Tuesday, July 01, 2008

दै. सकाळ झोपलाय रे !

दै. सकाळ झोपलाय की उपसंपादक डुलक्या खात आहेत ?
आज जुलै १.
पालख्या पुण्यात आल्या आणि मार्गी देखील लागल्या . आज हे बातमी देत आहेत.


पालखी आगमनामुळे शहरातील वाहतूकव्यवस्थेत बदल


संतश्रेष्ठ ज्ञानेश्‍वर महाराज आणि जगद्‌गुरू संत तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा येत्या शुक्रवारी (ता.२७) पुणे शहरात दाखल होत असून, वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी वाहतूक पोलिसांनी पालखी मार्गावरील वाहतूकव्यवस्थेत बदल केला आहे. देहू येथून प्रस्थान ठेवल्यानंतर संत तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा गुरुवारी (ता.२६) आकुर्डी येथे मुक्काम घेणार आहे. या वेळी पालखी मार्गावरील वाहतूक निगडी जकातनाका ते खंडोबाचा माळपर्यंतचा रस्ता एका बाजूने दुचाकी आणि हलक्‍या वाहनांसाठी खुला ठेवण्यात येणार आहे. देहूफाटा येथून पुण्याकडे येणारी वाहने कात्रज बायपासकडे वळविण्यात येतील. हिंजवडी फाटा येथून काही वाहने डांगे चौक, वीर चाफेकर चौक मार्गाने पुणे-मुंबई महामार्गावर येऊ शकतील. टिळक चौक, प्राधिकरण कार्यालय येथील वाहतूक भेल चौक, बिजलीनगर, महावीर चौकातून वळविण्यात येईल. दुर्गादेवी चौक, थरमॅक्‍स चौकातून महावीर चौकात वाहने आणता येतील. पालखी सोहळा आकुर्डी गावात जाताना निगडी नाका ते बजाज टेम्पो ते आकुर्डी गाव या रस्त्याऐवजी वाहनांनी एमआयडीसी आणि प्राधिकरणातील पर्यायी रस्त्यांचा वापर करावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

संत ज्ञानेश्‍वर आणि संत तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा (ता.२७) रोजी पुण्यात दाखल होत आहे. या दोन्ही पालख्या पुणे-मुंबई महामार्गावर मरिआई गेट येथे एकत्रित येतात. संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यासाठी पुणे-मुंबई महामार्गाची एक बाजू वाहतुकीसाठी खुली ठेवली जाणार आहे. जड वाहनांनी कात्रज बायपास मार्गाचा वापर करावा. संत ज्ञानेश्‍वर महाराज यांच्या पालखी सोहळ्याच्या मार्गावर दिघी, विश्रांतवाडी, साप्रस चौक, होळकर पूल, मुठा रस्ता वाहतूक बंद केली जाईल. आळंदीकडून पुण्याकडे येणाऱ्या दुचाकी आणि हलक्‍या वाहनांनी चऱ्होली फाटा, निरगुडी, लोहगाव विमानतळ, जेल रस्ता, येरवडा या मार्गांचा वापर करावा. मोशी, भोसरी, नाशिक फाटा, बोपोडी, औंध मार्गे पुण्यात यावे. नाशिक रस्त्यावरून नाशिक फाट्याकडे येण्यास जड वाहनांना मनाई केली असून, या वाहनांनी मोशी, तळवडे मार्गे देहू फाट्याकडे जावे. बोपोडी चौकातून पुणे आणि खडकीकडे जाण्यास मनाई केली आहे. ही वाहने औंध मार्गे वळविण्यात येतील. जहांगीर नर्सिंग होम चौकातून राजा बहादूर मिल मार्गे जाण्यास मनाई केली असून, ही वाहतूक अलंकार चौक, साधू वासवानी चौक मार्गे वळविण्यात येईल. नगर रस्त्यावरून होळकर पुलाकडे जाण्यास मनाई केली असून, ही वाहतूक पर्णकुटी चौकातून वळविली जाईल. सोलापूर महामार्गावरून जड वाहनांना भैरोबानाला येथून शासकीय विश्रामगृहाकडे जाण्यास बंदी केली आहे. या वाहनांनी वानवडी बाजार, लुल्लानगर, बिबवेवाडी मार्गाचा वापर करावा. सोलापूर मार्गावरून मुंबईला जाणारी वाहतूक वानवडी बाजार, बिबवेवाडी, कात्रज येथून बायपास मार्गावर वळविण्यात येईल. दोन्ही पालख्या अभियांत्रिकी महाविद्यालयाजवळ एकत्र येणार असून, या भागातील वाहतूक बंद केली जाणार आहे. गणेश खिंड रस्त्यावरून येणारी वाहतूक सेनापती बापट रस्त्यावर वळविली जाईल. पालखी सोहळा जसा पुढे जाईल तशी वाहतूक बंद केली जाईल आणि सोहळा पुढे गेल्यानंतर वाहतूक पुन्हा सुरू केली जाईल. या काळात वाहनचालकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

3 comments:

मन कस्तुरी रे.. said...

हरेक्रिश्नाजी

कालचा सकाळ मी मुद्दाम घरी जाऊन पुन्हा वाचला.
मला तर कुठेच नाही दिसली ही बातमी! तुम्ही नक्की 'कालचाच' सकाळ वाचत होतात ना?

HAREKRISHNAJI said...

Ashwini,

It's on the internet. I copied it down from there only . I was also confused and I rechecked the date.

HAREKRISHNAJI said...

Ashwini,

The news is still appearing on esakal even today's edition. Pl check on net.