुळे ही संपुर्ण गाडी किंवा हा पासधारकांचा डबा त्यांच्या मालकीचा जणु झाला आहे. नविन माणसाला सुखासुखी त्यांच्या बंद जगात प्रवेश नाही.

Friday, July 04, 2008

आश्चर्य

अहो काय सांगता काय ? म.टा आणि लोकसत्तेचे एकमत ? खर की काय ?

आज दोघांच्याही मुख्यपानावरील ठळक बातमीचे शिर्षक एकच, अगदी सारखे, शब्द नी शब्द.

" अकरावी प्रवेश प्रक्रिया गोत्यात "

पण आपले वेगळेपण जपण्यासाठी मटाने " ? " त्यात वाढवलय येवढाच काय तो फरक.

महागाई

महागाईचा आणखी एक बळी.घरातील बॉडबॅंडचे इंटरनेट कनेक्शन बंद करावे लागले. छंदासाठी ८००-१००० रुपये महिनाकाठी खर्च करणे आता नकोसे व्हायला लागले आहे.

तेव्हा आता जसे जमेल तसे ब्लॉग लिहीणे.

Thursday, July 03, 2008

साहित्य संमेलने

पण राजाभाऊ तुम्ही काहीही म्हणा, मी काय म्हणतो, ही समेंलन म्हणजे नुसती करमणुकीची रेलचेल असते बघा, गंमतजंमतच. संमेलनात जेवढे मनोरंजन होत नाही तेवढे हे भरवण्याच्या घोषणा झाल्यानंतर होणाऱ्या वादावादी, लठ्यालठ्यातुन, होत असते नाही का ? कधी अध्यक्ष कोणी बनायवे यावरुन गुद्दागुद्दी, तर कोठे भरायचे यावरुन पळवापळवी, तर कधी राजकीय नेत्यांनी या मधे सहभागी व्हावे की नाही या मुद्दावरुन गरमागरमी, रसिक कसे खुष झाले पाहिजेत .


अहो, दादा, मला तर यात परकिय शक्तीचा ( Foreign Hand ) आहे की काय ? अशी शंका येवु लागलीय. गेल्या वर्षी परदेशात जास्त रमण्याऱ्या व्यक्‍तीस अध्यक्षपदापासुन दुर ठेवण्यात आले म्हणुन तर नाही ना या परदेशस्थांनी सबंध संमेलनच हायजॅक करायचे ठरवलय अस तर नाही ना?


काय सांगता येत नाही बुवा. असु शकते तस सुद्धा. आता अध्यक्षपदाचे उमेदवार जाहीर झाले की मग दुसरा अंक सुरु होईल की. मग कळेलच.


आणि काय हो ? कधीतरी तुम्ही या संमेलनाला गेले आहात काय राव ? थेट अमेरीकेला जायच म्हणताहेत ?

Tuesday, July 01, 2008

अन्नासाठी दशदिशा फिरवीशी जगदीशा


कोण कुठल्या मुलखातले कोण जाणॆ ? पोटापाण्यासाठी लागलेल्या भटकंतीतील पुंणे हा एक थांबा.

साला बांझ है !


सरळ एक घाव दोन तुकडॆ, मी काही बोलेपर्यंत भुईसपाट. मला वाटले होते की आता पावसाळ्यात झाडांची काय छाटणी वगैरे काम चालले असेल, पण नाही . वॉचमननी एका घावात ते डवरलेले पपईचे झाड जमिनदोस्त केले.

जाब विचारायला गेलो तर त्याच्या सुपरवायजरनी उत्तर दिले. "साला बांझ है ! फल धरताही नही, इसे सुबह सुबह देखेगा तो पुरा दिन खराब जाता है ।"

आणखीन एक बळी या वृत्तीचा.

हे बहरलेले झाड पाहिले आणि हा प्रसंग आठवला.

सुरक्षिततेचे नियम गेले चुलीत.



सुरक्षिततेचे नियम केवळ आपल्याकरताच असतात हे कामगार सोईस्करपणे विसरतात तरी किंवा ते नियम काय असतात हे त्यांना कोणी सांगीतलेच नसते. याची मुख्य जबाबदारी हे जेथे काम करतात त्या कंपनीच्या मालकावरच असते. ते कामगारांना माहीती करुन देण्याची, लागणारी सर्व उपकरण, साधनसामुग्री पुरवण्याची व ते नियम पाळत आहेत कि नाही याची खातरजमा करणे या पासुन मालकांना सुटका नाही

अतिथी


वर्षोनुवर्षे पुण्याच्या भेटीत असे कोणते आकर्षण या साद्या उपहारगॄहात आहे जे आम्ह्लाला येथे येवुन बार बार लगातार, वारंवार जेवण्यास प्रवृत्य करतेच करते. जवळजवळ गेली १५-२० वर्षे तरी आम्ही येथे जेवायला येत आहोत.

साधे, सोपे, सरळ, रुचकर, चविष्ट जेवण, कोणताही फाफट्पसारा नाही, उगीचच थाळी भरायची म्हणुन चार चार भाज्या, गोडपदार्थ, फरसाण आदींची रेलचेल नाही. मग त्यामुळॆ शोबाजीसाठी लावलेला भरमसाट दर नाही. पैसे वसुल करण्यासाठी पोटास तड लागेपर्यंत हाण हाण हाणणॆ नाही जेवल्यानंतर तृप्तीने व समाधानाने ग्राहक उठला पाहीजे.

जेवढे हवे तेवढेच, जेवढे लागते तेवढेच पदार्थ. परत किंमतही अगदी वाजवी. रु.. ३५.०० व रु.५०..०० मीनी थाळी किंवा नेहमीची थाळी, ज्यात एक भाजी ज्यादा.

आमटीभाताची चव काय वर्णावी, अहाहा, त्यावरच आम्ही अगदी फिदा. मग कधीतरी त्या ऐवजी पिठलेभाकरी खाण्याची लहर येते, तर कधी पांढऱ्या भाता ऐवजी पालक भात किंवा पुलाव.

संभाजी पार्क, पुणॆ समोर, शिवसागरच्या बाजुलाच हे अतिथी हॉटॆल आहे.

मग काय कधी जाताय येथे जेवायला ?

दै. सकाळ झोपलाय रे !

दै. सकाळ झोपलाय की उपसंपादक डुलक्या खात आहेत ?
आज जुलै १.
पालख्या पुण्यात आल्या आणि मार्गी देखील लागल्या . आज हे बातमी देत आहेत.


पालखी आगमनामुळे शहरातील वाहतूकव्यवस्थेत बदल


संतश्रेष्ठ ज्ञानेश्‍वर महाराज आणि जगद्‌गुरू संत तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा येत्या शुक्रवारी (ता.२७) पुणे शहरात दाखल होत असून, वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी वाहतूक पोलिसांनी पालखी मार्गावरील वाहतूकव्यवस्थेत बदल केला आहे. देहू येथून प्रस्थान ठेवल्यानंतर संत तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा गुरुवारी (ता.२६) आकुर्डी येथे मुक्काम घेणार आहे. या वेळी पालखी मार्गावरील वाहतूक निगडी जकातनाका ते खंडोबाचा माळपर्यंतचा रस्ता एका बाजूने दुचाकी आणि हलक्‍या वाहनांसाठी खुला ठेवण्यात येणार आहे. देहूफाटा येथून पुण्याकडे येणारी वाहने कात्रज बायपासकडे वळविण्यात येतील. हिंजवडी फाटा येथून काही वाहने डांगे चौक, वीर चाफेकर चौक मार्गाने पुणे-मुंबई महामार्गावर येऊ शकतील. टिळक चौक, प्राधिकरण कार्यालय येथील वाहतूक भेल चौक, बिजलीनगर, महावीर चौकातून वळविण्यात येईल. दुर्गादेवी चौक, थरमॅक्‍स चौकातून महावीर चौकात वाहने आणता येतील. पालखी सोहळा आकुर्डी गावात जाताना निगडी नाका ते बजाज टेम्पो ते आकुर्डी गाव या रस्त्याऐवजी वाहनांनी एमआयडीसी आणि प्राधिकरणातील पर्यायी रस्त्यांचा वापर करावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

संत ज्ञानेश्‍वर आणि संत तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा (ता.२७) रोजी पुण्यात दाखल होत आहे. या दोन्ही पालख्या पुणे-मुंबई महामार्गावर मरिआई गेट येथे एकत्रित येतात. संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यासाठी पुणे-मुंबई महामार्गाची एक बाजू वाहतुकीसाठी खुली ठेवली जाणार आहे. जड वाहनांनी कात्रज बायपास मार्गाचा वापर करावा. संत ज्ञानेश्‍वर महाराज यांच्या पालखी सोहळ्याच्या मार्गावर दिघी, विश्रांतवाडी, साप्रस चौक, होळकर पूल, मुठा रस्ता वाहतूक बंद केली जाईल. आळंदीकडून पुण्याकडे येणाऱ्या दुचाकी आणि हलक्‍या वाहनांनी चऱ्होली फाटा, निरगुडी, लोहगाव विमानतळ, जेल रस्ता, येरवडा या मार्गांचा वापर करावा. मोशी, भोसरी, नाशिक फाटा, बोपोडी, औंध मार्गे पुण्यात यावे. नाशिक रस्त्यावरून नाशिक फाट्याकडे येण्यास जड वाहनांना मनाई केली असून, या वाहनांनी मोशी, तळवडे मार्गे देहू फाट्याकडे जावे. बोपोडी चौकातून पुणे आणि खडकीकडे जाण्यास मनाई केली आहे. ही वाहने औंध मार्गे वळविण्यात येतील. जहांगीर नर्सिंग होम चौकातून राजा बहादूर मिल मार्गे जाण्यास मनाई केली असून, ही वाहतूक अलंकार चौक, साधू वासवानी चौक मार्गे वळविण्यात येईल. नगर रस्त्यावरून होळकर पुलाकडे जाण्यास मनाई केली असून, ही वाहतूक पर्णकुटी चौकातून वळविली जाईल. सोलापूर महामार्गावरून जड वाहनांना भैरोबानाला येथून शासकीय विश्रामगृहाकडे जाण्यास बंदी केली आहे. या वाहनांनी वानवडी बाजार, लुल्लानगर, बिबवेवाडी मार्गाचा वापर करावा. सोलापूर मार्गावरून मुंबईला जाणारी वाहतूक वानवडी बाजार, बिबवेवाडी, कात्रज येथून बायपास मार्गावर वळविण्यात येईल. दोन्ही पालख्या अभियांत्रिकी महाविद्यालयाजवळ एकत्र येणार असून, या भागातील वाहतूक बंद केली जाणार आहे. गणेश खिंड रस्त्यावरून येणारी वाहतूक सेनापती बापट रस्त्यावर वळविली जाईल. पालखी सोहळा जसा पुढे जाईल तशी वाहतूक बंद केली जाईल आणि सोहळा पुढे गेल्यानंतर वाहतूक पुन्हा सुरू केली जाईल. या काळात वाहनचालकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.