दै.लोकसत्ताचा "शिकारी खुद यहां शिकार हो गया" हा मथळा साफ चुकला. शिकार होते ती गरिबबिचाऱ्या मुक्या प्राण्यांची हरिणांची, वाघांची, मानवरुपी हिस्त्र जनावराची नाही. आपल्या बेजबाबदार मुर्खपणामुळे त्या प्राण्याचा त्वरित जीव जातो व त्या हत्येस कारणीभुत असलेले दानव वर्षोनुवर्षे न्यायालयात खटला चालत राहील्यामुळे आनंदात बाहेर जिवन जगत असतो.
धर्मराव अत्राम यांच्या नुसत्या राजीनाम्याने काय होणार ? कायद्यानुसार जेव्हा चिंकाऱ्याची शिकार करणाऱ्यांवर कारवाई होईल , सजा होईल तेव्हाच त्या मॄत जीवास काहीतरी न्याय होईल.
या शिकारप्रकरणात गावकरी, वन्यखाते व संबंधीत पत्रकारांनी, आरोपीस पकडण्यासाठी कोणाचीही पर्वा न करता जे चिकाटीने प्रयत्न केले ते खरोखरच कौतुकास्पद आहेत.
आजच्या लोकसत्ता मधील चंद्रहास मिरासदारांचा या विषयावरील लेख अप्रतीम आहे, आपल्यासारख्यांच्या संवेदनाहीन प्रव्रुत्तीच्या माणसांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणारा आहे.
राजकारणी माणसांपासुन ते सर्वसामान्यांपर्यंत एकाही व्यक्तीने या प्रकरणी साधा निषेधाचा सुर लावला नाही ही खरोखरच दुर्दैवाची बाब आहे.
आपण येवढे बेफिकीर का बरे झालो आहेत ?
No comments:
Post a Comment