वर्षोनुवर्षे पुण्याच्या भेटीत असे कोणते आकर्षण या साद्या उपहारगॄहात आहे जे आम्ह्लाला येथे येवुन बार बार लगातार, वारंवार जेवण्यास प्रवृत्य करतेच करते. जवळजवळ गेली १५-२० वर्षे तरी आम्ही येथे जेवायला येत आहोत.
साधे, सोपे, सरळ, रुचकर, चविष्ट जेवण, कोणताही फाफट्पसारा नाही, उगीचच थाळी भरायची म्हणुन चार चार भाज्या, गोडपदार्थ, फरसाण आदींची रेलचेल नाही. मग त्यामुळॆ शोबाजीसाठी लावलेला भरमसाट दर नाही. पैसे वसुल करण्यासाठी पोटास तड लागेपर्यंत हाण हाण हाणणॆ नाही जेवल्यानंतर तृप्तीने व समाधानाने ग्राहक उठला पाहीजे.
जेवढे हवे तेवढेच, जेवढे लागते तेवढेच पदार्थ. परत किंमतही अगदी वाजवी. रु.. ३५.०० व रु.५०..०० मीनी थाळी किंवा नेहमीची थाळी, ज्यात एक भाजी ज्यादा.
आमटीभाताची चव काय वर्णावी, अहाहा, त्यावरच आम्ही अगदी फिदा. मग कधीतरी त्या ऐवजी पिठलेभाकरी खाण्याची लहर येते, तर कधी पांढऱ्या भाता ऐवजी पालक भात किंवा पुलाव.
संभाजी पार्क, पुणॆ समोर, शिवसागरच्या बाजुलाच हे अतिथी हॉटॆल आहे.
मग काय कधी जाताय येथे जेवायला ?
No comments:
Post a Comment