पण राजाभाऊ तुम्ही काहीही म्हणा, मी काय म्हणतो, ही समेंलन म्हणजे नुसती करमणुकीची रेलचेल असते बघा, गंमतजंमतच. संमेलनात जेवढे मनोरंजन होत नाही तेवढे हे भरवण्याच्या घोषणा झाल्यानंतर होणाऱ्या वादावादी, लठ्यालठ्यातुन, होत असते नाही का ? कधी अध्यक्ष कोणी बनायवे यावरुन गुद्दागुद्दी, तर कोठे भरायचे यावरुन पळवापळवी, तर कधी राजकीय नेत्यांनी या मधे सहभागी व्हावे की नाही या मुद्दावरुन गरमागरमी, रसिक कसे खुष झाले पाहिजेत .
अहो, दादा, मला तर यात परकिय शक्तीचा ( Foreign Hand ) आहे की काय ? अशी शंका येवु लागलीय. गेल्या वर्षी परदेशात जास्त रमण्याऱ्या व्यक्तीस अध्यक्षपदापासुन दुर ठेवण्यात आले म्हणुन तर नाही ना या परदेशस्थांनी सबंध संमेलनच हायजॅक करायचे ठरवलय अस तर नाही ना?
काय सांगता येत नाही बुवा. असु शकते तस सुद्धा. आता अध्यक्षपदाचे उमेदवार जाहीर झाले की मग दुसरा अंक सुरु होईल की. मग कळेलच.
आणि काय हो ? कधीतरी तुम्ही या संमेलनाला गेले आहात काय राव ? थेट अमेरीकेला जायच म्हणताहेत ?
No comments:
Post a Comment