डॆक्कन क्विन च्या आडमुठ्या प्रवाश्यांच्या वागणुकीने ’आता आपले कसे व्हायचे " या विचाराने धास्तवलेला मी, रविवारी मुंबईस परततांना इंटरसिटी च्या पासधारकांच्या डब्याकडॆ बिचकत गेलो. पण माझी ही धास्ती क्षणभंगुरच ठरली. एक सुखद आश्रय माझी वाट बघत फलाटावर उभे होते. चक्क रांग होती ना तिथे पासधारकांच्या डब्यात प्रवेश करण्यासाठी. शिस्तीने रांगेत उभे रहाणारे प्रवाशी आयुष्यात पहिल्यांदाच पहात होते.
ट्रेन आली. तसा जरासा गोंधळ उडला पण तो प्रामुख्याने पुढच्या जनरल डब्यासाठी उभा असलेल्या माणसांमुळॆ. पण पासधारकांना शिस्तीत डब्यात प्रवेश करतांना पाहुन बरे वाटले, चेंगराचेंगरी नाही, अरेरावी नाही, जागेबद्द्ल स्वामीत्वाची भावना नाही, नाही म्हटल तरी पिशवी, वर्तमानपत्र टाकुन दोस्तासाठी जागा अडवणे हा प्रकार थोड्या प्रमाणात होता, पण तो तेवढ्यापुरता. कौतुकाचा भाग जास्त. मी एक बॅग बाजुला करुन बसलो, कोणीही काहीही बोलले नाही, कोणीही मला उठवण्याचा प्रयत्न केला नाही.
सर्वांनी स्थानग्रहण केल्या नंतर एक दाढी वाले गॄहस्थ ऊठले, सर्वांना बसायला जागा मिळाली आहे की नाही याची जातीने चौकशी केली, एक दोन उभे होते त्यांना बसायला जागा करुन दिली, सर्वांची काळजी योग्य प्रकारे घेतली गेली. लोणावळ्याला चढलेल्या अनेकांना जरासे सरकुन बाजुला सिट वर बसायला जागा करुन दिली गेली.
आतले वातावरणही कसे खेळीमेळीचे. गाडी सुटली, अनेकांनी आपल्या बॅगा खोलुन आणलेला खाऊ सहप्रवाशांना वाटला.
गमतीजमतीत मुंबई कधी आली कळलच नाही.
2 comments:
इंटरसिटीवाले शिस्तप्रिय व डेक्कनक्वीनवाले बेशिस्त असे का म्हणे?
Experience yourself.
Post a Comment